Posts

Showing posts from November, 2022

भाग २ पाथरा/ उंबरदारा घाट

Image
नमस्कार मंडळी.. नोव्हेंबर २९ ला ह्या ट्रेकचा पहिला भाग प्रकाशित केलेला. http://sanjayamrutakar.blogspot.com/2022/11/blog-post.html आज २ रा भाग.. 🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️ " ब्लॉग लिहिणं म्हणजे आठवणींची फ्रेम दिवाणखान्यात लावण्यासारखी... ती फ्रेम वर्षानुवर्षे तुम्हाला आणि तुमच्या घरी येणा-यांना कुतुहलाची आणि सतत डोळ्यासमोर असते.ती फ्रेम तुमच्या दिवाणखान्याची शोभा  वाढवतेचं पण तुम्ही अनुभवलंय ते इतरांना प्रेरणादायी ठरू शकतं.साहसी संस्कारांची बीजे तर अश्याचं मार्गांनी रोवली जातात. मग, कधीकाळी वटवृक्ष होतो त्याचा 🙏 💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢 रविवार २० नोव्हेंबर २२ " पहाटे ४ वाजता प्रसादने सर्वांना उठवलं. गारठा खूप नव्हता..तरी जरा कंटाळा आला होता उठायचा. पण पुढचं नियोजन बघता सकाळची आवराआवर केली पटापट.चहा वैगरे होईपर्यंत भरलेल्या सॕक लाईनीत उभ्या राहिल्या.अरूणोदय व्हायची वेळ साधली नी पाऊलं उंबरदारा कडे निघाली.वेळ ६:४५ . अतिशय प्रसन्न व आल्हाददायक वातावरण. उगवतीच्या रंगांचे विलोभनीय रागरंग अनुभवायला मनं अतुर झालेलं.फार दिवसांनी असा योग ...

अचाट पाथरा / उंबरदारा घाट

Image
भाग १ :पाथरा घाट/उंबरदारा घाट 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 लता गुणगुणत होती.. " ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे.. आभाळागत माया तुझी आम्हावरी.. राहू दे.. अभिषेकी लता स्वराने मनाच्या गाभाऱ्यावर  ताबा मिळविला होता.. गाभारा तर चिंब भिजत चाललेला.. पण मनंही गहिवरून आलेलं. अगदी..पाथराच्या उत्तुंग तटावर बसलेलो असतानाही..! केवढी ताकद या शब्दांमध्ये,आवाजामध्ये आणि कंपोझिशनमध्ये. कुठल्याही वेळेला हवंहवंसं वाटणारं हे गाणं. याक्षणी गुंतवून टाकत होतं. " मी आभाळी राहीन...पाताळी नजर लावीन " समोर खोल अचाट मुलूख क्षितिजापर्यंत टेकलेला. दूरवर माळशेज घाटाचा उत्तरार्ध अस्पष्ट होतं जाणारा. घाटेची सांजरंगी चित्रमयी शिखरे देखणी पण मती गुंग करणारी. यांत इतिहासाची किती तरी गुपीत दडली असणारं. भोवती घाटवाटांच मोहळ जमलंय. आमच्या सारख्या ट्रेकर्सचा आत्मा इथल्या अणूरेणूत भटकत असतो. जिवंतपणी 😀. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 चौफेर सह्याद्रीचे अजस्त्र कडकपार  निजण्याच्या तयारीला लागलेले.. आणि इकडे.. सूर्यास्ताचं विलोभनीय दर्शन मनांत खोलवर रूजू प...