Posts

Showing posts from February, 2022

खुट्टेदार-डोणेदार :अफाट सह्याद्री दर्शन

Image
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 आनंदाचे अनेक अंतरंग आहेत. अनेक पदरही आहेत. मात्र .. अंतरंगाच्या गर्भगृहात जाता यायला हवं. गेलात तर आयुष्य जगण्याचा एक निर्मळ मार्ग गवसतो. तो मार्ग अनेकांचा वेगवेगळा असू शकतो. तरी.. तो मार्ग तुम्हाला आनंदघनात चिंब भिजवून टाकत रहातो.. जगणं सुंदर होऊन जातं. ☘️ मला असाचं एक मार्ग सापडला .. तो डोंगर भटकंतीचा. गडकिल्ले, घाटवाटा, निसर्ग, प्राणी, पक्षी,झाडेझुडपे, खळखळाट हे त्याचेच तर पदर आहेत. आणि, या मार्गाने 'आयुष्य' एका बहारदार टप्यावर आणून सोडलं आहे. जिथे..ना स्पर्धा, ना असूया,ना जात धर्म ना उच नीच,ना कोणी मोठा ना छोटा. सब घोडे बाराटक्के..🙏 ☘️ ढाकोबाचं गारूड अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलयं. दहा अकरा वर्षापूर्वी कै.जोशीकाकांच्या नेतृत्वाखाली खुट्टेदार/दा-याघाटचा ट्रेक केलेला.तेंव्हापासून त्याच्या आसपासच्या अनेक पदरात भटकून झालं. तरी त्याचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही.☘️ तर.. खुट्टेदार पुन्हा डोकावला.🏔️ या रे या सारे.म्हणतं. जुन्या जमान्याची टिम ओसरली. नवे तजेलदार भिडू उभे राहिले. पुन्हा भिडण्याची सळसळ अंगात संचारू लागली. मग नव-नव्य...