सह्यांकननामा भाग ३

सह्यांकननामा भाग ३ 
डिसेंबर/२५ रविवार..५ वा/शेवटचा दिवस ..
--------------------------------------------------------------------
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️

नमस्कार मंडळी..
आज अखेरचा भाग ३..प्रकाशित करत आहे.
२ -या भागात कारकाईपासून सुरू झालेला प्रवास खराटदरा,
खिरेश्वर हून डोरमाता कॕंम साईट मग हडसर करून पुन्हा डोरमाता मुक्काम..
मग निमगिरी किल्ला-दौंड्या करून पाचकेवाडीत
मुक्काम.आज शेवट भोजगिरी करून शेवट अर्थात समारोप.
----------------------------------------------------------------------
शेवट म्हटला की हुरहूर काहूर माजवते.
मनांत कालवाकालव सुरू होते.
सह्याद्रीची कितीतरी वेगळी रूपं.. आणि
अचाट व्हू बघायला मिळाले यावेळी.
याचं अप्रूप आजही आहे.
हि रूप पुन्हा पुन्हा आणि विविध
ऋतुत बघायला मिळावित म्हणून हा
भटकण्याचा आटापिटा चाललाय..
निस्सीम प्रेमासारखा..
⛩️⛩️⛩️
भल्या सकाळी टेंटमध्ये उठून बसलो..
अश्विन व किरण अगोदरचं बाहेर पडलेले..
मी एकटाच...
तेव्हा चार दिवसांच्या आठवणींच गाठोड
पुन्हा पसरवून बसलो.लहान मुलासारखं अस्तव्यस्त करून.
डोळे बंद करून आठवून घेतलं सारं.
पुन्हा गाठोड बांधलं.
हेचं तर पुढच्या आयुष्यात पुरून उरणार.
मग..कशाला भौतिक सोस..
हेचं शाश्वत..!

बाहेरील गरबडीने डोळे उघडले.
कडा ओलावल्या होत्या.
दोन आसू घरंगळू दिले..
निचरा झालेला होता आपसूक..!
⛩️⛩️⛩️
आज भोजगिरी माथा सर करायचा असल्याने त्यासाठी
जाऊन येऊन ३ तास पुरेसे.त्यामुळे सगळं निवांत चाललेलं.सकाळी चहा/नाश्ता करून 
९ वाजता भोजगिरीकडे कूच केली.
आज चक्क.. ' साप 'भालेराव सर सोबत होते.
त्यामुळे सर्व टिममध्येचं उत्साही वातावरण.
पंधरा मिनिटे सरळ चालीनंतर डावीकडे 
जंगल चढाई सुरु झाली.मळलेली पण घसरडी वाट.
आणि वळणाची.झाडोरा ब-यापैकी होता.
झाडांची कत्तल न थांबलेली.
त्याच्या खाणाखुणा टिकून आहेत.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️

अर्ध्या तासानंतर आकाश मोकळे झाले.
मग तासाभरांत खिंडीत आलो.पलीकडे माळशेज,
हरिश्चंद्रगड कुटुंब कबिला व्हू अफाट.
खिंडीतनं उजवीकडे पठारावरून तर चौफेर व्हू जबरदस्त.
थेट मुळा/प्रवरेच्या खो-यातील उत्तुंग गडकोट आणि
डोंगर माथे उजळून निघाले होते.
४ दिवसांपूर्वी शुभारंभीचा सादडे घाट,सितामाईचा डोंगर,
कारकाई डोंगर,खिरेश्वर सारा भटकंती व्हू डोळ्यासमोर उभा ठाकलेला.अफाट,अचाट ७० एम एम नजराणा डोळ्यांच पारणं फेडणारा.
एका मोकळ्या जागेवर निवांत बसले सर्व.
सारा पट साठवत ..
खाली पायथ्याला माळशेज घाट रहदारी मुळे
जिवंत वाटत होता.
गप्पा रंगवत परतीला निघालो.
जड पाऊलं..
गुंतलेलं मनं..
आणि..
परतीची ओढ.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
ट्रेक करून १२ वाजता साईटवर परतलो.
मग सामानाची आवराआवर सुरू झाली.
माहेरवाशीण सारखी.ती माहेरी येते आणि बालपणासारखं सारं अस्तव्यस्त करते.सासरी जायला निघते तेव्हा पुन्हा सामानाची जुळवाजुळव/आवराआवर सुरू करते.
तशी अवस्था..! 
सॕक पॕक झाली.मग..
जरा आराम ..मग जेवण ..नंतर सहका-यांशी निरोपाच्या गप्पा.आग्रहाने जेवण वाढणा-या मैत्री व 
 ३ वाजता एक किमी चालून जात गाडीपाशी पोहचलो.निरोप द्यायला आमचा लिडर विजय गुर्जर आणि कॕप लिडर आलेले.
टाटा..बाय बाय झाला
आणि..
बस..निघाली

निरोप. 

शब्द उच्चारला तरी ताटातूट, दुरावा, विरह याची जाणीव होते. निरोपाचे क्षण जवळ येऊ लागले की समोरचे वास्तव, ती व्यक्ती, तो सहवास, तो प्रसंग हे सारं मनाच्या कप्प्यांमध्ये खोलपर्यंत साठवून घ्यावं असं वाटतं.कारण निरोपानंतरचा काळ खूप कठीण असतो सावरायला अन् सांभाळायलाही. निरोपाचे क्षण असतातच तितके हळवे,मनात कालवाकालव करणारे.भविष्यातल्या आठवणीत गुंतवून ठेवणारे.


एक सह्यांकन... 
पुन्हा आठवणींच्या कप्प्यात विराजमान झालं.
सोबतच्या सहकार्यां इतकेचं सारे चक्रम मैत्र जीवांचे झाले.
पडद्यावरचे आणि पडद्यामागचे सर्व चक्रम परिवाराचे मनापासून आभार 🙏.घेतलेला वसा असाचं सुरू ठेवा.
आमच्यासारखे तमाम सह्यप्रेमी तुमच्या सोबत आहेत.
सह्याद्री इतकेचं तुम्ही आम्हाला प्रिय आहात.
एवढचं 🙏

धन्यवाद

संजय अमृतकर 🚩
जिप्सी ट्रेकर
नाशिक 
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
---------------------------------------
सह्यांकन २०२२
अंतर - ५७ किलोमीटर

दिवस पहिला - वालीवऱ्हे - सादडे घाट - करपदरा - हपाट्याचा कडा - सितामाईचा डोंगर
दिवस दुसरा - कोथळे - भैरवगड - कारकाई डोंगर [सीतेचा डोंगर बेस ते कोठले - जीप ने प्रवास]
दिवस तिसरा - कारकाई - खराटदरा - खिरेश्वर ..
खिरेश्वर ते डोरमाता मंदिर(जीप ने प्रवास)]
दिवस तिसरा - डोरमाता - हडसर - डोरमाता.
दिवस चौथा - डोरमाता मंदिर - निमगिरी - दौंडया - पाचकेवाडी
दिवस पाचवा - पाचकेवाडी - भोजगिरी - पाचकेवाडी
------_--------------------------------------------------------
समाप्त 🙏
Photo Gallery
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️

Comments

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..