आडराईच्या अंगणात..

भटकंतीनामा...🚩

आडराई अंगणात...
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
20/09/2021 सोमवार
⚠️नमस्कार सह्यमित्रांनो,
खरं तर गेल्याचं वर्षी आडराई भटकंती झालेली.
पण सोशल मिडियामुळे तिथे गर्दी नको व्हायला.
म्हणून.. ब्लॉग लिहिणं टाळलं होतं.
पण तिथे नंतर गर्दी होऊ लागली.मग आता लिहा.
म्हणून ब्लॉग तुमच्या समोर 😀
वाचा निवांत.
प्रतिक्रिया द्या 🙏
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
☘️ गेल्या काही वर्षात पाऊस,
फार खट्याळ झालाय.
ठरल्याप्रमाणे वेळापत्रक न पाळण्याचा जणू त्याने चंगचं बांधलाय.
कधी वळवाच्या सरी घेऊन..तो मे महिन्यात कोसळतो..
कधी प्रेयसीसारखा प्रतिक्षेत नखशिखांत बुडवितो..
कधी मृगनक्षत्रावर धुवांधार बरसतो..
कधी आळशीमुलासारखा मृग कोरड घालवत..
उशिराने तडतडतो..
तर कधी..मनमौजी सारखा 
हवं तेवढा...हवं तेव्हा कोसळतो..

म्हणून... पाऊस खट्याळ झालाय.⛈️
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️🏞️
■ आता बघा ना..
शुक्रवार व शनिवारचा अनपेक्षित पडणारा पाऊस बघून आम्ही आनंदून गेलेलो.की माळशेज रेंजमध्ये रविवारी धुमधडाका पाऊस अनुभवायला मिळणार.ठरवून रविवारी प्रभातकाळी नाशिकहून निघालो,तर सकाळपासूनच आकाश साफसफाई झाल्यासारखं स्वच्छ.तरी आशा होती की तो तिथे घाटात आपल्याला गाठणार.
पण निराशेचेचं ढग दाटून आलेले.स्वच्छ कारभारामुळे आकाश नवनवलाईसारखं नव कोर वाटणारं.
मात्र..
फोटोग्राफीक लाईटने जणू मनाचा पुढचा दरवाजा उघडला नी निराशेचे लोट परतीला निघाले.उत्साहाचे तेज चौफेर उमलू पहात होते.आणि हिरवा निसर्ग आमच्या स्वागताला जणू Green carpet टाकून प्रतिक्षेत असल्यासारखा वाटू लागला.आडराईची वाट सुखाची वाटू लागली.

🌧️🌧️🌧️🌧️🌧️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
☘️ माळशेज रेंज म्हणजे माझा विकपाँइंट.
जसा...
महाबळेश्वर रेंज,भिमाशंकर रेंज,भंडारदरा रेंज तसा.
तर..
माझा जिवलग भाचा विजयने पुण्याहून टपाल पाठवली.
नाना..
कोरोनामुळे सहा महिने भेट नाही... ट्रेक नाही
तर ..
आपण भेटू या का..?
माळशेज रेंजमध्ये आडराई परिसरात एक धमाल जंगल वाट आहे. जाऊ या का ?
आता विजय जेव्हा प्रश्न टाकून विषय मांडतो ना.
तेंव्हा समजायचा आयडिया भन्नाट असेल.
अनुभवाने लगेच होकार.आणि नियोजनाची जुळवाजुळव सुरू झाली.
☘️ नाशिक पुणे सह्यमित्रमंडळाचे आधारस्तंभ हरहुन्नरी तुषार कोठावदेशी लगेच बोलून विजयप्लँन तडीस नेण्यावर शिक्कामोर्तब करून घेतलं.
ठरल्याप्रमाणे पारंपरिक नाश्ता ठिकाण आळेफाट्याला नाशिक पुणेकरांचा मिलन सोहळा हाँटेल गुरूदेव येथे ठरला.नी अर्धातास उशिराने भेट झाली.चंदनपुरी घाटात दोन धबधब्यांनी आमची वाट रोखली.जरा फोटोग्राफी झाली.त्यामुळे आम्हाला पोहचायला उशीर झाला.
☘️
तर..कोरोनिशिस्तीला उडवून लावत नाशिक पुणे भिडू गळाभेट निमित्ताने भिडले.आणि मिसळ..इडली वर ताव मारत सकाळची ढवळाढवळ करून घेतली.नी सुसाट खिरेश्वर गाठलं.कमळू वाटाड्या बेलपाड्यातनं खिरेश्वरला मुक्कामीचं आलेला.तो आमचा ठरलेला सोबती.
☘️
खिरेश्वर मंदिराजवळ गाड्या पार्क करून आडराई वाटेवर रूढ झालो.कमळू त्याच्या एका नातेवाईकाकडे मुक्कामी होता.ते नातेवाईक त्याला सोबतीला होते.तिथे सर्वांचा चहा झाला.जवळचं काळ्या कातळातलं महादेवाचं प्राचीन मंदिर आहे.मंदिर छान.. टुमदार.तिथे सर्व घुटमळलो.क्लिक क्लिक करत पुढे मार्गी लागलो.
☘️
या परिसरात अनेक वर्षांपासून अनेक वेळा येण जाणं होतंय.तरी अनेक आडवाटा नी डोंगर पायाखालून घालायचे बाकी आहेत.आडराई तसा माझ्यासाठी नवीन परिसर.त्यामुळे कुतुहूलता होती.हरिश्चंद्रला घेऊन जाणारी टोलारखिंड,जुन्नर दरवाजा,बालेकिल्ला,तारामती शिखर नजरेच्या सीमेत.आणि मंदिराच्या पश्चिमेला जाणारी एक वळदार वाट आडराई कडे जाणारी.
☘️
वातावरण लख्ख.डोळ्यात सर्व सामावत असताना दूरवर ढगांचे लोट माळशेज घाटावरील पहाडांना लगट करत विसावू पहात होते.सुंदर नजराणा पेश येत होता.तशी आमची पाऊलं वेग धरु लागली.डावीकडे कमाल निसर्ग नटू लागलेला.पिवळी रानफुले नी हिरवाशार गालीचा आणि डोंगरी नजराणा वेडावू पहात होता.सह्याद्री भटकंतीने किती आनंद दिला. याची मोजदाद कशी करणार..?
☘️
प्रत्येक वेळी तो वेगळ्या रूपात भासतो.ऋतुबदलांच सौंदर्य न्याहाळायचं कसं ते सह्याद्रीने आम्हाला शिकविले.त्यामुळे नजर पारखी झाली.त्यातनंच माणसं वाचायला शिकलो.आनंदाची वारकरी वाट सह्याद्रीच्या द-याखो-यांत माथ्यापासून तळापर्यंत जाऊन भिडली.वाड्या पाड्यांच्या अंतर्मनात पोहचली.
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
☘️ 
★ तिकडे प्रसन्न हवामानामुळे सर्वांच्या आनंदाला उधाण आलेलं.डावीकडे निमुळत्या उतारावर हिरवा गालीचा लोळत झोकून द्यावं असा.दूस-या टप्याला खाली दक्षिणेकडे सुटलो नी काही वेळात काळूच्या धबधब्याने स्वर्गीय दर्शन दिले. सह्याद्रीच्या अफाट बाहूपाशातून तो आपला मस्तीत कोसळत होता.शोले पिक्चर जेंव्हा मिनर्व्हा मध्ये ७० एम एम बघितला होता.तेव्हा जे वाटलं त्याहूनही हा नजराणा अफाट होता.मती गुंग व्हावी.
एखाद्या निसर्गमयी चित्रकाराने आपल्या कुंचल्याने स्वर्गीय निसर्ग उभा करावा.तसं जिवंत दृश्य साक्षात आमच्या समोर उभं होतं.
☘️
दोन चार क्लिकनंतर माझा मीचं स्तब्ध झालो.
डोळ्यातही साठवू या हे दृश्य.
आत खोल ह्रदयाच्या तळापर्यंत नेऊन ठेऊ ..
तिथेचं जपून ठेऊ या.हवं तेंव्हा पुन्हा बघता येईल.
आठवणींच्या कँनव्हासवर गोंजारताही येईल.
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
चौफेर नजर हळूवार फिरत होती.
विधात्याने आमच्यासाठी आपलं ठेवणीतलं दान टाकलं होतं.
स्वच्छ... सुंदर..! मोहक..आणि स्वर्गरूपी..!
डोळे ओलावत होते...अंगावरचे शहारे जागे झाले होते.
भान हरपून बसलो होतो मी..
इतर सहकारी तर वेडेपिसे झालेले.
खरंच..आनंदाच आभाळ भरून आलं होतं.
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
टप्यावरून दक्षिणेकडे एमटीडीसी परिसर,माळशेज घाट पुर्ण डोळ्यात सामावत होता.उजवीकडे दूरवर मोरोशीचा भैरवगड या अफाट पटलावर क्षुद्र भासत होता.दौंड्या डोंगर मात्र आकर्षक रूपात.ढगांची एक तालेवार रांग त्याच्या माथ्याशी स्पर्शून जात क्षितिजापर्यंत टेकल्यासारखी वाटत होती.घाटातल्या गाड्या मुंग्यासारख्या भासणा-या.
☘️
उत्तरेला उतुंग काळभैरवी पहाड,रोहिदास सुळका नी हरिश्चंद्र गड रांगही ढगात गुडूप झालेली.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रोहिदास घळीतनं उतरलो होतो.तो रूट कुतूहलाचा होता.या दोघांत माळशेजच्या द-याखो-या अगदी स्पष्ट दिसणा-या.सारा मुलूख हिरवाचिंब.वनखाते रिसाँर्ट,थिटबी गांव.जणू हाकेच्या अंतरावर.
☘️
तेथून जड अंतकरणाने आडराईकडे निघालो.उत्तर दिशेला.पिवळी रानफुले हसत डूलणारी मोहक.मग तटावर क्लिक किकाट थांबतोय कुठे ?  एका लिमीटनंतर चला ..चला म्हणून घसा बसला.
खरं तर सारं काही विसरायला लावणारं दृश्य,आणि वातावरण होतं ते.टप्याटप्यावर विविध रंगी अँगल भारावून टाकत होते.आल्हाददायक वातावरणाने आपला दरवाजा सताड उघडाचं ठेवलेला.त्यामुळे वेळेचं बंधन सर्वचं भिडू विसरले.
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
काही वेळातचं हलक्या चढाईनंतर आडराई वाट सुरू झाली. अगदी डोंगराच्या काठावरून.पण डावीकडे दाट कारवीमुळे तिथली खोली लक्षात येत नव्हती.पुढे राईचं वन सुरू झालं.पायवाट होतीचं.पण कुठे पुसटशी.आता माहोल बदलला. मघाशी वाईड अँगल व्हू तर आता झापडबंद व्हू.खाली बघत चालायचं.कधी मान वर,आजूबाजूला वळवायची.झाडे न्याहाळायची.अनं गुमान चालत रहायचं.
☘️
सह्याद्रीत अश्या अनेक राई वाटा अजून शिल्लक आहेत.ती वने टिकायला हवीत.फुफ्फुसे आहेत ती पृथ्वीवरची.याची जाण स्थानिकांना होणं फार गरजेचे आहे. कारण आपण कधीतरी जाणार पण स्थानिक लोकांना आपलं गांव,परिसर प्यारा असतो.त्यांच्यात जागृतता आणणं अत्यंत महत्त्वाचे आहे.
असो..
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
दाट जंगलातून आम्ही तासाभरात एका खळखळणा-या प्रवाहाजवळ थांबलो.डावीकडे आम्हाला जिथंपर्यंत जायचं आहे. ती जागा स्पष्ट दिसत होती.पण सर्व खाण्याच्या मूडमध्ये.मग जेवन उरकून घेऊ.नंतर पुढे निघू.असं ठरलं.डबे उघडले.
" तीन बाजूंनी डोंगर, समोर पहाडी व्हू आणि माथ्यावरून वाहात येणारा निर्झर.
वाह..!
सह्याद्री भटकंतीत अश्या अनेक एकाहून एक सरस जागा आज याक्षणी डोळ्यासमोर ऊभ्या आहेत.काय आनंद दिला त्या क्षणांनी..!
☘️
आता जेवन उरकून निघायचं तर काही भिडू वरच्या टप्प्यावर गेले.तिथं खळखळाट बघून भिजायची इच्छा झाली नी हळूहळू सर्वचं पाण्यात डुंबू लागले.ट्रेकमध्ये हे असचं चालतं.आनंदासाठी काहीही. मग क्लिककिकाट सुरू आणि भिजणंही.
☘️
तासाहून अधिक वेळ तिथेचं गेला.अजून तशी दोन तास चाल होती.मग वेळेचं नियोजन बिघडलं.गोल साध्य केला तर परतायला अंधार होईल.बँट-या कोणाकडेही नव्हत्या.मग येथूनचं परतायचं असा निर्णय झाला.तरी आनंदाने होकार देत सर्व भिडू निघाले.तसं परतीचा गाडी प्रवासही तीन एक तासांचा त्यामुळे निर्णय योग्यचं होता.
☘️
तिसरा प्रहराने कूस बदलली नी आम्ही सुखमनाने
" आम्ही जातो आमच्या गांवा..
असा निरोप देऊन सह्याद्रीकडे पाठमोर वळून बघून घेतलं.
पुन्हा भेटीचा खलिता घेऊनचं.🙏

जय शिवराय.. जय सह्याद्री 🚩
20 सप्टेंबर 2020 रविवार
19 सोबती.
☘️ आपलाचं
" नाशिक पुणे सह्यमित्र मंडळ "

जिप्सी 🚩
संजय अमृतकर
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
The end
Thank U 🙏😀

Comments

  1. Very nice blog, as always!!!
    Nice pics...
    Wanna be there...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..