1 : लोभस : लोभी अर्थात लोणावळा ते भिमाशंकर
लोभस..लो-भी ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ भाग १ ला ..प्रकाशन 1 आक्टोंबर : शुक्रवार 🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬 नमस्कार मंडळी.. कसे आहात..? ट्रेक करता ना..? ट्रेक केलेचं पाहिजे..🤷 नाही तर फिट कसे रहाणार..💪 तर..निघा 🚶🚶🚶🚶 ☘️ " तीन ऋतुतले सहा सुख-सोहळे अनुभवायचे असतील तर, सह्याद्री सारखी दूसरी जागा नाही. ऋतुबदलांची बदलणारी कुस आणि आपसूक सह्याद्रीचा बदलत जाणारा रंगमंच, जो याची डोळी अनुभवतो.. तो सह्याद्रीच्या अपार प्रेमात पडतो. ☘️ त्याचा निसर्गाकडे आणि जिवनाकडेही बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि जगण्याचा भावार्थही. त्यांच बघणं,त्याचे विचार,त्याचं वागणं, त्याचा दृष्टिकोन, आणि त्याचं व्यक्तिमत्त्व.. सारं काही वाईड अँगलमध्ये रूपांतरित होतं जातं. आणि.. कालांतराने आनंदाची..सुख समृद्धीची व्याख्याचं कुस बदलत जाते. ☘️ निसर्ग आणि सह्याद्री यांचा स्वर्ग-निर्मितीचा अनोखा मिलाप जगण्याचे रंगही बदलत जातो. म्हणून.. निसर्ग हिचं देवता आहे. आणि "सह्याद्री" हे त्याचं प्रतीरूप 🙏☘️ ★★★★★★★★★★★★★ प्रत्येक ऋतूत ट्रेक करण्याची एक वेगळीचं नशा असते. पण पावसाळ्यात ती अधिकचं धुंद ...