डुक्करदारा : देवीघाट
डुक्करदारा... डाबका जंगल...बेंद पठार.. जाईची विहीर... वाघ्याचं पठार... शेळीचा मोडा...आणि देवीघाट.. ★★★★★★★★★★★★★★★★★★★ घाटघर पश्चिम परिसरातील दमछाक भटकंती ! ■■■■■■■■■■■■■■■■■■■■ 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 " तळकोकण आणि घाटमाथा या दोन स्थळांमुळे सह्याद्री महत्त्व कमालीचं वाढत गेलंय. अगदी प्राचीन काळापासून तर आजतागायत. कालमानानुसार त्यांच महत्त्व कमी होतं गेलं हेही खरेचं. तरी आजही अनेक ठिकाणी स्थानिकांसाठी रहदारीचा मार्ग म्हणून त्यांचा अवलंब केला जात आहे.हेही खरे. हल्ली आम्हा भटक्यांची ही दोन स्थळे म्हणजे जीव की प्राण. खरा सह्याद्री कळतो तो याचं तळ आणि घाट यांना जोडणा-या मार्गांवर.सह्याद्री-अंतरंग अनुभवायला यासारखा दूसरा मार्ग नाही. ☘️ भंडारदरा परिसराचं महात्म्य दिवसेंदिवस उंची गाठत आहे. पर्यटन अंगाने आणि साहसी अंगानेही. पण त्याचं संगोपन व्यवस्थित होतं नाही हे मात्र दुर्दव. खासकरून रस्त्यांची दुर्दशा तर संतापजनक. ⛰️ " हिवाळा धबधब्याचं आकर्षण आता नवनवलाईच्या पलीकडे गेलेलं आहे.तरी त्याच्या आसपास नवनवीन वाटा श...