खिरेश्वर ते खिरेश्वर : आडराई प्रदक्षिणा
🌺खिरेश्वर ते खिरेश्वर 🌺
व्हाया
" कळश्या डोंगर-भातखळा-रडकिचा झूरा-
खराट्याची राय- पाय-यांची वाट-आडराई "
💧
“Everyone wants to live on top of the mountain, but all the happiness and growth occurs while you are climbing it.”
Andy Rooney 🕵️
💧
" आडराईची पावसाळी भटकंती करून दोन/cyyतीन वर्षे होतं आलीत.
या ऋतुत इथyलं सौंदर्य कमालीचं मोहून टाकणारं असतं.
निसर्गाचा गंध नसणारी व्यक्तिही मोहरून जाऊ शकते.
इतका इथला निसर्ग चमत्कार डोळ्यांच पारणं फेडणारा असतो.
तर,uu
गेल्या महिन्यात याचं मुलुखात तवली/खुर्द्याचा दारा भटकंती झालेली.ऐन उन्हाळ्यातही इथला बाज हवाहवासा.
रानमेवा, कुरकुरीत वाट,सावली आश्रयाला असलेली लहान थोरली वनराजी,कुठे एखाद नितळ पाvfuण्याचं डबक तहान भागवणारं,चौफेर व्हू शार्प,360 अंशाचा आसमंत नजरेचा ठाव घेणारा.दाटu वनराईची आस..
सारं सुखही इथेचं नांदणारं.दारी आल्यासारखं वाटणारं.🌱
त्या भटकंती वेळी.
रडकिचा झुरा/आडराई प्रदक्षिणा मारण्याचं स्वप्न बघितलं आणि ते इतक्या लवकर पुर्णत्वास जाईल असं अजिबात अपेक्षित नव्हतं.
💧💧💧
" बरोबर सकाळी..
6 च्या ठोक्याला आम्ही नाशिक सोडलं.
टेंपोट्रव्हलर आणि आम्ही 15 सह्यवेडे.
(ऐन उन्हाळ्यात सह्याद्री भटकंती करनं सोप्प नाही.)
💧
8 वाजता आळेफाट्यावर साई वडापाव सेंटर जवळ गाडी थांबली.गरमागरम चवदार वडापाव नी चहा हाणला.
■ वडापाव..मिसळ..भेळभत्ता आम्हा नाशिककरांचा जणू
विक पाँइंट.😀
सिंगापूरच्या रेस्तराँ मध्येही
" ए भो..
मिसळ आहे का ? विचारतील.
एवढं आमचं मिसळप्रेम उतू जाणारं.
वडापाव साठी तर कुठलीही हातगाडी चालेलं.
आणि..
भेळभत्त्यासाठी तर आम्ही कुठल्याही
खेड्यापाड्यात थांबणार.😀
💧
खिरेश्वर ला पोहचायला मात्र 9 वाजले.
तासभर उशिरचं झाला होता.🙄
वाटाड्याच्या दारातचं गाडी पार्क करून निघालो.
समोर प्रसिद्ध टोलारखिंड दिमाखात उभी.
उजवीकडे अथांग पिंपळा धरणाच्या काठावर एक डोंगर राग
फोफसंडीला झाकोळून टाकत पुर्वेला सुटलेली.
तर डावीकडे हरिश्चंद्रगडाचं गारूड आजही टिकवून असलेलं.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
कळश्या डोंगराच्या वाटेवर लागलो नी
पुन्हा गुरूवर्य कै.जोशीकाकांची आठवण धावतपळत आली.
दहा एक वर्षापूर्वी आम्ही याचं वाटेने जात रोहिदासच्या दारी हजेरी लावलेली.तेव्हा शेंडी सुळक्याचं आकर्षण आणि धडकी भरवणारा चौफेर व्हू आजही आठवणीत जपून ठेवलाय.🙏
कळश्याची चढाई तशी दमदार.
उनं अंगावर आलं तरी सावलीला असलेली झाडे आणि
जंगलतोडही लक्षात येणारी.एक दोन टप्प्यात कळश्या दमवणारा.माथ्यावरून पुर्वेला पिंपळा धरणाचा नजराणा आणि उत्तरेला जुन्नर दराजाचा बुलंद 70 एम एम पडदा बहारदार.
💧
कळश्यानंतर भातखळा पट्टा सुरू झाला.जरा पठारी भाग.
हवेशीर परिसर.डुलणारी झुडपे आणि थोरली झाडे आहेत अजून.पलीकडचा व्हू मात्र आश्चर्याचे भाव उमटविणारा.
दूरवर लांब रोहिदास शिखर गगनचुंबी.तर उजवीकडे हरिश्चंद्रगडाची कातळभिंती खडा पहारेकरी.अफाट,अचाट या शब्दांचा अर्थ उलगडू पहाणारा परिसर.खाली खोल आडराई कडे जाणारी गर्दझाडीत लपलेली वाट.तर डावीकडे पाटराईचा डोंगर उंचावलेला.
उजवीकडे एक वाट मळलेली.हलक्या चढ उताराचा परिसर.कारवीरान बघून हायसं वाटलं.तीचं खरी सोबती.अडचणीला धावून येणारी.
आणि रडकीचा झूरा सुरू झाला.खोल उतराई नी पुन्हा खडी चढाई.डावीकडे कुठे खोल दरी तर कुठे नाळांचा भाग.पण रिस्क फारशी नाही. दमछाक तर होणारचं.सुदैवाने उन्हाची झळ नव्हती. इथला झाडोरा सुखवणारा.
💧💧💧
आता आम्ही हरिश्चंद्रगडाच्या बरोब्बर दक्षिण पोटावर चाललेलो.झाडीतनं वळणदार पण चढ उताराची वाट.
खराट्याची राय भागातनं चाललेलो.
एका मोकळ्या पठारावर विसावलो.क्लिककिकाट झाला.
डावीकडे दूरवर माळशेज घाटाचे उतुंग पहारेकरी रूबाबदार.
हटकेश्वर,सिंदोळा,उधाळ्या,दौंड्या,वराडी नी सुटलेला भैरवगड पुर्ण नजरटप्यात.
कितीदा तरी हा मनोहरी नजराणा अनुभवलेला.
तरी बघण्याची आणि पुन्हा पुन्हा अनुभवण्याची आस
तसूभरही कमी झालेली नाही.या क्षणीही नाही.
केवढी भटकी गुपीते सामावलेली आहेत या माळशेजच्या गर्भगृहात. याची काय मोजदाद..!!!
तीनही ऋतुतलं इथलं सौंदर्य आजही अबाधित आहे.
हे आमचं परमभाग्य.🙏
💧💧💧
इकडे उनं तापू लागलेलं.
पाण्याचा साठा रिता होऊ लागलेला.
कोकणी दमटपणा नव्हता तरी सुसह्य असही काही नव्हतं.
आता माथ्यावरून एका घळीतनं उतरू लागलो.
पाय-यांच्या वाटेला लागलो.
खाली उजवीकडे दूरवर तवली पठार,बुध्या पिक सुस्पष्ट.
गेल्या आठवणी उजळून निघाल्या.
घळ उतराई नंतर वाट अधिक घसरडी होऊ लागली.
अवघड जागी पायरीवाट कोरलेली.
कमाल आहे.
चोरवाटांचा सुळसुळाट हा सा-या सह्याद्रीचं गमक आहे.
एवढाचं भाग जरा सावधानतेचा आहे.
खालीची उतराई कारवी सोबत नी दाट वनराईत शिरली.
डोक्यावरचं उनं त्यामुळे झाकोळलं गेलं.
त्याची तिव्रता कमी झालेली.
इथे थेट खाली उतरत आडराईच्या पायथ्याला आलो.
एका मोकळ्या जागेत विसावलो.
💧
सोबती रेखा पाटील यांच्या बुटाचे तळ पुर्णतः निघालेले.
मघाचंपासून त्यांची कसरत अवघड होऊ पहात होती.
परमने आपले अजब कसब बाहेर काढलं.
नी तो चांभार रूपात प्रकटला.😀
बुटाचं आँप्रेशन करून तो सुस्थितीत आणला नी
चालण्या योग्य केला.रेखाबाईंना तर हायस वाटलं नी आम्हालाही.😀
यातनं एक बाब लक्षात आली..
ती म्हणजे " उन्हाळ्यात पाणी, बुट याकडे विशेष लक्ष असावे.
कंफर्टेबेल व सुस्थितीतील शूज असावेत.तसे ते नेहमीच असावेत.सह्यवाटेत ते खराब झाले तर त्यांना पर्याय नसतो.एवढं लक्षात असावं.
तसचं पाण्याचं.
उन्हाळ्यात कमीत कमी चार लिटर पाणी असावेचं.
वाटेत पाणी मिळेलचं याची शाश्वती नसते.
या दिवसांत ब्लँडरचा वापर अतिशय आवश्यक ठरतो.
ना कोणाला द्यायची भानगड नाही की कुणाचं घ्यायचं.
लिंबू सरबत तर अत्यंत गरजेचं असतं या दिवसांत.
क्रम्प,थकवा दूर आणि ताजेतवानेपणा यासाठी याचा
कमालीचा सकारात्मक परिणाम म्हणजे लिंबू सरबत.
गोड,खारट आणि आंबट यांचा जणू त्रिवेणी संगम 😀
💧💧💧
आता आम्ही ख-या अर्थाने आडराईच्या अंगणात प्रवेश केला होता.गर्ददाट झाडोरा.डावीकडे लखलखवी पहाड उतुंग.
आम्ही त्याच्या पोटावरून दक्षिणेकडे सुटलेलो.
आडराईची जंगलवाट मोहून टाकणारी.
थोरली झाडे आजही दिमाखात उभी.इथे फारशी जंगलतोड झाली नसेल.त्यामुळे अस्सल जंगलवाट आम्ही अनुभवत होतो.ह्या टप्प्यात फारशी अवघड चढाई उतराई नाही.शेवटचा टप्पा तर सहज सोपा चालीचा.वळणदार..
पावसाळ्यात इथे ओसंडून वहाणारे धबधबे आणि खळखळाट करणारे भाग आजही त्याची साक्ष देतात.पाणी नसले तरी पावसाळ्यात काय धमाल असेल या कल्पनेने आम्ही स्वप्ने बघत होतो.चार पाच ठिकाणी तरी असं वाटले.
💧
मागे इथपर्यंत मधल्या टप्यापर्यंत येऊन गेलो रे..
मी आपली साताउत्तराची कहाणी सांगितली सोबतींना.
तो धमाल केलेला खळखळाट स्पाँट दिसला.तेव्हा केलेली धमाल/मजा आठवली.🙆
तेंव्हा पुणेकरांची सोबत होती.
आणि इकडे दिड दोन तासांच्या सलग चालीनंतर मोकळ्या पठारावर एकदाचे आलो.आडराईचा आम्ही हळव्या मनाने निरोप घेतला.
अशीचं भरल्या कुटुंबाची रहा ग बाई.🙏
शुभेच्छा 💐 दिल्या नी परतीला निघालो.
💧
आता मोकळ्या पठारावरून तीन दिशांना
अफाट सह्याद्री दर्शन घडत होतं.
वर्णन करने अवघड.सारं काही सुखावणारं.अचंबित करणारं.
आणि नजरेचं पारणं फेडणारं.
क्लिककिकाट मात्र न थांबणारा.
काही भिडू विसावले..
काही क्लिककिकाट मध्ये रमले.
डावीकडे देवदार डोंगर आकाशी भिडलेला.
कधी तरी तुझ्याही माथ्यावर येऊ बाबा.
असं वचन दिलं.
म्हणजे आता जावचं लागणार 😀
💧
दिल ढल गया..ची
वेळ आली.
परतीचे वेध लागले.
माळशेजचा मनोहरी व्हू नजरेत आणि
कँमे-यांत बंदिस्त करत खिरेश्वरच्या वाटेला लागलो.
अर्ध्या तासात गाडीजवळ आलो.वाटाड्याच्या घरीचं
जेवण आटोपली नी ..
गाडीने ..नाशिककडे वेग घेतला.
मनं गाऊ लागलं..
💧
★ तिन्ही सांजा सखे मिळाल्या..
देई वचन तुला..
★ या चिमण्यांनो..परत फिरा रे..! या चिमण्यांनो
घराकडे...आपुल्या
लतास्वर मनात पिंगा घालू लागला.
लता नाही.. तरी..
तिचा स्वर अमर आहे.. चिरंजीव आहे.
■■■
धन्यवाद 🙏
संजय अमृतकर
Gypsy 🚩
trekkers
nashik 💧
■
ट्रेक दिनांक मार्च 27 /2022 रविवार
15 भिडू
● डॉ. स्मिता गाडेकर,विठ्ठल सोनवणे सर
डॉ. मनोहर जाधव,भारत बोरसे,सचिन/वरद खराटे
आरव/पलाक्ष मंत्री, प्राजक्ता शिरोडे,रेखा पाटील
अर्चना/संदीप खुटाडे,रमेश चौधरी,परमभैय्या,
संजय अमृतकर
वाटाड्या : उमेश -खिरेश्वर
टेंपोट्रव्हलर 🚛
■■■


सुंदर आणि अप्रतिम ट्रेक
ReplyDeleteअतिशय ओघवती भाषाशैली. वाचनात खिळवून ठेवते.
ReplyDeleteअतिशय सुंदर वर्णन
ReplyDeleteआम्ही सह्याद्रीवेडे😍
खूप छान वर्णन
ReplyDeleteखूप छान....परत एकदा ट्रेक केल्याचा अनुभव
ReplyDeleteसुंदर वर्णन .....
ReplyDelete