" किर्डा " चा किडा..
ब्लॉग क्रमांक 88
प्रकाशन 13/01/22
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
“Each fresh peak ascended teaches something.” 🏔️
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किर्डा पिक..
उंची : 4952 फूट
कळसूबाई रेंज
पायथ्याचं गांव : आंबेवाडी (उत्तरेला)
उडदावणे (दक्षिणेकडे)
चाल 11:50 किमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार मंडळी..🙏
गेल्या वर्षी कळसूबाई रेंजमध्ये बैलघाट ट्रेक केलेला.
आंबेवाडी ते उडदावणे.
त्यावेळी उजवीकडे एक सुळका व शेजारी गगनभेदी डोंगर कमालीचा कुतूहल निर्माण करत होता.तोच तो अलंगच्या पुर्व अंगाला उतुंग असा किर्डा पिक.त्याचं वेळी ठरवलेलं की एकदा याला भिडायचं.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
थंडीच्या मोसमात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भटकायची एक वेगळीचं नशा असते.भल्या पहाटे कुडकुडत एखाद्या डोंगराला भिडण्याचं स्वप्न बघत घर सोडायचं म्हणजे केवळ आस असणं.ती ओढचं तुम्हाला तिथंपर्यंत नेत असते.
तर..
ठरलेला माळशेज रेंजमधील प्लँन ऐनवेळी पुढे ढकलला गेला..नी किर्डाचा किडा वळवळला.त्यांत वेधशाळेने पाऊसाचा अंदाज वर्तवलेला.तरी जायचं हे पक्क ठरलं नी भल्या सकाळी नाशिक सोडलं.थंडीचे पाश कडक.घोटीला चहा घेतला नी भावली मार्गे उडदावणे येथे जायचं ठरलं.(पिंपळगाव मोर कडचा रस्ता खराब असल्याने.)भावली ओलांडलं नी उजवीकडे कळसूचा छोटा कुलंग पर्यंतचा गोतावळा धुक्यात गुरफटलेला.आज काय पावसाळी ट्रेक होणार असं वाटू लागलं.तोचं आंबेवाडी वेशीत शिरलो.एक स्थानिक गांवकरी वाटेने चालला होता.
गाडी थांबवली नी..
" किर्डावर जाता येतं का..?माझा प्रश्न.
उत्तर : हो..मग.
धुक्यात हरवलेल्या वाटेकडे हात दाखवत होकार आला.सिताराम नामक ती व्यक्ती म्हणजे नंबर वन वल्ली.
अगदी गप्पात रंगणारी.
इतर गप्पा होईपर्यंत सिताराम भाऊने समोर उभे असलेल्या दोघांना गुर चारणा-यांना वाटाड्या म्हणून जाण्यास सांगितले. दोन पैसे मिळतील.जा सोबत.
दोघे तयार.. किती घेणार..?
काही ठरलं नाही. पण सोबत ठरली..!
दोघे जवळील घरी गेले.निरोप द्यायला.
तोपर्यंत आम्ही गाड्या मैदानात पार्क केल्या.
सँक पाठिवर करकचून आवळल्या गेल्या..
नी मघाशी धुक्यात हरवलेली महाकाय कळसूबाई रेंज
मोकळी होऊ लागली.धुक्याचा पडदा बाजूला सरकू लागला.
तसं एक ड्रमँटिक चित्र तयार होऊ लागलं.
आकाशाला भिडू पहाणारे उतुंग डोंगर आणि
वेढा मारलेले धुक्याचे लोट भन्नाट दिसत होते.
मोबाईल कँमे-यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला.
काही वेळात सुर्याजीराव कळसू डोंगराआडून डोकावू लागले.
त्यामुळे वातावरणात हळूवार उत्साहाची
सळसळ निर्माण होऊ लागली.
डावीकडून कुलंग,मदन,अलंग,देव्हारा,किर्डा,साकिर्डा व कळसूबाई असा मनोहरी पँनोरमा कमाल दिसत होता.
वाटाडे आले नी निघालो भिडायला.
समोर किर्डा माथ्यावर जाणारी घळ स्पष्ट दिसू लागली.शेतांच्या बांधावरून कुच सुरू झाली. बैलघाटाची वाट डावीकडे सोडून उजवीकडे मळलेली एक वाट तिरकस पण वळणाची घळीकडे नेवू लागली.हिरवा झाडोरा ऐसपैस.भगव्या झांजर प्रकाशात रानदरीतला माहोल उत्सवी तालेवर ठेका धरत होता.आम्ही समरस होऊ लागलो.
अर्ध्या तासाच्या वळणदार चालीनंतर घळीतल्या वाटेला भिडलो.घळीचा टाँप किंवा खिंड खालून स्पष्ट दिसत होती तरी तिथंपर्यंत पोहचायला अडीच तास लागले.नळीच्या वाटेचा अनुभव यावा अशी इथली गडगंज श्रीमंत वाट.तशी काहीशी फोर लेनसारखी.पण उत्तरोत्तर चिवळ होतं जाणारी.वाटेत काही ठिकाणी रानझाडी ताठ मानेने उभी.बाकी कातळांची मैफिल.
“To walk in nature is to witness a thousand miracles.”
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
दोन बाजूंना डोंगर भिंती कमालीच्या उंचावलेल्या.
फोटोग्राफी व वाँटरब्रेक यामुळे जरा निवांतपणा येत होता.
पण त्याशिवाय मजा नाही.
शेवटी आकांताने खिंडीत पोहचलो.तर पलीकडे सेम घळ उडदावणे कडे उतरणारी.खाली दाट झाडी पसरलेली.डोळे हिरवे करणारे भरजरी रान कुतुहलाने माखलेले.डावीकडे पुर्वेला एक पुसटशी वाट किर्डाच्या माथ्यावर जाणारी.पण वाट कठीण होती.
सहजता नव्हती मुळी.वर एका टप्प्यावर विसावलो.सर्व एकत्र येईपर्यंत थांबलो.दक्षिणोत्तर व्हू गजब दिसू लागलेला.वाँटरब्रेक झाल्यानंतर पुन्हा पुर्व दिशेने चढाई कस बघू लागली.
दोन टप्प्यावर पठार लागलं.तरी वर सी आकाराची महिरप चढाईसाठी वाट बघत होती.जरा विसावलो.दम मारो दम परिस्थिती.वातावरण तर स्वच्छ आल्हाददायक.पश्चिमेला अलंगची दक्षिण बाजूची भिंत व माथा स्पष्ट दिसत होता.दूरवर शिपनूरचा माथा गगनभेदी नी आकर्षक.तर पश्चिमेला मदन नी कुलंग स्पष्ट दृष्टीक्षेपात आलेले.
आता उत्तर बाजूने राऊंड द विकेट चढाई सुरू केली..सरळ चढाई करत माथा गाठण्यापेक्षा जरा तटावरून गेलेलं कधीही उत्तम.मग तटावरून तसे व्हू अधिक रोमांचक दिसू लागले.दूरवर काळूस्ते धरण दृष्टीक्षेपात.डावीकडे दूरवर भावली धरणही.अवांतर इतर डोंगर व गडकोटही दिसत होते.जसे वर चढाई होत होती तसे व्हू अधिक खोलीचे व नजरसुख अनुभव देणारे.पुर्व तटावरून तर कळसू,साकिर्डा व इतर गोतावळा नजरेचं पारण फेडणारा.
आकाशात ढगांची गर्दी अधिक आकर्षक वाटू लागली.क्षितिजावर मात्र खोली शार्प वाटत होती.माथ्यावर सर्वत्र रान माजलेलं.कधी पाय खोलात जायचा,कधी घसरायचा.कुठे मोठे दगड लपलेल्या स्थितीत निपचित पडलेले.
धोकादायक. तरी भटकंती उत्साह दुणावलेला.कारण चौफेर सह्याद्रीणा नजराणा पेश आलेला.मस्त गार हवा.कधीतरी सावली हजेरी लावायची.बाकी करकरीत उनं सोबतीला.
सर्वोच्च माथ्यावर जरा विसावलो.निवांतपणा झिरपू दिला
खोलवर.पुर्वेला बैलघाट दिसत होता.शेजारी साकिर्डा मग कळसूबाई.दक्षिणेकडे दूरवर पाबरगड ते शिपनूरपर्यंतची सलग रेंज दृष्टीक्षेपात होती.निळशार भंडारदरा धरण अफाटतेचं द्योतक होतं.
एकूनचं भौगोलिक ज्ञान अधिक सजग झालेलं.
सोईने एका ठिकाणी जेवणावळ बसली.कुठल्याही डोंगर माथ्यावर जेवण अनुभवणं एका आनंदवनासारखा अनुभव असतो.तुम्ही पदरात घ्याल तेवढं सुख तेवढ कमीचं.दोन घास सुखाचे नंतर थोडा वेळ आराम.मग परतीला निघालो.परतीची पतेरझड पायाखाली वाजू लागली.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
कसरत करत खिंडीत पोहचलो.उडदावणे कडे जाण्याचा मानस होता.म्हणून रेखीसाठी काळू,किरण,परम यांना पाठवलं.पण रिस्क व वेळ यामुळे जुगाड काही जमला नाही.कारण 4 वाजले होते.इकडून उतरण जरा अवघड तसेचं वेळखाऊपणाचं होतं.त्यात खाली उतरलं तरी उडदावण्या पर्य़तची चाल तीन तासांची होती.रात्री भरकटण्यापेक्षा आल्यावाटेने आंबेवाडीत परतनं शहाणपणाचं है लक्षात आलं..नी तो नाद सोडला.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
उतरणा-या प्रत्येक टप्प्यावर किर्डा गारूडीसारखा मनावर पिंगा घालत राहिला.सोपी वाटणारी उतराई कस बघत राहिली.निरोपाच्या वाटेवर निसर्गाची मेहरनजर पावली.परतीच्या तांबुस उन्हाने सारा आसमंत भारावून टाकत होता.सुर्याजीराव कुलंगच्या बेचक्यात टेकले होते.
मावळत्या दिनकरा..
कातरवेळेचे सूर वाजू लागले.
तरी..
आंबलेलं शरीर पुन्हा ताजतवाने होत राहिलं.
आंबेवाडीत परतायला संध्याकाळ झाली.
सिताराम भाऊंच्या घरी चहा झाला नी काळूच्या भावाच्या घरी जेवायला पोहचलो.तो पर्यंत अंधार झालेला.
मस्त जेवण झालं.
आतिथ्य व आपुलकीचा अजून एक चिरंजीव अनुभव
आला.आलेल्या पाहुण्यांना अदबीने व मोकळेपणाने जेवू
घालण्याची ग्रामीण परंपरा आजही टिकून आहे.आणि राहिलही.🙏
सर्व हिशोब मार्गी लावत नाशिककडे निघालो.
काळूचा अदबीने निरोप घेतला.नी
अंधारल्या मिणमिणत्या प्रकाशात सह्याद्रीला डोळ्यात
भरून घेतलं नी आनंदी वृत्तीने आंबेवाडीची वेस पार केली.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
"Returning home is the most difficult part of long-distance hiking.
★ You have grown outside the puzzle and your piece no longer fits."
========≠===========================
ट्रेक दिनांक 10/01/22 रविवार
सोबत 12 भिडू..
डॉ. स्मिता/अविनाश गाडेकर
सोहन/किरण काळे,सोनवणे सर.
परमभैय्या,मी.
सुमेध,सुश्रूत वर्तक,अनिकेत,अवंती ढवळे
तीन गाड्या../डॉ.स्मिता,परमभैय्या,वर्तक
खर्च 570 प्रत्येकी.
--------–--------------------------

It's always amazing to read your blog. You put up the words so beautifully.
ReplyDeleteनाना मस्त ब्लॉग आणि तितकेच कमाल फोटो!
ReplyDeleteनेहमी प्रमाणेच भन्नाट!👌
ReplyDeleteनाना
ReplyDeleteएकच नंबर ट्रेक फोटो आणि लिखाण
Mast Nana Photos ani Blog
ReplyDeleteIt was nice experience after long long time. I don't remember everyone's name but yes journey was awesome because of all of you guys.
ReplyDelete