डुक्करदारा : देवीघाट

डुक्करदारा... डाबका जंगल...बेंद पठार..
जाईची विहीर... वाघ्याचं पठार...
शेळीचा मोडा...आणि देवीघाट..
★★★★★★★★★★★★★★★★★★★
घाटघर पश्चिम परिसरातील दमछाक भटकंती !
■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

" तळकोकण आणि घाटमाथा या दोन स्थळांमुळे
सह्याद्री महत्त्व कमालीचं वाढत गेलंय.
अगदी प्राचीन काळापासून तर आजतागायत.
कालमानानुसार त्यांच महत्त्व कमी होतं गेलं हेही खरेचं.
तरी आजही अनेक ठिकाणी स्थानिकांसाठी रहदारीचा मार्ग 
म्हणून त्यांचा अवलंब केला जात आहे.हेही खरे.
हल्ली आम्हा भटक्यांची ही दोन स्थळे म्हणजे जीव की प्राण.
खरा सह्याद्री कळतो तो याचं तळ आणि घाट यांना जोडणा-या मार्गांवर.सह्याद्री-अंतरंग अनुभवायला यासारखा दूसरा मार्ग नाही.
☘️
भंडारदरा परिसराचं महात्म्य दिवसेंदिवस उंची गाठत आहे.
पर्यटन अंगाने आणि साहसी अंगानेही.
पण त्याचं संगोपन व्यवस्थित होतं नाही हे मात्र दुर्दव.
खासकरून रस्त्यांची दुर्दशा तर संतापजनक.
⛰️
" हिवाळा धबधब्याचं आकर्षण आता नवनवलाईच्या 
पलीकडे गेलेलं आहे.तरी त्याच्या आसपास नवनवीन वाटा शोधण्याची व भटकण्याची उर्मी काही केल्या थांबायला तयार नाही.
गेल्या तीन ते चार वर्षात घाटघर परिसरात भटकायचा जो धडाका चाललाय तो कमालीचा अचंबित करणारा आहे.सह्याद्रीच्या अंतरंगात चढाई-उतराईच्या अनेक नाविण्यपूर्ण वाटांची रहस्यमयता 
अजून किती आणि कशी असेल ? याचं कुतुहल दिवसेंदिवस वाढत चाललंय.
🌳
" डुक्करदारा " तशी अडगळीत पडलेली खाली कोकणात 
उतरणारी अवघड वाट..सुरूवातीला नांव ऐकूणचं भारी वाटलं 😀.
वर्षीनुवर्षे वापरात नसल्याने तीची कठीण होतं गेलेली उतराई.अनुभवाला चँलेंज करणारी.दाट कारवीत तीनं स्वतःला जणू छाकून घेतं अलिप्तपणा जपलाय.त्यामुळे उतरताना कारवी शेवटपर्यंत साथ देणारी.वाट अतिशय चिवळ आणि घसरडी.
🌳
दूरवरचा व्हू मोकळा टळटळीत दिसणारा.
अगदी लादेवाडी,जामुंडे,कळमुंडे,गावांकडील कोथळे सुळक्यापर्यंत.हिरडीचादारा नी शिळ्याचादारा परिसरही दृष्टीक्षेपात.गाढवलोट घाट मात्र एका डोंगरधारेपल्याड लपलेला.
करकरीतपणामुळे आजचा सारा निसर्ग दृश्यमान.
प्रत्येक वस्तूमात्र सजग.चैतन्यस्पर्शित.
सर्वत्र एका तरळ काव्याची जणू मुक्त उधळण..!
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
खाली उतरून गेल्यानंतर..
डाबका जंगलचाल मात्र मळलेली ऐसपैस.
गुरं चारणारे इकडे वर्षभर ये-जा करत असावेत.
अनेक जुनी थोरली झाडे अस्तित्वासाठी झगडत आहेत.
बेंद पठार मात्र हिरवा गालीचा अंथरूण तुमच्या स्वागताला 
तयार आहे.अनवाणी चालावं असं सारखं वाटत होतं.
पण ट्रेकिंग करताना अश्या गोष्टी सहज सोप्या नसतात.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
डाबाच्या उत्तर-पुर्व दिशेला काठावरून हिवाळा धबधब्याचा 
" 70 एम एम " मनोहरी नजराणा केवळ डोळ्यांच पारणं फेडणारा.
उंच हिवाळा खडकावरून बेबंद कोसळणाऱ्या त्या चांदीरसाच्या
धारा सारे बेभानपणे बघत होते.अनाहत नाद.
सा-या पंचेद्रियाना वेढून टाकणारा.

" किती उंचावरूनी तू उडी ही टाकिसी खाली |
जणो व्योमातूनी येसी प्रपाता जासी पाताळी !

कोण कवीची कविता.. या क्षणी मनपटलावर उमटली.

मदमस्त माहोल. झाडांची हळूवार तन्मय सळसळ.
या वरून कातळांना भेदून येणारा धबधब्याचा वेदघोषसारखा
मंदगंभीर सरसराट.एखाद्या सौंदर्य सुंदरीकडे बघतचं रहाव असा.
हिवाळा माथ्यावरून तो जेवढा अफाट/अचाट वाटतो तितका 
तो खालूनही वाटतो.माथ्यावरून कोसळणारं शुभ्र स्पटिक पाणी 
पुढे अनेक धबधब्यात रूपांतरित होतं खाली कोसळत येतंय.
ते बघणं केवढं आनंददायी.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
तेथून परतताना वाघ्याचं पठारही सर्वांगसुंदर.
हल्ली सागाचं ऐन तारुण्यातलं जंगल तर हरखून जाण्यासारखं.
पायवाटेच्या दुतर्फा सागाचं चित्ररूप हिरव जंगल मदमस्त.
पाऊसपाण्यामुळे यथेच्छ स्नान घडल्यामुळे त्यांच घनदाट तरतरीत आकार,पानांची गच्च गर्दी सुखावणारी.प्रकाशकिरणांनी जणू सोन्याची झिलई चढलेली.त्यावेळी सागपानांची प्रकाशविन्मुख बाजू अद्भुत तेजस्वी दिसे.
🌳
मऊशार गवत आणि कधी मधून खळखळणारा प्रवाह म्हणजे,
सोनेपे सुहागा.दक्षिणेकडे परततांना डावीकडचा 
पहाडी नजराणा पुन्हा पुन्हा बघावा असा.
सारी दृश्येचं मोठी अनदेखी,आणि अनिर्वचनीय.
एका भरदार प्रवाहकाठी जोरदार अंघोळयान झालं.
सगळे येथेच्छ डुबले.बाहेर आल्यानंतर टळटळीत उनाने मात्र 
घाम काढला.
🌳
तेथून डावीकडे तिरकस देवीघाटची चढाई म्हणजे कळसाध्याय.
वापरातली असलेली ही वाट दमट हवामानामुळे छातीचा भाता फुलवून फुलवून अक्षरशः थकून गेली होती.
एका उतारावरचं पोटपूजा आटोपली.कुठे सपाट जागा नाही बसायला.फक्त चढाई आणि चढाई. दुतर्फा वनराजी फुललेली.तेवढचं काय ते सुख.बरं हवा नाही.दमटपणा अजूनचं परिक्षा बघणारा.बच्चेकंपनी जरा वैतागलीचं होती.
पण त्यांनी त्रास न देता शेवटपर्यंत किल्ला लढवला.
आमचीही तिचं अवस्था.
🌳
देवीने भक्तांची जणू परिक्षा घेण्याचं ठरवलं काय ? 
इतपत कठीण चढाई.
★ न राहून..
मै तो आरती उतारू रे..
संतोषी माता की,
जय जय संतोषी माता जय जय माँ...
🌳
उषा मंगेशकर यांनी हे गायलेलं गाणं मी किती तरी गुणगुणोलो असेल.😀 तरी माता काही पावेना आणि आमची कष्टप्रद चढाई काही संपेना.
शेवटी..
मदत करो संतोषी माता..
असा..टाहो फोडला..
🌳
आणि,
एकदाचे माथ्यावरील देवीमंदिराजवळ पोहचलो नी ..
हुश्श झालं.
मावळतीच्या रंगांनी आपलं स्केचेस बनविण्याचं काम सुरू केलेलं.आभाळात ढगांची मंद लगबग.
विधात्याचा कुंचला फिरू लागला.
आकाशाढगांचे विविध अंगी व रंगी स्केच मोहून टाकत होते.
पाऊसपरतीचा काळ जवळ आलाय.
याचं ते द्योतक तर नसावं ?
🌳
आवराआवर करून परतीला निघालो.
एका नवीन आणि दमदार ट्रेकच्या आठवणी घेऊन.
दिवेलागणीची संध्याकाळही मनात हळव्या आठवणींसारखी 
मनात अलगद उतरत चाललेली.

साता उत्तराणी कहाणी सफलसंपुर्ण 🙏😀

जिप्सी 🚩
संजय अमृतकर
© हक्क राखीव 
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮
ट्रेक दिनांक 3 आक्टोंबर 2021
प्रकाशन 4 आक्टोंबर सोमवार.
💮
सोबती : वरद/सचिन खराटे,पलाश,आरव/शिवलाल मंत्री
परमभैय्या, स्वानंद गोरवाडकर, कार्तिक, रागिणी/सुरेश दुबाले
भारत बोरसे,अमिषा अमृतकर ,आदिल मिस्री व मी.
सोबत एकनाथ खडके.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Photos Gallery 👇
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼जंगली देव..वाघ्याचं पठार..🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
Thank U..

The end 🙏

Comments

  1. नाना, खूपच छान झालाय blog

    ReplyDelete
  2. झक्कास!👌

    ReplyDelete
  3. जबरदस्त मस्त छान ट्रेक अनुभव

    ReplyDelete
  4. Very nice description Nana & beautiful photography.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..