Posts

सह्यांकननामा भाग ३

Image
सह्यांकननामा भाग ३  डिसेंबर/२५ रविवार..५ वा/शेवटचा दिवस .. -------------------------------------------------------------------- ⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️ नमस्कार मंडळी.. आज अखेरचा भाग ३..प्रकाशित करत आहे. २ -या भागात कारकाईपासून सुरू झालेला प्रवास खराटदरा, खिरेश्वर हून डोरमाता कॕंम साईट मग हडसर करून पुन्हा डोरमाता मुक्काम.. मग निमगिरी किल्ला-दौंड्या करून पाचकेवाडीत मुक्काम.आज शेवट भोजगिरी करून शेवट अर्थात समारोप. ---------------------------------------------------------------------- शेवट म्हटला की हुरहूर काहूर माजवते. मनांत कालवाकालव सुरू होते. सह्याद्रीची कितीतरी वेगळी रूपं.. आणि अचाट व्हू बघायला मिळाले यावेळी. याचं अप्रूप आजही आहे. हि रूप पुन्हा पुन्हा आणि विविध ऋतुत बघायला मिळावित म्हणून हा भटकण्याचा आटापिटा चाललाय.. निस्सीम प्रेमासारखा.. ⛩️⛩️⛩️ भल्या सकाळी टेंटमध्ये उठून बसलो.. अश्विन व किरण अगोदरचं बाहेर पडलेले.. मी एकटाच... तेव्हा चार दिवसांच्या आठवणींच गाठोड पुन्हा पसरवून बसलो.लहान मुलासारखं अस्तव्यस्त करून. डोळे बंद करून आठवून घेतलं सारं. पुन्हा गाठोड बांधल

" सह्यांकननामा "२०२२ भाग २

Image
ब्लॉग २ रा.. (सह्यांकन दिवस ३ रा..) --------------------- नमस्कार मंडळी.. सह्यांकन मोहिमेचा पहिला ब्लॉग आपण  वाचलाचं असेल.वालीव-हे येथून सुरू झालेलं  सह्यांकन सादडे -करपदरा-हपाट्याचाकडा-सितामाईचा डोंगर मग १ ला मुक्काम तिथे पायथ्याशी. २रा दिवस कोथळेचा भैरवगड मग कारकाई माथा. मुक्काम कारकाई. आज तेथून पुढील सह्यांकननामा.. डिसेंबर २३..शुक्रवार  (मुक्काम : कारकाई टाॕप ) 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 सह्यांकनचा तिसरा दिवस. रात्री छान झोप लागली.काल दुपारनंतर तसा आरामचं होता. सुर्यास्त बघण्यासाठी जी चाल झाली तेवढीचं. त्यामुळे खुप थकवा नव्हता.तरी.. सह्यकुशीतलं झोपेचं सुख अनुभवता आलं. प्रियसीनंतर सर्वोत प्रिय ती झोपचं.😀 पहाटे ५:३० चा वेक अप. आज चक्क बेड टि मिळाला..लई भारी वाटलं राव. सह्यांकनमध्ये असे लाड कधी अनुभवले नव्हते. कॅंपलिडर गाडगीळांनी सढळ हस्ते उधळण केलेली. बाहेर गारठा असल्याने तो चहा सुखावणारा. मग गारठ्यात टेंट बाहेर पडलो. मग ब्रश वैगरे सोपस्कार.. बाहेर गार वारा झोंबणारा.कारकाई माथ्यावर मुक्काम असल्याने हवेतला थंडावा अधिक दमदार होता.