खुट्टेदार-डोणेदार :अफाट सह्याद्री दर्शन

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आनंदाचे अनेक अंतरंग आहेत.
अनेक पदरही आहेत.
मात्र ..
अंतरंगाच्या गर्भगृहात जाता
यायला हवं.
गेलात तर आयुष्य जगण्याचा
एक निर्मळ मार्ग गवसतो.
तो मार्ग अनेकांचा वेगवेगळा असू शकतो.
तरी..
तो मार्ग तुम्हाला आनंदघनात चिंब
भिजवून टाकत रहातो..
जगणं सुंदर होऊन जातं.
☘️
मला असाचं एक मार्ग सापडला ..
तो डोंगर भटकंतीचा.
गडकिल्ले, घाटवाटा, निसर्ग, प्राणी, पक्षी,झाडेझुडपे,
खळखळाट हे त्याचेच तर पदर आहेत.
आणि,
या मार्गाने 'आयुष्य' एका बहारदार टप्यावर
आणून सोडलं आहे.
जिथे..ना स्पर्धा, ना असूया,ना जात धर्म
ना उच नीच,ना कोणी मोठा ना छोटा.
सब घोडे बाराटक्के..🙏
☘️
ढाकोबाचं गारूड अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलयं.
दहा अकरा वर्षापूर्वी कै.जोशीकाकांच्या नेतृत्वाखाली
खुट्टेदार/दा-याघाटचा ट्रेक केलेला.तेंव्हापासून त्याच्या आसपासच्या अनेक पदरात भटकून झालं.
तरी त्याचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही.☘️
तर..
खुट्टेदार पुन्हा डोकावला.🏔️
या रे या सारे.म्हणतं.
जुन्या जमान्याची टिम ओसरली.
नवे तजेलदार भिडू उभे राहिले.
पुन्हा भिडण्याची सळसळ अंगात संचारू लागली.
मग नव-नव्या वाटांची आस उधळू लागली.
☘️
गेल्या काही काळात खुट्टेदार/डोणेदार
ट्रेकने अनेकदा हूलकावणी दिली.
ठरवूनही योग जुळून येत नव्हता.
आणि तो यावेळी आलाचं जुळून.😀
पिच्छा पुरवला की दगडाही पाझर फुटतो.
तसं काहिसं.यासाठी विजय आणि अमीतने
विशेष जोर लावला.👍
आम्ही री ओढायला तयारचं होतो.
☘️☘️☘️
रामपुरात पोहचायला रात्रीचे 11:50 वाजलेले.
समोरच्या मारोती मंदिराचा लाईट मंद
अवस्थेत सुरू होता,
जिथे आमचा डेरा पडणार होता.
गांव मात्र शांत निजलेलं.
आमच्या गाडीच्या आवाजाने कोणी दखल
घेतली नाही..अगदी कुत्र्यांनीही नाही.
सर्व जणू गाढ झोपलेले असावेत.☹️
पुणेकर भिडू अजून यायचे होते.
आम्ही मंदिराचं आंगण सापसूप करून
अंथरूण पसरवलं.
नी मारोतीरायाच्या साक्षीने निद्रेला कवटाळलं.
तासाभराने पुणेकर धडकले.
जरा गप्पा हाणून पुन्हा झोपलो.
सकाळी लवकर उठायचं असल्याने.
☘️
सकाळीचे सहा वाजले नी
पुणेकर झोपलेचं नसल्यासारखे जागे झाले.
मी जरा आळशीपणासारखा उशिरा उठलो.
वाटाड्या तानाजीमामाच्या घरी पोहचलो.
अंगणात गाड्या लागल्या.
मामा वाटचं बघत होते.
नमस्कार, चहापाणी झाले.नी
सँक पाठीवर करकचून आवळल्या गेल्या..
पाऊलं खुट्टेदारच्या वाटेवर सुटली.
☘️☘️☘️..
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
" दक्षिणोत्तर पसरलेल्या अफाट ढाकोबाने
सकाळच्या कोवळ्या किरणांना थोपवून धरलेलं.
त्यामुळे जणू संधीप्रकाशात आम्ही जोमाने
चालत होतो.वादळी हवेचा खट्याळपणा मदमस्त.
त्याचा अवखळ व लडिवाळपणा मोहरून टाकत होता.
वातावरण मात्र आल्हाददायक.
विरळ झाडोरा नी,
समोर ढाकोबाचं आवाहन.🏔️
☘️
सोपी वाट मागे सरली.नी ढोकोबाच्या पोटात
खुबीने लपलेली "खुट्टेदार" वाट आता गवसू लागली.
दूरवरून कोण म्हणेल'माथ्यावर जायला
वाट आहे.इतकी बेमालूमपणे ती मिसळली आहे.
एवढी अफलातून चोरवाट कुठे सह्याद्रीत नसावी.
ढाकोबा पोटावर चढाई सुरू झाल्यानंतर
झाडी,कारवी याने वाट अधिक आनंददायी आणि
प्रेरणादायी वाटत होती.पहिले दोन तास तर झुडूपांनी अंथरलेल्या
गालीच्या वरून जणू सुटलेली.
जणू सापवळासारखी.
मग काही वेळानंतर कुठे मोकळेपणाने श्वास घेतला.
ब-याचं उंचावर आल्याची जाणीव झाली.
एका टप्प्यावर विसावलो.वाँटरब्रेक आणि जरा
च्याटीमाटी खाल्ल.प्रसन्न झालो.नी पुन्हा भिडलो.
आणि इथून खुट्टेदारने आपले असली रंग दाखवायला 
सुरुवात केली.
आता झाडोरा मागे सरला.नी कातळाने
हात पुढे करायला सुरुवात केली.तेही 80 अंशात.
कुठे अंगदी काठावरची पाऊलवाट डोळे भिरभिरवणारी.
कुठे थेट जणू आकाशाकडे जाणारी कातळवाट कमालीची
थरार.सुदैवाने ब-याचं ठिकाणी खोबण्यांचा आधारवड.
कुठे आपलचं शरीर आपण उचलायचं.
तेही दोन हातांच्या आधारावर.
सारी चढाई एकाग्र करणारी.
योगसाधना सुरू होती.
आठ लोकांचा संघ असल्याने खुप कुणाची
वळवळ नाही की बडबड नाही.(बाळ विजय सोडला तर)
अभ्यासीकेत जशी शांतता नी हुशार असल्यासारखे
सारे अभ्यास करत असल्यासारखे वाटतात..
तसे इथे चालले होते.😀
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
मागे दूरवर..
रामपूर व मुलूख ऐसपैस पसरलेला.
आकाश मोकळे झाले असल्याने उजवीकडे
तीन पहाडी नाळा खाली उतरलेल्या.
पोशीचीनाळ..डोणेदार.. माडाची नाळ
धडधड वाढवणारा सारा नजारा।।
काळजाचा ठाव घेत होता.
☘️
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आता तिरकस सुर्य किरणे खुट्टेदारावर विसावू पहात होती.
12 चे ढोल वाजलेले.
रामपुरहून निघून चार तास होतं आलेले.
तरी माथा कुठे ? याचा अंदाज येत नव्हता.
फक्त कातळवाट आकाशाकडे जातंय एव्हढीचं ती काय 
जाणीव सुखावणारी.
शेवटचा तासभराचा चढाव कमालीचा कस बघणारा.
कमालतेची सीमा गाठणारा होता.
गेल्या दहाएक वर्षापूर्वी केलेली ही चढाई
आज मी अक्षरशः अनुभवत होतो.
जाणीवांची दार सताड उघडी झाली होती.
त्यामुळे इथंल अस्तित्व अधिक चाणक्ष व समजदार
झाले होते.
प्राजक्ता ही एकमेव मुलगी कमालीची तेजतर्रार वाटत होती.
कसलेली ट्रेकर म्हणून समरस होऊ पहात होती.
तीच्यातली सहजता,चपळता आणि आत्मविश्वास उच्च
कोटीचा जाणवत होता.
बाकी इतर भिडू तसे अनुभवी आणि आधीच
सह्याद्रीमय झालेले.त्यामुळे सारं काही छान चाललेलं.
☘️
शेवटचा जीवघेणा टप्पा पार करत माथ्यावर पोहचलो.
आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि
समाधाची लकेर उजळून गेली.
कसदार चढाईनंतर माथा गाठल्यानंतरचं सुख ते काय वर्णावं.
जो अनुभवतो तोचं ते जाणतो.
शब्दांची फक्त फुले होऊ शकतात.
अनुभवाच्या संवेदना न्या-याचं 😊
☘️
माथ्यावर निवांत विसावलो.
सर्वाच्या चेह-यावरचा आनंदभाव आणि
त्याची श्रीमती काय वर्णावी.
कोणत्या शब्दात..?
जाचं त्याला कळू द्या.
उमजू द्या.
सारं शब्दांच्या पलीकडचं आहे.
अवर्णनीय 🙏
" शब्द कधीकधी काही गोष्टींचे वर्णन करू शकत नाहीत.
जसे..
रविवर्माच्या पोर्ट्रेटचे सौंदर्य शब्दात..
पूर्णपणे व्यक्त करता येणार नाही.
किंवा..
मादाम तुसादच्या पुतळ्यांचे चैतन्यशील वातावरण देखील शब्दात सांगणे अशक्य.
तस काहीसं..
आमचा आनंद त्रिभुवनी..😀
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
माथ्यावर फोटोंचा नेहमीप्रमाणे क्लिकक्लिकाट झाला.
फोटो भरून पावले.
नी झाडोरा कापत हाकेच्या अंतरावरील देवीमंदिरात
डेरा टाकला.
वनराईतलं सुरेख मंदिर.
शांतता ..कमालीची वास करणारी.
जवळील हापश्यावर हातपाय धुतले.
मंदिराच्या अंगणात जेवणावळ बसली.
वनभोजन सुखसमृद्धीचं.
पराकोटीचा आनंद देणारं.
मग..जरा विसावलो.
भरपूर वेळ हाताशी होता.
दुर्गवाडी फक्त मैलभर.
त्यामुळे असेल 😎
☘️
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
वाडीत पोहचलो.
कुठे दुरवर सिमेंटची घरे..तर कुठे शेणाची.
तानाजी मामाच्या ओळखिच्या घरी पोहचलो.
शेणाचं घर..आंगण.
कोंबड्या,बक-या आणि
लहान खेळकर मुलांचा कुटुंबकबिला.
सधनता खेळत होती.
गाडीरस्ता झाल्याने ती आली असावी.
सँक विसावल्या.
चहापाणी झाला.
विजय,संदिप,परम,प्राजक्ता,अमीत
पोरांसोबत क्रिकेट खेळायला गेली.
संध्याकाळी भेळभत्ता,चहा कार्यक्रम झाला.
दिवेलागणीला जेवणाची लगबग सुरू झाली.
रात्री मस्त जेवण झाली.
गारव्यामुळे घरातचं अंथरूण टाकलं.
गप्पा रंगल्या..
झोपेने सोंग आणलं.
आणि..लाईट बंद झालीत.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
झुंजूमुंजूची वेळ..
पुणेकरांची वळवळ सुरु..
इतरांचे आवरेपर्यंत उठलो.
मस्त करकरीत दिवसाची सुरुवात.
उठलो तर समोर दारातून सुर्याजीराव
Good morning करत आलेले.
गारवा असल्याने गरम पाण्याची व्यवस्था झालेली.
सुख..आणि सुख 😀
आवरलं..भुर्जी.. पोहे आणि निरोप.
खट्याळ मुलांना क्रिकेट च़ेडूसाठी पैसे कोंबले
नी सद् भावनेने डोणेदार कडे निघालो.
त्या कुटुंबाशी अर्थात लहान मुलांशी
आपुलकीचा सेतू बांधला गेला होता.
अल्पावधीत भावनिक नातं जुळलं गेलेलं.
निरोपाच्या वेळी मनात कालवाकालव झालेली.
☘️
कोकणकड्यावर यायला अर्धातास पुरला.
महाकाय सह्याद्री नजराणा डोळ्यांच पारण फेडत होता.
पाऊलं बराचं घुटमळली.
सह्याद्री प्रेमाने उर भरून येतं होता.
केवढा..किती आनंद दिला त्याने.
याला कोणती सीमा ?
☘️
दिडतासाच्या चालीनंतर डोणेदारच्या
उंबरठ्यावर आलो.
टुमदार डोणेगांव डावीकडे दूरवर विसावलेलं.
वाटेत पोशीच्या नाळेचे महाद्वार बघितलं.
गगनभेदी कातळभिंती कमालीच्या दडपून टाकणा-या.
अभूतपूर्व व्हू होता तो.
डोणेदारच्या ओंजळीत प्रवेश केला नी
गलबलून गेले मनं.
रांगड्या कातळकड्याच्या मुलूखातही
मनं हळव होतं.याला काय म्हणावं.
ना भिती..ना दडपण..
ना घबराट... ना निराशा.
सारा माहोल उत्साह भरला.
कुठेही भिडण्याची तयारी हे दान
सह्याद्रीने बहाल केलेलं.
त्यामुळे सारं काही अलबेल.
हि त्याचीचं कृपा..🙏
☘️
उलट्या V आकाराची नाळ.
सुरूवातीला कारवीने भरलेली.
उत्तरोत्तर बाहू पसरल्या सारखी मोकळी होतं गेलेली.
कारवीची सोबत हि निसर्गाने बहाल केलेली
कवचकुंडले आहेत ती आमची.
ती काढून घेतली तर अनेक घाटवाटा उतरण केवळ
अशक्य.
70/80 अंशाची उतराई.
पाऊलं सफाईदारपणे उतरत होती.
आता तीही सरावलेली.
तरी सावधानता जागृत असावी.
वाटेत स्वच्छ पाणीसाठा होता.
तिथेचं सरबत..भत्ता बेत झाला.
यासारखं सुख ते कोणते..?
आणि एकदाचं डोणेदार संपलं.
मागे वळून बघितलं.
त्रिगुणधारा ..🏔️
नजरेचं पारणं फेडत होती.
तीनही नाळा कोकण अंगणात तालेवार
उतरलेल्या.
केवळ अशक्य हे भावं दरवळले.
आपलं अस्तित्व खुजे असूनही
नैया पार होतेय.करतोय..
हि सर्व सह्याद्री कृपा.
कृतज्ञता आपोआप दारी येते.
नतमस्तक व्हावसं वाटतं.
यातचं सारं काही दडलेलं आहे.
☘️
  🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
 " सह्याद्री वरील रंगभूमीचं अवघं प्राणसामर्थ्य 
     या एकाचं पहाडी नजा-यात सामावलेलं जणू..
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
☘️ तेथून दिडतासांची चाल झपझप सुटली.
उनं डोक्यावर आलेलं.
किरकोळ वनराई.तरी परतीची आस मोठी.
वाघवाडी ओलांडली नी
रामपूरात पोहचायला 3 वाजले.
ठरल्याप्रमाणे सर्व नियोजन यशस्वी झाले होते.
आणि आठवणीतील एक दमदार भटकंती ट्रेकडायरीमध्ये विराजमान झाली होती.
सर्वांच्या चेह-यावर अक्षरशः बंदा रूपया झळकत होता.😀
परतीचा प्रवास सुरु झाला होता..🚶🚶🚶
" आकाशाने विरहाने डोळे मिटून घ्यावे..
असे परतीचे दु:ख भावनाविवश करणारे 😊

धन्यवाद 🙏
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
ट्रेक दिनांक 12/13/14 फेब.2022 
नाशिकहून रामपूरकडे प्रस्थान शुक्रवारी रात्री 8:20 वाजता.
11:50 ला रामपूर (मुक्काम).दरम्यान शहापूर अलीकडे एका वर्दळ हाँटेलवर जेवण घेतले.शनिवारी दुर्गवाडीत मुक्काम. रविवारी सायंकाळी7 वाजता नाशिक.
सोबती :पुणेकर🙆 विजय गुर्जर,संदीप वडस्कर, अमीत मराठे, तुषार कोठावदे.
नाशिककर 🙆परमभैय्या, प्राजक्ता शिरोडे,आदित्य फाळके, संजय अमृतकर.
वाटाड्या : तानाजी मामा (रामपूर)
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
समाप्त 🚩

संजय अमृतकर
Gypsy 🚩




Comments

  1. खुप सुंदर वर्णन ...मी ते अनुभवले🙂🤗

    ReplyDelete
  2. Nana superbly written blog, feel like we are stiill in ghat

    ReplyDelete
  3. तुम्ही गेलात त्याच्या बरोब्बर आदला शनिवार रविवार आम्ही जाऊन आलो. १०० वेळा या वाटा केलेल्या तानाजी मामा सोबत होते.
    आता पर्यंत तीन वेळा जाऊन आलो पण खुट्टेदार चं गारूड काही उतरायला तयार नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..