तवलीची नाळ/तासाचा घोघळ (घाटघर रेंज)

ब्लॉग क्र.१०६

डिसेंबर ४ /२०२२ रविवार
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️

दमदार व दमछाक भटकंती 
🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
पहिल्यांदाच कुणा ट्रेकर्स जमातीची
पाऊलं पडली अशी तुफान भटकंती.
💢
" विळ्याचा दांड.. चढाई
मांजरपुड (सपाटी सह कारवी जंगल)
तवलीचा घोघळ चढाई
बिन्नीची खिंड..
तासाची नाळ उतराई 
माशेराई जंगल .. हिवाळा माळरान..घाटघर
💢
अलंग-मदन-कुलंग च्या
दक्षिण कवेत सामावलेली 
हि भटकंती दिर्घकाळ स्मरणात
राहील अशीचं..
ह्या काही घाटवाटा म्हणता येणार नाहीत.
पण घाटघर परिसरातून
अमकु च्या खिंडीत जाण्यासाठी वाटेवर 
या येऊन मिळतात.
स्थानिकांच्या दळणवळणाच्या वाटाही
म्हणता येतील.
ऐतिहासिक संदर्भ नसले तरी भटकंती मात्र
तुफान आहे.😃
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
" तुझं माझं जमेना..
तुझ्या वाचून करमेना...😀

अशी आमची गत झालेली.
भंडारदरा परिघात गेल्या १९/२० वर्षांपासून 
भटकतोय..
तरी हा संपूर्ण परिसर बघून होईना.
हर एक अंगाने फिरतोय.
तरी..
सोबतचे भिडू म्हणतात "बास झालं आता.
पुन्हा इकडे येणं नाही.
पण,मी आपला नवीन काही मिळतं का भटकायला.
म्हणून..सारखा आस लावून असतो.
गुगल..भटकत असतो.😀

विल्सन डॕमच्या 
पश्चिम आणि उत्तर -दक्षिण बाजूंनी
विविध रंगी-ढंगी वाटा प्रवरेचं गमक आहे.
पुन्हा पुन्हा जावसं वाटवं असं.
तेही सहा ऋतुंचे सहा सोहळे साजरे करत.
त्यांत विल्सन डॅम हे 'अस्सल बावनकशी २४ कॕरेट"
कोंदण आहे.
💢
गेल्या काही वर्षांपासून..
अलंग मदन कुलंग..
कळसूबाई, रतनगड,पाबरगड..
सोडून चौफेर भटकंती सुरू आहे.
अगदी,
डुक्कर दारा,देवीघाट,चौंडे घाट,उंबरदारा घाट,
काळदारा,बैलघाट,करवलीघाट,निसणीची वाट,
पारव्याची धार,किर्डा,साकिर्डा,मग कधी उडदावणे ते इंदोरे
तर कधी घाटघर ते आंबेवाडी,कधी घाटघर ते कुरंगवाडी तर कधी जामुंडे ते घाटघर.
अश्या अनेक आडवाटा धुंडाळून झाल्या.
तरी,
इथलं रामायण काही संपता संपेना.
💢
गेल्या मोसमात..
घाटघर ते आंबेवाडी हा क्राॕस कंट्री
जंबो ट्रेक करतेवेळी बिन्नीच्या खिंडीतून
पुर्वेकडे एक घळ खाली सुटलेली दिसली.
तेंव्हा वाटाड्या लक्ष्मणने हि तवलीची नाळ आहे.
एवढचं सांगितले होते.बघताक्षणी धस्स झालं.वाटलं
नव्हतं कधी या वाटेने चढाई करू.
💢
कालांतराने घाटघरचा एकनाथ शी..
नवीन काही शोधलं का रे ?
संवाद झाला.तसा तो नेहमी होतो.
तर,त्याने तवलीची नाळ किंवा वाट
आणि तासाचा घोघळ बाबत माहिती दिली.
आणि,
जायचा प्लॅन फायनल केला.एका परिसरात तुम्ही जितके चौफेर फिराल तितका भूगोल तुमचा कळतं जाईल.
💢
गेल्या दोन रविवारी
पाथरा-उंबरदारा नी एकतंगडी -शिवाजीघाट
हे दोन तगडे ट्रेक झाल्याने अंगात सळसळ
भरून होती.मग..चलो घाटघर
म्हणतं.. गेल्या रविवारी घाटघर गाठलं.
नेहमीचा वाटाड्या एकनाथ दूस-या ग्रुपबरोबर
गेलेला.मग त्याचा मोठा भाऊ लक्ष्मण होताचं.
त्यांच्याबरोबर आधी घाटघर ते आंबेवाडी हा ट्रेक
केलेलाचं होता.त्यामुळे ट्युनिंग होतचं..
💢
एकनाथच्या घरी नाश्ता करून पारव्याच्या धारवाटेवरून
निघालो.समोर प्रथमदर्शी पारव्याची धार नी
पार्श्वभूमीला महाकाय अमकू भाईलोग उभे.
वाट मस्त मळलेली.रानक-यांचा हायवे.
गुरं चारणे,लाकुडफाटा गोळा करने,
किंवा कुरंगवाडी,आंबेवाडीकडे ये-जा करने.
यासाठी या वाटेचा उपयोग होतं असावा.
💢
एव्हाना..पारव्याची धारेकडे जाणारी वाट डावीकडे
मागे पडली.आणि आम्ही जणू सह्याद्रीच्या बाहुपाशात
सामावलो जातो की काय अशा भन्नाट वाटेवर आरूढ झालेलो.
डावीकडे पारव्याची धार, मग बिन्नीचा डोंगर..कुलंग नी समोर
महाकाय मदन किल्यासह आजुबाजूचे सवंगडी नी उजवीकडे
अलंग किल्याची जिवघेणी कातळभिंत.
तिनं बाजूंनी खडा नजराणा बघत आम्ही वेडेचं झालो होतो.
सह्याद्री किती अंगाने आणि विविध ऋतूत किती न्याहळावा..!!!
सदा सर्वदा योग तुझा घडावा...
तुझे कारणी देह माझा पडावा..!!
💢
या ओळींनी भावनिक बंध अधिक घट्ट होऊ लागले.
वेड लागलं ते याचं कारने.
हेचं सत्य आहे 🙏.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
"एका खुबसुरत पठारावरील चाल तर आनंददायी.
आणि आता डावीकडे तिरकस चाल ठेवत कारवीच्या
जंगलात घुसलो.(वेळ १०:२८ )सावली नी गार वारा सुखदायी.
इकडे हळूवार चढाई सुरु झालेली.पुढे ती पुन्हा डावीकडे वळाली मग पुन्हा उजवीकडे.वाट एकेरी नी अस्पष्ट.फारसा वावर नसल्याचे लक्षात आले.अर्ध्या तासात मांजरपुडच्या पठारावर आलो.पठार कसलं जंगलचं ते.इथे अगदी किरकोळ चढाई उतराई.पण उंच कारवी ची सोबत असल्याने सुसह्य.
कधी आकाश मोकळे झाले की उत्तर -पुर्वेला मदन आणि अलंगचा व्हू आकर्षित करत असे.मग दोन चार फोटो काढले की परत कारवीत गुडूप व्हावे.मस्त दमदार चाल.कधी मोकळ्या तटावरून,कधी कारवीच्या दाटीतून.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
आणि मांजरपूडने निरोप घेतला.(वेळ ११:३९ )
डावीकडून पश्चिमेस तवलीचा घोघळ आमची वाटचं बघत होता जणू.
आता ख-या अर्थाने चढाईचा येळकोट सुरू झाला.
वाटचं नव्हतीचं समोर.लक्ष्मण वाट तयार करत पुढे जात होता.
मागे आम्ही.एका टप्यावर कारवी रान संपलं नी समोर दोन बाजुंनी कातळभिंत नी मध्ये दगडांच खच भरलेली उत्तुंग वाट उभी.आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य भाव आणि आनंद ओसंडून वाहत होता.
वाह... क्या बात है!!!
प्रत्येकाच्या तोंडी हेचं वाक्य.
आता अश्या नजरसुखावणा-या घळी सवयीच्या
झालेल्या.तरी प्रत्येक ठिकाणी आनंद तो वेगळा.👍
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
तिथेचं फलहार,चहा पाणी झालं.(वेळ १२:१०)
आल्हाददायक हवेमुळे थकवेचा मागमूसही नव्हता.
पण...पुढे घळीतली खडी कातळचढाई आव्हान देत होती.
दोन ठिकाणी रोप लावावा लागला.
गरज नसली तरी आधार व सेफ्टी साठी हवाचं तो.
हेल्मेट आणायला हवं होतं असे वाटलं.
नवीन ठिकाणी सावध असावं.
याची नोंद घ्यावी लागली.
Safety first..
हा अलिखित नियम पाळला जावा.
हे काटेकोर लक्षात आलं.
दोन ठिकाणी वाटाड्याने रोप सोडला.
त्याच्या सोबत डॉ.भोजराज यांनी मदतीचा
हात देत चढाई सुरक्षित केली.डाॕ.तसे उत्साही व
दमदार.अशी माणसे सोबत असावीत.
आम्ही ब-याचं वेळा फोटोग्राफीत मग्न असतो.
कुठे अॕंगल शोधत भिरभिरत असतो.

दमदार चढाई करत बिन्नीडोंगराच्या खिंडीत येऊन धडकलो.
शेवटच्य  टप्प्यात हवा नसल्याने दमछाक झाली.
रानझाडी व सोबत कारवी असल्याने सावली होती.
पण वाट अडचणीची व कसरत करायला भाग पाडणारी.
त्यात ७० किंवा ८० अंशात चढाई.
जवळपास दिड तास लागला या तवलीची नाळ
चढायला.त्या आधीचा हिशोब वेगळा.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️

खिंडीतून डावीकडे बिन्नीचा पहाड उंच.
तर उजवीकडे कुलंगकडे जाणारी कळंबीची वाट.
खिंडीतून उत्तरेकडील दाट कारवीतनं दहा मिनिटांची चढाई केली की कळंबीची वाट सुरु होते.ती पुढे कुलंगच्या पोटावरून मदन व अलंगकडे जाते.
💢
पश्चिमेस तासाचा घोघळची थेट उतराई गरगरायला
लावणारी.(वेळ १:४०)
आयला..इथून उतरायचं ???
आ वासून सर्व निरखुन बघत होते.
परतीचे दोर कापले गेलेले 😀
पर्याय एकचं.
तासाचा घोळात घोळ घालणे.😀
Water break आणि चटरफटर हाणलं.
खाली मधल्या पट्ट्यात सावली दिसत होती.
तिथेचं जेवायला बसू.असं ठरलं...
नी उतराई सुरू झाली.
पहिला टप्पा तर बसून उतरलो.
८० अंशात घसरडी उतराई तुम्ही उभे राहून
उतरूच शकत नाही.इथे तशी परिस्थिती.
खालच्या टप्यात मात्र कारवी होती सोबतीला.
बाकी प्रकरण अवघडचं होतं.
८० अंशात एकवेळ चढणं सोपं.
पण उतरणं अवघड.वरून सुटलेले दगड येण्याची शक्यता अधिक.त्यामुळे सर्व काही सावधान क्रियेत.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
इथे तर मध्ये राॕकपॕचेस होते.मग सोडा दोर नी उतरा.
दगडांचा खचं नुसता.किधर से भी उतरो..
मधल्या पट्ट्यात एक राॕकवर जेवणं उरकली.
जरा आराम करून पुन्हा उतराई.
इथे पारव्याच्या धारेकडून एक वाट येऊन मिळते.
पुढे ती छोटा कुलंगच्या पोटावरून हिवाळा पठारावर उतरते.
ती वाट आम्ही अनुभवली असल्याने आज अर्धवट राहिलेला
तासाचा घोघळ पुर्ण करूया.असं मनोमन ठरलं.
आणि याने वेळही कमी लागणार होता.वेळ (२:५०)
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
" आता ही वाट तर अजूनचं खडतर.
उजवीकडे इथे पाण्याचा ओघळ अभिषेकी होता.
तरी बाटली भरण्या इतपत होता.
बाकी कुठेही पाणी नाही.
शेवटचा टप्पा नेहमीप्रमाणे जरा कंटाळवाणा.
दिड तासानंतर माशेराई जंगल सुरु झालं.
एकदाची उतराई संपली होती.
हुश्श करत सुसाट सुटलो.
जंगली रान नी थोरली झाडें यातनं
अस्पष्ट वाट हिवाळ्या धबधब्यापर्यंत गेलेली.
तिथं पर्यंत पोहचायला तिसरा प्रहर उलटला.(४:१२)
पाठीमागे चंद्रकोर 🌙 कुलंग खुबसुरत.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
हिवाळा पाणसाठ्यावर डुबलो.
थकवा पळाला.
" सुख " हेचं ते.😀
याशिवाय दुसरा शब्द नाही.
डॉ.स्मिताने सर्वांना चहा दिला.
तरतरी आली.(वेळ ४:५०)
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
५ वाजले..भगवी किरणे परतीचे बिगुल वाजू लागली.
परतीची ओढ प्रत्येक वेळा हळवी करते.
बाहेर कितीही रमलं..
तरी.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
गोरजसमय.. घरची आठवण करून देते.
दिवसभरानंतर माहोल कातर होतं जातो.

" या चिमण्यांनो..
परत फिरा रे..
घराकडे... आपुल्या..
तिन्ही सांजा.. जाहल्या

लता स्वर .. कानात गुणगुनू लागतो.
कडा ओलावत जातात..😥
💢💢💢
निसर्गाची हिचं तर किमया आहे.
जी आम्हाला जिवापाड आवडते.

तासाभरात घाटघर गाठलं.
फॕशनेबल Black tea चे घोट रिचवले.
नी
मावळतीच्या मंद प्रकाशात घाटघरचा निरोप घेतला.
(वेळ ६:२५ )
🙏🙏🙏

# समाप्त #

संजय अमृतकर 🚩
GypsyS
Nashik 
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
दिनांक: ४ डिसेंबर/रविवार
भिडू: ११
डॉ.स्मिता, डॉ.अविनाश, डॉ.मनोहर, डॉ.भोजराज
संस्कृती,रोहिणी,सचिन,वरद,परम,पलाक्ष मंत्री,
संजय अमृतकर
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
The end 🙏


Comments

  1. सुरेख शब्द रचना 🙏फोटो तर भन्नाट

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लिखाण . Photo's पण सुरेख आहेत. Great नाना श्री 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..