Posts

Showing posts from September, 2022

चिंब नात्याची वीण..आठवणींचा धांडोळा

Image
चिंब नात्याची वीण " -------------------- 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 बरीचं वर्ष हाेत आलीत कॅमेरा हातात येऊन. इतकी की जेव्हा ताे हातात येताे तेव्हा ताे शरीराचाचं भाग बनुन जाताे आणि आपसुक मेंदूशी त्याचं नातं जाेडलं जातं.. बॅगेत असताे तरी ताे एखाद्या प्रियसीच्या आठवणीं सारखा सतत मनांत घर करुन रहाताे. गळ्यात अटकताे तेव्हा स्वत:ला विसरायला लावताे. अनाहूतपणे निसर्गाशी तार छेडली जाते निरागसपणाने.. मनांत चैतन्याचा उत्सव सुरु हाेताे. फाेटाेग्राफी निमित्त कितीतरी भटकंती झाली याला काही सिमाचं नाही.. पण भर पावसाळ्यात बेधुंद पणाने कॅमेरा गळ्यात टाकून अनं डाेक्यावर छत्रीचं छत्र घेऊन फाेटाे काढण्याच्या कितीतरी आठवणीं अश्या गाेळा झाल्यात. या क्षणी ..! मृगाच्या ओंजळीतनं वसुंधरा चिंब भजली नी आठवणींचं कडबाेळ सुट्ट झालं...! 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 असेचं पावसाळी दिवस. पहिल्यांदाचं हरीश्चंद्राच्या वाटेला लागलाे. साेबतीला माझ्यासह काही हाैशी मित्र.. माेसम तसा एैन भरा...