अंगठेसरी/नाळेचीवाट भाग 2

ब्लॉग भाग 2
★★★★★★
अंगठेसरी / नाळेची वाट
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🌼
दिवस दुसरा ..
☘️
भल्या सकाळी
गजबजाटने जाग आली.
रात्री मस्त झोप झाली.
त्यामुळे नवा दिवस.. नवा उत्साह
बाहेर.. लख्ख उजाडलेलं.
जावळीच्या तळहातावरची सकाळ..
ऐतिहासिक पदर असलेली.
ठरवूनही इतिहास पाठ सोडायला तयार नाही.
मराठ्यांचा इतिहासचं तसा आहे.🚩
🌼
अंगणातून पुर्वेला पर्वत्या लखलखत होता.
आठ एक वर्षापूर्वी सलग दोन वेळा पर्वत्याच्या दारी
आलेलो.एकदा बामणोलीहून बोटने तर दूस-यांदा
खेडहून रघुवीर घाटाने.मुक्काम होता आरव गावांत.
दूसरा चकदेवच्या जंगमवस्तीवर.
सारा सिनँरियो उलगडू लागला.
आणि..
आठवणींचा जागर बेलभंडार उधळू लागला.
कै.अविनाश जोशीकाकांची आठवण आज
हळवी करून गेली.
तेव्हा तेचं आमचे लिडर.
मितभाषी ☹️ पण आभ्यासू.. मायाळू ..🙏
☘️
चहा-पोहे-गरमागरम दूधाची न्याहरी झाली.
आणि..
निरोपाची वेळ झाली.आतिथ्य/आपुलकी यांचा
संगम आणि जावळी पाहुणचार आटोपून मामांचा
निरोप घेतला.
सह्याद्रीने अशी सोन्यासारखी माणसे जन्माला घातली.
उपकार आहेत आमच्यावर.🙏
🌱
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
पाऊलं नाळेच्या वाटेवर चालू लागली.
गाडीरस्ता पुढेपर्यंत गेलेला.
हा रस्ता येतो कुठून..?
तर कळालं की तुम्ही रघुवीर घाटाने शिंदी गावातनं 
सरळ कांदटला येऊ शकता.
वाह...!!! क्या बात 👍
इकडे हाकेच्या अंतरावर दाट वनराईत 
निरपजीचं पुरातन मंदिरात गेलो नी मतीचं गुंग झाली. 
काय तिथलं वातावरण वर्णावं !
दिवसा इतकी निरव शांतता आणि भक्तिरसाने
न्हाऊन निघालेला माहोल.
चौफेर वनराई.
नि:शब्द ...!!!
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🌼 " जगातली सर्वोत्तम जागा वाटली.
रहाण्यासाठी.. मुक्कामासाठी.
पक्षांचे असंख्य आवाज..
रानझाडांचा झाडोरा.
सह्याद्रीचा फेर..
नी..इतिहास-स्पर्श तोही शिवकाळाचा.
याहून काय सुंदर असू शकतं..!
मनाला हवं असलेलं.सुखावून टाकणारं.
पाऊलं हलत नव्हतं तेथून.
पुन्हा पुन्हा मागे वळून बघत पुढे चालू लागलो.🚶
पाठीमागे चंद्रराव मो-यांचा पडका वाडा अजूनही
वैभवाच्या आठवणीत तग धरून आहे.
काहीही असो..
ह्या वास्तू जपून ठेवायला हव्यात.
खरी मंदिरे तर हिचं.🙏
🌱
आता ख-या अर्थाने 
परतीच्या वाटेला लागलो.
काल तिन्हीसांजेला त्या उजवीकडच्या
धारेने उतरलेलो.
आता थेट सरळ पश्चिमेला
कांदटच्या ओंजळीतनं कांदोशीला
उतरणार होतो.
मन जरा कावरबावरं झालेलं.
का कुणास ठाऊक.
हळवेपणाने मिटी मारली होती जणू.
जावळीनल्या हवेने भारावून टाकलं
होतं.
मनं सारखं विचारायचं..
शिवकाळातला काय असेल इथे ???
खरं आहे.. कल्पनाविलासात रमू या जरा.
तेवढचं आपल्या हाती आहे आता..☹️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
विरळ झाडीतून वळणदार उतराई.
झाडीतनं झिरपणारं सकाळचं उनं मनोहरी.
सोनेरी गवताचा गालीचा मुलायम.
नितळ पाण्याचे डोह लागले.
शिळांची नैसर्गिक कलाकृती कमाल.
जरा क्लिकक्लिकाट झाला.
आणि इथूनचं डावीकडे 
एक वाट तेलसरी वाटेकडे जाते.
शेवटी..उतरते ती कांदोशी खो-यात.
(खरं तर आम्ही तेलसरीने उतरणार होतो.
पण वाटेत अनेक थोरली झाडे कोसळली आहेत.
त्यामुळे उतरणं मुश्कील..इती.वाटाड्या)
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
दूसरी ..सरळ नाळेच्या वाटेला भिडते.
पुढे कांदाट खो-यात वाहणारे नदीपात्र
भल्या शिळांनी भरलेलं.
इथल्या टप्प्यात पाणी साठे मुबलक.
फोटोंचा सारखा क्लिककिकाट 📸
🌱
पुढे उजवीकडे तिरकी वाट खाली नेणारी.
आणि इथून नाळेची उतराई ख-या 
अर्थाने वाटू लागली.
खोल उतराई पुढे चिवळ होत गेलेली.
ब-याचं नाळा वा वाटा सुरूवातीला
चिवळ मग मोकळ्या होतं जातात.
इथे उलटा प्रकार.
☘️
इथली वाट अशी फक्त एकेरी पाऊलवाट..
ऐसपैस नाही.
कारवीसोबत सावली.
त्यामुळे उन्हाची धग कमी करणारी.
यामुळे पाऊलं ताल-सुरात
रिदममध्ये उतरत होती.
दोन तीन ठिकाणी कसरत करत
उतरलो.तर एका ठिकाणी रोप लावला
आधारासाठी.बहुतांश अनुभवी भिडू असल्याने
कुठे फारसा वेळ गेला नाही.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
मग तिथून थेट खोल उतराई.
दगडांचा खच होताचं सोबतीला.
जरा मोकळ्या ठिकाणी सर्व विसावलो.
मग भेळभत्ता,संत्री,मोसंबी, लाडू,खजूर
उरलं-सुरलं,जपून ठेवलेलं ते बाहेर निघालं.😀
अनेक असं जपून ठेवतात सँकमध्ये.
कधी वाट चुकलो..दुसऱ्या काही अडचणींमुळे
वेळ लागला तर भुकेची अडचण नको व्हायला.
म्हणून जो तो सावध असतो.
पण इथे सर्व बाहेर आलं.
धोका असंभव होता आता.😀
इकडे पोटाला आधार.. जीवाला आराम.
☘️
तेथून थेट पायथा गाठला.
ऐन पावसाळ्यात
वरून येणाऱ्या अनेक प्रवाहांमुळे
नदीपात्र काय भरून वाहत असेल
याची सहज कल्पना आली.
मग कधी उजवीकडे 
कधी डावीकडे मळलेली जंगलवाट नी 
नदीपात्राची सोबत करत भर उन्हात
कांदोशी गाठलं.
दुपारचे 12:55 मिनिटे झाली होती.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
मागे वळून बघितलं.
काल सकाळी निघतांना बघितलेला
समोरचा पहाडी नजराणा नी,
आज बघत असलेला सेम.
पण याक्षणी चढाई-उतराईचे अनेक
थरार क्षण आणि तिथल्या कुशीतली
मायेची सह्यमय उब हलवून गेली.
☘️
कुठे रहातो...कुठे फिरतो
भटकून परत कुटुंब कबिल्यात सामिल होतो.
गरज म्हणून की मजबूरी..?
खरं मनं रमत इथे.
सहा ऋतुंचे सहा सोहळे
अनुभवत आहोत या सह्य कुशीत
तरी.. आस कधी कुठे भरून पावत नाही.
सतत ओढ लावत रहाते.व्याकूळ करून टाकते.
मनं गुंतत जात ते,
या अफाट सह्याद्रीच्या गोकूळात.
केवढी विविधता.. केवढा निसर्ग
माणसं मात्र संवेदनशील..एकसारखी.
🌱
चला...निघायला हवं..

उनं अंगावर नी तापलेलं वातावरण.
मंदिराच्या अंगणात पाणवठ्यावर डुबलो.
आवराआवर झाली नी कांदोशीचा निरोप
घेतला.
मस्त गांव.सुरेख मंदिर.
आठवणीत रहाणारं.
🌱
खेडला जेवलो.
नी महाड ओलांडून नाशिककडे सुटलो.
रात्री कल्याण जवळ शालू हाँटेलवर पुन्हा पोटोबा केला.
नी धमाल करत रात्री 2 वाजता नाशिक गाठलं.
🙏🙏🙏

🏔️ ट्रेक दिनांक 12/13 मार्च 2022 शनिवार/रविवार.
प्रस्थान मात्र 11 मार्च शुक्रवारी सायंकाळी.
★ 
सोबती 17 : डॉ. शिरीष घन,भारत बोरसे,आरव मंत्री, परमभैय्या, संजय अमृतकर
■ दिलिप गिते,जगन्नाथ पाटील,अँड.सावंतसर,
नितिन नवले,भट साहेब.
★ संदिप काकड,रत्नाकर भामरे,पंकज घुगे,
    मनोहर दरगोडे,सुदाम धोंडगे,सचिन भावसार,
    प्रा.विलास पाटील सर.
★ पुणेकर : तुषार कोठावदे, प्रशांत कोठावदे,प्राजक्ता सर,विजय गुर्जर,अमित मराठे,संदीप वडस्कर.
■ सुरज मालुसरे 
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
भाग दूसरा समाप्त 🙏

वाचा..काही चुकलं असेल तर कळवा.
सुधारता येईल.सुधारणा करता येईल.

धन्यवाद

संजय अमृतकर
Gypsy trekker
nashik 🚩
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
समाप्त 🙏😀

Comments

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..