तवलीची नाळ/तासाचा घोघळ (घाटघर रेंज)
ब्लॉग क्र.१०६ डिसेंबर ४ /२०२२ रविवार ⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️ ⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️ दमदार व दमछाक भटकंती 🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃 पहिल्यांदाच कुणा ट्रेकर्स जमातीची पाऊलं पडली अशी तुफान भटकंती. 💢 " विळ्याचा दांड.. चढाई मांजरपुड (सपाटी सह कारवी जंगल) तवलीचा घोघळ चढाई बिन्नीची खिंड.. तासाची नाळ उतराई माशेराई जंगल .. हिवाळा माळरान..घाटघर 💢 अलंग-मदन-कुलंग च्या दक्षिण कवेत सामावलेली हि भटकंती दिर्घकाळ स्मरणात राहील अशीचं.. ह्या काही घाटवाटा म्हणता येणार नाहीत. पण घाटघर परिसरातून अमकु च्या खिंडीत जाण्यासाठी वाटेवर या येऊन मिळतात. स्थानिकांच्या दळणवळणाच्या वाटाही म्हणता येतील. ऐतिहासिक संदर्भ नसले तरी भटकंती मात्र तुफान आहे.😃 ⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️ ⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️ " तुझं माझं जमेना.. तुझ्या वाचून करमेना...😀 अशी आमची गत झालेली. भंडारदरा परिघात गेल्या १९/२० वर्षांपासून भटकतोय.. तरी हा संपूर्ण परिसर बघून होईना. हर एक अंगाने फिरतोय. तरी.. सोबतचे भिडू म्हणतात "बास झालं आता. पुन्हा इकडे येणं नाही. ...