एकतंगडी/शिवाजी घाट

" एकतंगडी/शिवाजी घाट "

(ब्लॉग क्र.१०५ )

माळशेज रेंज 🚩

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
या ओठांनी चुंबुन घ्यावी.. हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी ..इथल्या जगण्यासाठी...!!

शब्दरचना कोणाची ?
याक्षणी तरी माहिती नाही..
पण अरूण दातेंचा आवाज अंतर्मनाच्या गर्भगृहात
घुमतोय..आणि
एकतंगडीच्या घाटेत..
अश्रूंना वाट मोकळी करून द्यावीशी वाटली..

अर्ध अधिक आयुष्य तर या इथल्या मातीतला
बेलभंडार उधळत चाललंय..
इथल्या उत्तुंग कडे कपारी, इथल्या शिळा,इथली झाडेझुडपे
इथली हवा नी इथली माती..
यांना हजार वेळा चुंबन घ्यावं..ममत्वाने
आणि,
आयुष्यातली सुख दुःखे भिरकावून द्यावीत
या इथल्या भर्राट हवेत..!!!

नतमस्तक व्हावे..हजारदा 🙏
पुन्हा.. पुन्हा

या जन्मावर...या जगण्यावर
शतद: प्रेम करावे..!!!
💢💢💢💢💢

एकदा ट्रेकिंगचं वेड लागलं की ते व्यसनासारखं
सुटता सुटत नाही.(एक वेळ दारूड्याचं व्यसन सुटेल 😀)
तसं घाटवाटांच वेड.
तुम्ही एकदा घाटवाटांच्या प्रेमात पडला की
तुमचे तुम्ही रहातं नाही.
इथे विरहभंग, प्रेमभंग वैगरे होण्याचा काही प्रश्न नाही.
तुम्ही फक्त प्रेम करतं रहायचं..तो दान टाकतं रहातो.
बास ..
💢💢💢
कै.अरूण सावंत सर्वांसोबत तीन वर्षांपूर्वी माकडनाळ
ट्रेक करण्याचा योग आला.म्हणजे ऐनवेळी आमच्या नियोजनात सुरज मालुसरेनी सरांना लिडरच्या जागी आणून आश्चर्यकारक धक्का दिला होता.
तर शेंडीसुळक्याजवळ मुक्कामी होतों तेंव्हा.
भल्या सकाळी सरांनी समोर दिसणा-या माळशेज रेंजमधील
काही वाटांची ओळख करून दिली.त्यावेळी "एकतंगडी" घाट शब्द मनात घर करून गेला.एकतंगडी म्हणजे काही तरी विशेष असणार.म्हणून लवकरच जाऊ असं मनोमन ठरवलं.कालांतराने अरूण सरांनी अनपेक्षित जगाचा निरोप घेतला.पण त्यांच्या तोंडून एकतंगडी ऐकलेला शब्द कानात ठाण मांडून बसलेला.
💢
मागच्या रविवारी पाथराघाट करून उंबरदारा घाट उतरताना वाटाड्या मनोजशी गप्पा मारताना एकतंगडीचा विषय निघाला.मनोज म्हणाला 'मी केलाय.
मी" जायचं पुन्हा.
तो ' हो.. म्हणाला.
आणि,
लगेचं येणाऱ्या रविवारी एकतंगडी सोबत शिवाजी घाट करण्याचं नियोजन पक्कं झालं.
💢
रविवारी २७ नोव्हेंबर.
पहाटे ४:१५ वाजता निघायचं ठरलं.
१२ भिडू.तयार
पण गाडी ड्रायव्हरने टांग दिली.
दूसरा ड्रायव्हर शोधून तो तयार होईपर्यंत वेळ गेला.
नी.. नाशिक सोडायला ६ वाजले.
नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीर म्हणजे फार झाले.
तरी,
जल्लोष करत प्रवास सुरू झाला.
फार तर रात्र होईल उतरायला.यापेक्षा काय ते ?
यावर एकमत झाले.

वाशाळाफाटा मार्ग पकडला.
डोळखांबहून तळेगांव येथे भरपेट नाश्ता करून मोरोशी गाठलं.
दरम्यान वाटाड्या मनोजचे सारखे फोन सुरू.
ठरल्याप्रमाणे एक तास उशीर झाला.
मोरोशी पोलीस चौकी इथे मनोजला सोबत घेतलं नी,
माळशेज घाटात एका व्हू पाॕईंट थांब्याजवळ गाडी पार्क केली.
💢💢💢
सॕक स्थिर स्थावर करून मनोजच्या मागे चालू लागलो.
वेळ : ९:३०
तर हायवेवरूनचं समोरच्या झाडीत मनोज घुसला.
या...मागं.
म्हणून आम्हीही घुसलो.
इथं तर थेट चढाई सुरु झाली होती.
माळशेज हायवेच्या लगतचं एकतंगडी घाटाची थेट चढाई सुरु होते.याचं मलाचं फार अप्रूप वाटलं.
बरं,
हा असा पहिलाच घाट बघितला की जो टार रस्त्यापासून थेट चढाव सुरू होतो असा.वाॅर्म अप वैगरे काही भानगड नाही.
थेट भिडा नी चढा 😀
💢💢💢

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

चढाई सुरु झाली.
पण वर टप्प्यांचा अंदाज काही येईना.
झाडींनी वेढलेली चढाई.
वाट होती.पण आडवीतिडवी.कुठे अस्पष्ट.
लहान मोठे दगड सोबतीला.आणि जंगल चढाई.
अगदी सुरुवातीला दमछाक टप्पा पार पडला.
कुठे दहा, पंधरा फुटांचे राॕकपॕचेस यायचे.
पण कसरत करत पार व्हायचे.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

💢 कुठे ऐसपैस जागा किंवा पठार नाही.
एखाद्या राॕकपॕचवर बसायचं, किंवा टेकायचं.
पाणी पिणं, संत्री मोसंबी वैगरे हाणायचे नी
पुन्हा चढाई सुरु व्हायची.
दोन तासांच्या सलग चढाई नंतर एक
आश्चर्यकारक घळ समोर आली.
दोन डोंगरांच्या मधून माथ्याकडे नेणारी घळ नव्हती तर ती
घाटवाटचं होती.अगदी ऐसपैस अशी.

झाडोरा संपला.
आता आकाश मोकळं दिसू लागलं.
आणि,
चौफेर व्हू सुद्धा.
पाठीमागे (उत्तर दिशेला)नाप्ता व कुटुंबकबिला धूरकट वातावरणात
अस्पष्ट दिसत होते.आणि समोर दोन डोंगरकड्यांना छेदत
एकतंगडी घाटवाट माथ्याकडे झेपावलेली.

माकडनाळ करून शेंडी सुळका पार करून हरीश्चंद्रगडाच्या
पोटावर मुक्काम केलेली ती जागा नी अरूण सरांशी संवाद झालेली ती जागा दूरवर स्पष्ट दिसत होती.व्हू-पाॕइंट झक्कास मिळाला नी क्लिककिकाट सुरू झाला.बराचं वेळ मोकळ्या अश्या टप्यावर बसलो.थोड्या गप्पा, हलकंफुलकं खाणपान,आणि फोटोग्राफी.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

.               एकतंगडी..😀

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

💢 वेळेचं भान राखत जागा सोडली.
नी, दमदार राॕक चढाई सुरु झाली.
आता थेट शेवटच्या टप्प्यात दाट झाडी दिसतं होती.
बाकी मधला टप्पा अगदी कातळांनी सजलेला.
गुयरी वाटेची आठवण यावी असा.पण तितका हा सलग नाही.
ते प्रकरण अजून भयंकर आहे.पण त्याला साजेशी कातळचढाई.मदमस्त.पावसाळ्यांत इथलं रौद्र काय असेल या कल्पनेने धस्स झालं.

' अर्ध्या तासात माथ्यावर पोहोचलो.
वेळ : ११:५८ मिनिटे
ऐसपैस पठार.
उजवीकडे भोजदराचा उत्तुंग पहाड.सुळक्यासारखा बुलंद.डावीकडे घोण्या डोंगराचा पहाडी नजराणा सुखकारक.त्या पलीकडे दौंड्या पहाड.

💢

नांगरदारच्या पुर्वेला असलेला दौंड्या.
जुन्या आठवणी उफाळून आल्या.
पठारावर घुटमळलो.
दक्षिणेकडे खाली दूरवर तळेरान गांव असल्याचं मनोजने
सांगितलं.इथून तासाभरात तिथे पोहचता येतं.त्या पलीकडे निमगिरी, हनुमंत गडाचा डोंगर दृष्टीक्षेपात होता.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

💢 सगळा परिसर इथेच्छ न्याहाळत हाकेच्या अंतरावरील
वस्तीवर जेवणासाठी थांबलो.
चार पाचं घरांची वस्ती.
झाडाखाली जेवणावळ बसली.
वेळ: १२:३९
उनं होतं.पण हवा खेळती.
जरा आराम करून पुर्वेकडे निघालो.
वाटेत एक आजी बक-या चारायला घेऊन आली होती.
अय दादा" फोटू नको काढू.
म्या साडी ठिक नाय.
आयला..ह्या म्हातारीला लईचं कळतं राव.
तरी,एक फोटू हाणलाचं.
पलीकडे एक स्री खळ्यावर तांदूळ काम करत होती.
एक शानदार फोटो काढत निरोप घेतला.
कसायला जमीन हवी.
शेतकरी राजा कुठेही शेती करु शकतो.
हे मात्र नक्की.🙏

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

💢 आता मळलेल्या वाटेने पुर्वेकडे चढाई सुरु झाली.
मला वाटलं एकतंगडी माथ्यावरून पुढे शिवाजी घाटाची
उतराई असेल.पण इथे चढाईचा स्रोत अजून सुरूचं होता.
उनं माथ्यावर पण सोबतीला झाडोरा.
माळशेज घाटाचे गगनभेदी पहाड आणि आम्ही त्यांना
आता डावीकडे ठेवत सुसाट निघालेलो.
घसरडी उतराई कधी लागली समजलंच नाही.
कारवीच्या दाटीतनं सापवळणाची उतराई जरा
कस बघणारी.
आणि,
आकाश मोकळं झालं.
डावीकडे दूरवर
माळशेज घाटातील गाड्यांची वर्दळ नी
पलीकडे हरिश्चंद्रगडाचा पॕनोरामीक व्हू
डोळ्यांच पारणं फेडणारा.
पुढे वेगवेगळ्या टप्प्यांवर हा व्हू अजूनचं
नजाकतीचा होतं जाणारा.
सह्याद्री वेडावून टाकतो तो याचं कारणांनी.
कितीही थकलं तरी अश्या अचाट व्हूंनी
थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
नी भटकंती सार्थकी लागल्याचे भाव
आनंदाचं झाड फुलवण्यासाठी पुरेसे ठरतात.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

पुढे अदृश्य वाटेने थेट दोन पहाडांच्या खिंडीत खाली
उतरत शिवाजी घाटाच्या माथ्यावर आलो.म्हणजे गायदरा पठारावर.पुर्वेला उधळ्या उत्तुंग.आणि पश्चिमेस तिवई डोंगर.जेथून आम्ही गायद-यात उतरलो.आता येथून माळशेज घाटात उतरायला दोन वाटा फुटतात.एक शिवाजी घाटातून.दूसरी उजवीकडे..जी घाटातील बोगद्याच्या पलीकडे उतरते.आम्हाला शिवाजी घाटाची आस होती.😀
वेळ : २:५०
तिथे उरलंसुरलं घरून आणलेलं संपवलं.
पाण्याचे घोट रिचवले नी,
दाट झाडीतनं उतराई सुरू केली.
आता परतीची वाट गवसली होती.
वाट वापरातली वाटतं होती.
पण राबता असेल असं काही जाणवतं नव्हतं.
स्वच्छता असल्यामुळे अंदाज आला.
कुठेही घाण किंवा मनुष्य ये-जात असल्याच्या
खुणा नाहीत.
बरंच आहे.येत असले तरी जाणकार असावेत.

तासाभरात थोरली झाडांचा गराडा पडला दाट.
दूरवर खाली गाड्यांचे आवाज ऐकू येऊ लागले.
घाट संपत आल्याची जाणीव झाली.
एका स्वच्छ पाण्याच्या बांधीव कुंडाजवळ
नैसर्गिक मिनरल पाण्याचा इथेच्छ स्वाद घेतला.
चवचं न्यारी.
घरील अॕक्वा फिल्टर पेक्षा भारी पाणी.
तिथेचं खाली डावीकडे उंचावर दोन तीन कोरीव टाके
दिसत होते.पाण्याची प्रशस्त व्यवस्था केलेली.
याचा अर्थ पुर्वी हा घाट चांगलाच वापरात असावा.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

पंधरा मिनिटांत हायवेवर येऊन धडकलो.
घड्याळात ४:०५ मिनिटे झाली.
जवळपास ७ तासांची चढाई उतराई
आनंददायी आणि अनेक कंगोरे फस्त करणारी.
भौगोलिक ज्ञानात भर टाकणारी.
हमरस्त्यावरूनचं थेट चढाई आणि
त्याचं रस्त्यावर थेट उतराई.
फार कमी ठिकाणी अश्या घाटवाटा असतील.

गाडी बोगद्याजवळ उभी.
मनोज म्हणाला " जवळचं हाय.जाऊ पायी
मग बोगद्याजवळील माळशेज व्हू पाॕइंट भटकलो.
फोटो काढणे.. भत्ता खाणे कार्यक्रम आटोपला.
टपरी चहा पिऊन शहापूर रस्त्याला लागलो.

💢💢💢💢💢

माळशेजचं अंतरंग किती रंगढंगांनी भरलयं..
या विचारांनी स्तंभित व्हायला होतं.
टार रस्त्याचा घाट नव्हताचं तेंव्हा इथलं जनजीवन आणि
दळणवळण किती खडतर असेल.
याची कल्पना येते.
काळू खोरे,मुळा खोरे, नी प्रवरा खोरे म्हणजे
आम्हा ट्रेकर जमातीसाठी जीव की प्राण.
इतिहास,भूगोलाची किती मर्मे दडली आहेत ह्या
खो-यांमध्ये.
हा सगळा सिन्यारियो डोळ्यांपुढे तरळला तरी
अंगावर शहा-यांचं मोहळ उठतं.
रोमांच उभे रहातात.
सह्याद्रीनामा डोळ्यांसमोर तरळून जातो.
🙏

GypsyS 🚩

संजय अमृतकर
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
ट्रेक दिनांक: २७/११/२२ रविवार
सोबती : र्ठ्ठ..१/ हर्षद भट, विठ्ठल सोनवणे सर,विजय पवार सर, संस्कृती वाणी, रोहिणी जैन, रोहित सातव, पलाक्ष मंत्री,परमभाय,श्रीकांत पाटील,संजय अमृतकर
            🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

           
The End..

Comments

  1. छान लेख... याच एकतंगडी वाटेला भोजदरा घाट असेही म्हणतात.. घाट चढून आल्यावर चेरोबा देवाचं ठाणं आहे...पूर्वी सावर्णेहून घाटावर तळेरान व बगाडवाडी भागात जाण्यासाठी या भोजदरा व शिवाजी घाटाचा वापर होईल. आता माळशेज घाटरस्ते झाल्यामुळेच दोन्ही वाटा गाडी मार्गावर येतात. असो लेख वाचून या दोन्ही वाटेच्या ट्रेक आठवणी जाग्या झाल्यात.

    ReplyDelete
    Replies
    1. शिवाजी घाट सावर्णेपेक्षा थितबी किंवा वाघ्याच्या वाडीची मंडळी जास्त वापरत. तळेरान गाठायला सावर्णेकरांसाठी चंदनकडा आणि वाघदगडकरांसाठी नांगरदार या वाटा होत्या.

      Delete
    2. धन्यवाद योगेश आणि दिलिप सर..तुमच्या प्रतिक्रिया आनंददायी आहेत.🙏

      Delete
  2. एकदम दमदार भटकंती!👌

    ReplyDelete
  3. लिहिते रहा. आनंद वाटताय..

    ReplyDelete
    Replies
    1. सर,तुमचे आशिर्वाद 🙏

      Delete
  4. अप्रतिम लिखाण, ओघवती सफर, चौफेर फोटोग्राफी, धडाडते साहस

    ReplyDelete
  5. आशा घाटवाटा तुडवण्याचा आंनद नानाबरोबर करणे म्हणजे एक पर्वणीच असते, लिखाणाची ओघवती शैली घाटवाटेची सफर घडवून आणते सोबत डोळ्याचे पारणे फेडणारे फोटो सोबत न जाताही ट्रेक केल्याचा आंनद देते
    नाना असच लिहीत रहा व आठवण आली की आम्हालाही सोबत घ्या
    खुप मजा आली, आपले लिखाण असेच बहरत राहो

    ReplyDelete
  6. छान लिहिलंय नाना

    ReplyDelete
  7. मस्तच... आम्हाला पण blog च्या माध्यमातून ट्रेकला जाण्याचा अनुभव घेता आला. सहज-सुंदर लिखाणशैली . सोबत उत्कृष्ट फोटोग्राफी.

    ReplyDelete
  8. अतिशय सुरेख लिखाण नानाश्री.....
    तुमच्या लिखाणातून एकतंगडी घाटात जाऊन आल्याचा आल्हाद दायक अनुभव मिळतोय.प्रत्यक्ष जाण्याचा अनुभव शारीरिक कसरत करणारा ठरेल...
    कै.अरुण सरांचा उल्लेख वाचून वाचनाची इच्छा अतिशय तीव्र झाली..... आणि तुमच्या शब्दांनी ती पूर्ण झाली....

    ReplyDelete
  9. सही ! खुप सुंदर लिखाण नाना श्री....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..