Posts

Showing posts from March, 2022

खिरेश्वर ते खिरेश्वर : आडराई प्रदक्षिणा

Image
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 🌺खिरेश्वर ते खिरेश्वर 🌺      व्हाया " कळश्या डोंगर-भातखळा-रडकिचा झूरा- खराट्याची राय- पाय-यांची वाट-आडराई " 💧 “Everyone wants to live on top of the mountain, but all the happiness and growth occurs while you are climbing it.” Andy Rooney 🕵️ 💧 " आडराईची पावसाळी भटकंती करून दोन/cyyतीन वर्षे होतं आलीत. या ऋतुत इथyलं सौंदर्य कमालीचं मोहून टाकणारं असतं. निसर्गाचा गंध  नसणारी व्यक्तिही मोहरून जाऊ शकते. इतका इथला निसर्ग चमत्कार डोळ्यांच पारणं फेडणारा असतो. तर,uu गेल्या महिन्यात याचं मुलुखात तवली/खुर्द्याचा दारा भटकंती झालेली.ऐन उन्हाळ्यातही इथला बाज हवाहवासा. रानमेवा, कुरकुरीत वाट,सावली आश्रयाला असलेली लहान थोरली वनराजी,कुठे एखाद नितळ पाvfuण्याचं डबक तहान भागवणारं,चौफेर व्हू शार्प,360 अंशाचा आसमंत नजरेचा ठाव घेणारा.दाटu वनराईची आस.. सारं सुखही इथेचं नांदणारं.दारी आल्यासारखं वाटणारं.🌱 त्या भटकंती वेळी. रडकिचा झुरा/आडराई प्रदक्षिणा मारण्याचं स्वप्न बघितलं आणि ते इतक्या लवकर पुर्णत्वास जाईल असं अजिबात अपेक्षित नव्हतं. 💧💧💧 " बरोबर ...

अंगठेसरी/नाळेचीवाट भाग 2

Image
ब्लॉग भाग 2 ★★★★★★ अंगठेसरी / नाळेची वाट ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌼 दिवस दुसरा .. ☘️ भल्या सकाळी गजबजाटने जाग आली. रात्री मस्त झोप झाली. त्यामुळे नवा दिवस.. नवा उत्साह बाहेर.. लख्ख उजाडलेलं. जावळीच्या तळहातावरची सकाळ.. ऐतिहासिक पदर असलेली. ठरवूनही इतिहास पाठ सोडायला तयार नाही. मराठ्यांचा इतिहासचं तसा आहे.🚩 🌼 अंगणातून पुर्वेला पर्वत्या लखलखत होता. आठ एक वर्षापूर्वी सलग दोन वेळा पर्वत्याच्या दारी आलेलो.एकदा बामणोलीहून बोटने तर दूस-यांदा खेडहून रघुवीर घाटाने.मुक्काम होता आरव गावांत. दूसरा चकदेवच्या जंगमवस्तीवर. सारा सिनँरियो उलगडू लागला. आणि.. आठवणींचा जागर बेलभंडार उधळू लागला. कै.अविनाश जोशीकाकांची आठवण आज हळवी करून गेली. तेव्हा तेचं आमचे लिडर. मितभाषी ☹️ पण आभ्यासू.. मायाळू ..🙏 ☘️ चहा-पोहे-गरमागरम दूधाची न्याहरी झाली. आणि.. निरोपाची वेळ झाली.आतिथ्य/आपुलकी यांचा संगम आणि जावळी पाहुणचार आटोपून मामांचा निरोप घेतला. सह्याद्रीने अशी सोन्यासारखी माणसे जन्माला घातली. उपकार आहेत आमच्यावर.🙏 🌱 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ ...

अंगठेसरी/नाळेचीवाट

Image
अंगठेसरी/नाळेची वाट 🏔️🏔️🏔️🏔️🏔️🏔️🏔️ 16/03/2022 अंगठेसरी / नाळेची वाट कांदाट खोरे ता.महाबळेश्वर जि.सातारा√ ★★★★★★★★★★ मी जगभर प्रवास केला√ नद्या आणि पर्वत पहाण्यासाठी दूरवर भटकलो सारे काही पाहिले आणि अचानक   एक दिवस मला दिसला, माझ्याचं घरातल्या अंगणातल्या आणि एका गवताच्या पात्यावरील दवबिंदू. एक दवबिंदू..  ज्याचा इवल्याशा परिघात भोवतालचे सारे  जग प्रतिबिंबित झाले होते. रविंद्रनाथ टागोर 🌱🌱🌱🌱🌱 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 गेल्या काही वर्षांत.. बकेट-लिस्टमध्ये अनेक ट्रेक असे लायनीत उभे आहेत. कधी कोणाचा नंबर लागेल.. हे काही सांगता येत नाही. बरं.. काही ट्रेक तर अनेक वेळा ठरवून पुढे ढकलत आलो आहोत. पण 2022 वर्षात पेंडींग लिस्ट मार्गी लागत आहे.हे मात्र खरं. ☘️ यातल्या काही नियोजनात विजय गुर्जर  (पुणेकर व्हाया सदाशिव पेठ) हा माझा भाचा सतत संपर्कात असतो. त्यामुळे आशेला धीर असतो. आणि धीराला शाश्वती असती.👍😀 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 " जावळीचं खोरं " म्हटलं की सह्याद्रीचं रौद्ररूप आणि घनदाट जंगल डोळ्यांसमोर उभं रहातं. मग आपसूक शिवकाळातला तो काळ आठवतो जो...