डेरा/सिद्धगड माची/लिंगी खिंड/उंबरा/दमदम्या/वरसदारा
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️ भल्या सकाळी बोरवाडीत:मागे सिद्धगड 🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️ बोरवाडी -डे-याची वाट-सिद्धगड माची-नारमाता मंदिर -लिंगीची खिंड -लिंगीची वाट-जाकमाता मंदिर -किर्ड्याचं जंगल -उंबाराची वाट चढाई-भट्टीचं रान -दमदम्या-वरसदारा वाट उतराई-भाई कोतवाल स्मारक शेवट (स्थानिक भागात " वरसदारा" किंवा वारसदार असाही शब्द संबोधला जातो.) -------------------------------------------------------------------- अंजनेरी, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भिमाशंकर,महाबळेश्वर हि ठिकाणे बहुत करून धार्मिक स्थळांचे प्रबळ दावेदार आहेत. पण आम्हा ट्रेकर्स जमातीच्या दृष्टीने ती ट्रेकिंगची मर्मस्थळे आहेत.याचं सगळ्यात लक्षवेधी कारण म्हणजे इथल्या माथ्यावर जाण्यासाठी चोहूबाजूने वाटा आहेत.त्या वाटा असण्याची महत्वाची कारणे म्हणजे सुसह्य दळणवळण. आणि गुरेढोरे चारण्यासाठी ढोरवाटांच जाळ. हल्ली आमचं सगळं लक्ष अश्या वाटांवर लागलं आहे. कुठे वाचलं,कुणी सांगितलं की आम्ही सुटलो तिकडे. त्यामुळे सह्याद्री, भौगोलिक परिस्थिती,आणि चौफेर मुलुख अध...