खुरद्याची धार : तवलीची नाळ

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
" खुरद्याची धार चढाई : तवलीची नाळ उतराई "
★★★★★★★★★★★★★★★★★★
गेल्या काही वर्षांत..
घाटवाटाच्या जंजाळात अडकलो नी पुरता गुरफटून गेलो.
केवढं अफाट आणि अचाट मायाजाल आहे तिथं.
शिवकाळात गडकिल्यांच्या ठळक अस्तित्वात घाटवाटांची शिबंदी
अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत असावी.
कारण एकूणचं त्यांच अस्तित्व हे गडकिल्यांच्या अवतीभोवती
एखाद्या चोरवाटेसारखं अथवा गुप्त शिलेदारासारखं महत्वपूर्ण वाटून जातं.
सह्याद्रीचा चौफेर मुलूख हा घाटवाटांनी सजला..
बहरला आहे.
शिवकाळात मागेपुढे गडकिल्यांच संरक्षण आणि राजमार्गाचे पहारेकरी अश्या दूधारी भूमिके इतकीचं भौगोलिक दळवळातही यांच महत्त्व अनन्यसाधारण असावं.
हे एकूणचं भटकंतीचं सार आहे.
ख-या अर्थाने सह्याद्री समजून घ्यायचा असेल तर घाटवाटांची भटकंती केल्याशिवाय गत्यंतर नाही.. हे निर्विवाद
☘️
माळशेज मुलूख म्हणजे घाटवाटांच नंदनवन.
मुळेचं,काळूचं नी पवनेचं खोर म्हणजे या मुलुखाची
कवचकुंडले आहेत.छातीवर येणाऱ्या बुलंद घाटांनी
हा सारा परिसर सा-या जातिवंत भटक्यांचा विकपाँइंट झालाय.
इथल्या लहान सहान वाड्या,पाडे तुमच्या दिमतीला 24/7 हजर असतात. त्यामुळे सह्याद्री जितका कणखर तितकी इथली माणसे मुलायम,आतिथ्यशील.
(भले हल्ली व्यावसायिक वृत्तीने ते व्यवहारीक वाटत असतील.)तरी त्याचा उबदारपणा हवाहवासा वाटतो.
☘️
कुठल्याही घाटवाटांबाबत कुठेही नुसती कुजबूज
ऐकली तरी कान टकलावून उठतात.
आणि पाय आपोआप तिकडे वळतात.
तवली/खुर्दा हि दोन नांवे अशीचं कुजबूजाची.
पुण्यातील स्मार्ट बाँय विजय गुर्जर म्हणजे माझं कुजबूज करण्याचं हक्काचे ठिकाण.प्रियसीसारखे त्याच्याशी मी गोडगुलाबी कुजबूज करत असतो.तीच्या सारख्याचं याच्याशीही गप्पांची मैफिल सदाकदा रंगत असते.तेंव्हा अगदी भरून आल्यासारखं होतं.
तर..
हरिश्चंद्र गडाच्या दक्षिण पोटावर ह्या 
दोन वाटा भूलावू लागल्या.
एकदा भिडायलाचं हवं विज्या..!
विजयने पण लगेचं मान हलवली..
चला !!!
☘️
नवीन घाटवाट वा परिसर असला की,
हाताशी वेळ भरपूर हवा.म्हणून शनिवारी
वाघ्याचीवाडी येथे मुक्कामी पोहचलो.
पुण्याची टिम रात्री उशिरा पोहचली.
तोपर्यंत आम्ही जेवण करून कँपफायर करत
बसलो.एका ऐसपैस घरांत झोपायची व्यवस्था झालेली.
त्यामुळे सार काही सेफ..सेफ
रात्री निद्रेला कुशीत घेण्याअगोदर
आम्ही जिथे झोपलो आहोत..
त्या परिसराच्या चौफेर सह्याद्रीचे बुलंद
कातळकडे खड्या पहारेक-यासारखे
कडा करून उभे आहेत.
हे सोबत नवीन आलेल्या भिडूंना भल्या सकाळी
दिसणार होते.
पण मलाही त्यांचे आश्चर्यकारक
भाव बघण्याची उत्सुकता अधिक होती.
☘️
☘️
सकाळी बरोबर..5:30 वाजेचा 
अलार्म आरवला..
तासाभराने सर्व भिडू तेजतर्रार.
पण वाटाड्या यायला 7 वाजले.
लगेचं निघालो.
दक्षिणेकडे माळशेजघाट तर 
उत्तरेला हरिश्चंद्र गोतावळा उतुंग.
गणपती घाट अर्थात जुनी माळशेजवाट.
तर पुर्वेला काळूधबधबा परिसर.
पावसाळ्यात इथला मोहमयी नजारा
काय वर्णावा..!!!
अनेक वर्षांपासून इथे येणं होतं आहे.
सारा जुना पट उलगडू लागला.
आठवणींनी सकाळचा प्रहर ओला झाला.
पाऊलं रोहिदास घळीकडे चालू लागली होती.
☘️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
हरिश्चंद्र दक्षिणेकडून वाहून येणारा प्रवाह
आज कोरडाठाक.अर्थात रोहिदास घळीतनं
धो धो पाऊसपाणी वाहत जातं ते काळूनदीला
मिठीत घेऊन पुढे उल्हास नदीत समरस होतं.
पण..इतका पाऊस पडूनही सारा मुलूख
उजाड असतो या काळात.सार पाणी वाहून जातं.
नी समुद्रात मिळतं.जमीन खडकाळ किंवा नापीक.

काळू नदीला उजवीकडे ठेवत आम्ही जंगलात घुसलो.
रोहिदास कडून येणारी वाट ओलांडून पलीकडे
मळल्या वाटेवर कुढळी जंगलात घुसलो.
मस्त जंगल.
ओल्या-कोरड्या ऋतुतलं इथलं
रूपडं कमाल विरोधाभास श्रेणीतलं.
पानगळीमुळे झाडे नव्या पालवीच्या आशेने
उभी.वाट मळकी तरी कुरकुरीत.
आल्हाददायक वातावरण.
☘️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
अर्धा-पाऊन तासानंतर हलकी चढाई जाणवू लागली.
थोडी उजवीकडे हळूवार वळण घेत असलेली.
कोरड्या झाडांच्या वेली,मुळे विविध आकाराची.
वाटेवर महिरप तयार केल्यासारखी.
लुभावणारी..फोटोजनीक 📸
☘️
काही वेळात माहोल मोकळा होऊ लागला.
चढाई अंगावर येऊ लागली.
एकेरी खुरद्याची धार.70/80
अंशात चढणारी.छातीतली कंपन
फुलू लागलेली.
पुढे कारवी मदतीला हात देऊ लागली.
तीची सोबत म्हणजे निर्धास्त करणारी.
टप्याटप्यावर तीचं अस्तित्व म्हणजे
मै हूं ना...!!!
सारखं.
☘️
खड्या पण निसरड्या चढाईमुळे 
कुठे ब्रेक घ्यायला फारशी संधी नव्हती.
एका धारदार खिंडीत आलो.
धारदार म्हणजे तिथं बसण्या इतकीचं जागा..
पलीकडे खोल दरी नी समोर आडराईचा 
उतुंग पहाड.आणि
खेटूनचं बुधली सुळका.आकाशी भिडू पहाणारा.
तोचं दक्षिण बाजूला देखणा घेरेदार सुळका..
तर उत्तरेला खड्या निसरड्या चढाईचा वर
तवली पठारावर जाणारा कातळटप्पा.
तिथेचं जरा विसावलो.
वाँटरब्रेक..
अनेक अंगाचे व्हूज धडकी भरवणारे.
संत्री चघळत पुढे निघालो.
वरच्या कातळटप्यावर पंधरा-वीस फुट
रोप लागला.खुप अवघड नसलं तरी
सुरक्षितता महत्वाची.
आणि काही वेळातचं तवली माथ्यावर
विसावलो.
एका डेरेदार झाडाखाली सर्व बसले.
सोबत आणलेले डबे व इतर खाद्यपदार्थ
बाहेर पडले..
हवेची गार झुळूक सुखावणारी...
☘️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
             बुधली सुळका..पाठीमागे माळशेज रांग
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
              तवली माथा..
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
☘️
आणि आता तवलीची नाळ हाकेच्या
अंतरावर..खुर्दा व तवली पठाराची अपेक्षित चढाई
लवकर संपल्यासारखी वाटली..
कारण आता घड्याळात फक्त 12 चं वाजले होते.
पण आमचे मात्र वाजायचे बाकी होते.😀
☘️
तवलीच्या नाळेअगोदर एका धारेवरील
व्हू पाँइंटवरून चौफेरचं विहंगम काय वर्णावं.
कमाल...!!!
दक्षिणेला दूरवर माळशेजघाट गगनचुंबी..
उधळ्या..भोजगिरी.. दौंड्या.. वराडी मंडळ
आणि पश्चिमेला मोरोशीचा भैरवगड 
सुळक्यासारखा उठावलेला..
त्या पलीकडे नानाचा अंगठा पुसटसा तुर्रेदार..
डावीकडे आडराईचा बोलबाला ..
सोबत काळूधबधब्याचं कोरडेपण
खटकणारं..
पावसाळ्यात त्याचं महाकाय कोसळण
केवढं भयानक वाटतं..
तेंव्हाचं सौंदर्य बावनकशी ❤️
नी
उजवीकडे काळभैरव पहाड छाती दडपवणारा..
(त्या रोहिदास असही म्हणतात.)
शेंडी सुरळा नी रोहिदास घळ (थितबीची नाळ)
जुन्या आठवणीत
रमवणारी.
पलीकडे माकडनाळेचं गारूड घोंघावणारं..
कै.अरूण सावंत सरांबरोबर केलेला तो
शेवटचा ट्रेक.
अवेळी त्याची Exit आजही मनाला
हूरहूर लावणारी..
☘️
पाठीमागे हरिश्चंद्र गड बुलंद पसरलेला.
तारामची मग बालेकिल्याचा उठाव लक्षवेधी.
सारा माहोल सह्याद्रीमय.
पाऊल निघत नव्हतं..
सारं मनं या अफाट.. अचाट
नजा-याने चिंब भिजलेलं.
फोटोग्राफीचा क्लिककिकाट थांबला नी
तवलीच्या नाळेत पाऊलं थरथरू लागली.
☘️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
" सुटलेल्या दगड-मातीने सुरूवातीची 
उतराई थरारवणारी..
बुड टेकल्याशिवाय सुरक्षित
उतरण अवघड.
☘️
समोर काळभैरव पहाड तर अजूनचं
धडकी भरवणारा..महाकाय..!
आणि खाली उतराई लटकवणारी..😀
माकडनाळ चढून दूस-या दिवशी
रोहिदास अथवा थितबी घळीतनं खाली उतरलेलो.
ती नाळ येथून स्पष्ट नजरेच्या टप्प्यात होती.
गच्च हिरवाईने झाकलेली.
काही वेळा नंतर पाऊलं स्थिरावली..
मग झपझप उतराई ती सावधानता
बाळगूनचं..
☘️
खुरद्याच्या सहवासात फारशी फोटोग्राफी
करायला मिळाली नव्हती..कारण अंगावर येणारी
एकेरी चढाई नी 12/15 फुट उंच कारवीजंगल.
इथे तवलीनाळ मात्र मोहमयी.
चिक्कार " फोटू व्हू..
त्यामुळे पुढचे पुढे गेले..
आम्ही जरा निवांत क्लिक क्लिक
करत उतरू लागलो.
नाळ जरा नागमोडी..
त्यामुळे भुलवणारी..
70/80 अंशाची उतराई
मात्र "मँजिक" श्रेणीतली.
☘️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
    🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

" तासात पायथ्याच्या कुढळी जंगलात
घुसलो..नी उन्हाची झळ सोकावू लागली.
मस्त जंगल,सावली नी कुरकुरीत वाट.
काही वेळातचं सकाळच्या खुरद्याकडे जाणाऱ्या
वाटेला भिडलो.
बाहेर पडलो तेव्हा आता डुबायला हवं
म्हणून काळूच्या नदीत डुंबलो.
सारा थकवा नाहिसा झाला.
पुन्हा ताजेतवाने झालो.
इथे अजूनही अनेक ठिकाणी खोलगट
भागात पाणी टिकून आहे.
याचं आश्चर्य वाटलं.
☘️
वाघ्याचीवाडीत पोहचायला 3:20 झालेत.
लईचं लवकर आवरलं राव..!
असे भाव सर्वांच्या मनात घोळ घालत होते..
कारण बात तर रात्र होणार..ची होती 😀
मग हे असं काय बुआ..!!! 😀
तर..
जेवण आटोपून परतीला निघालो.
मागे वळून ..डोळेभरून बघितलं..
पुन्हा येणार..
पुन्हा येणार..
असं आश्वासन देऊन
सह्याद्रीचा निरोप घेतला..
☘️
मी पुन्हा येईन ...
पेक्षा हे बरं..😀

साताउत्तराची कहाणी समाप्त..

जय महाराष्ट्र 🚩

संजय अमृतकर
Gypsy 🚩
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
ट्रेक : 27 फेब्रुवारी 2022 रविवार
भिडू : 17 (तीन पुणेकर)
विठ्ठल सोनवणे सर,दिलिप गिते,डॉ. स्मिता गाडेकर,डॉ. अविनाश गाडेकर,
पलाक्ष मंत्री,प्राजक्ता शिरोडे,परम,जिभाऊ सोनवणे,संजय अमृतकर,चंद्रकांत खुळे,महाले सर,अभय मानकरे,नितीन नवले,सुधीर सावंत ..
विजय गुर्जर,मिलिंद (दादू) कुलकर्णी,प्रशांत कोठावदे.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
फोटो गँलरी..
🚩
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
             चाँकलेट बाँय...रोहिदास/काळभैरव
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

  1. Its just amazing...all photographs are awesome..proud to be the part of team

    ReplyDelete
  2. झक्कास भटकंती!👌

    ReplyDelete
  3. खूपच जीवन्त लेखन आहे...

    ReplyDelete
  4. खुप सुंदर 😍जसा अनुभव तसे लेखन ही अप्रतिम 🤗

    ReplyDelete
  5. तरल आणि भावपूर्ण ! भन्नाट भटकंती !!

    ReplyDelete
  6. आम्ही पण भटकून आलो !

    ReplyDelete
  7. नाना तुमच्या लेखणीत जादू आहे , मस्त लिखाण

    ReplyDelete
  8. खूप छान लिखाण मनाला भावना re

    ReplyDelete
  9. नाना मराठी व इतिहास या विषयांचे डबल पदवीधर अप्रतिम लेखन वाचकाला थेट ट्रेक ला घेऊन जाता

    ReplyDelete
  10. सुंदर लिहिले आहे नाना , मला मुक्कामी शक्य नसल्याने यापासून वंचित राहावे लागले.

    ReplyDelete
  11. नाना (Sanjay Amrutkar)

    आपला प्रत्येक ब्लाॅग भटकंती करण्यासाठी काही ना काही टिपस् देऊन जातो. म्हणजे मी तरी त्या अधोरेखित केल्या. आपल लिखाण अगदी पध्दतशीर आणि क्रमवार असते कि दुसऱ्या कोणाला हा ट्रेक करायचा असेल तर त्याने सरळ या ब्लॉगची प्रत जवळ ठेवावी आणि बिनधास्तपणे हा ट्रेक करावा.

    ऐवढ सविस्तर लिहायला एक तर आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसेच ट्रेक मध्ये फ़ळ खाण्याणे आपली शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी मदत होते. हे मला तुमच्या ब्लॉग मध्ये दिसुन आले.

    विजयच म्हणाल तर त्याची नाळ सह्याद्रीत जोडलेली आहे. त्याला 'त' म्हणजे ताक भात समजत नसेल कदाचित पण 'स' म्हणजे सह्याद्री लगेच कळते.😀 परमभाईंना तुमच्या सोबत पाहुन छान वाटले.🙏 मीपण कधीतरी तुमच्या सोबत ट्रेक करेन.

    ब्लॉग लिहून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील भटकंती साठी शुभेच्छा

    संदेश सावंत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..