चिंब नात्याची वीण..आठवणींचा धांडोळा
चिंब नात्याची वीण "
--------------------
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
बरीचं वर्ष हाेत आलीत कॅमेरा हातात येऊन.
इतकी की जेव्हा ताे हातात येताे तेव्हा ताे शरीराचाचं भाग बनुन जाताे आणि आपसुक मेंदूशी त्याचं नातं जाेडलं जातं..
बॅगेत असताे तरी ताे एखाद्या प्रियसीच्या आठवणीं सारखा सतत मनांत घर करुन रहाताे.
गळ्यात अटकताे तेव्हा स्वत:ला विसरायला लावताे.
अनाहूतपणे निसर्गाशी तार छेडली जाते निरागसपणाने..
मनांत चैतन्याचा उत्सव सुरु हाेताे.
फाेटाेग्राफी निमित्त कितीतरी भटकंती झाली याला काही सिमाचं नाही..
पण भर पावसाळ्यात बेधुंद पणाने कॅमेरा गळ्यात टाकून अनं डाेक्यावर छत्रीचं छत्र घेऊन फाेटाे काढण्याच्या कितीतरी आठवणीं अश्या गाेळा झाल्यात.
या क्षणी ..!
मृगाच्या ओंजळीतनं वसुंधरा चिंब भजली नी आठवणींचं कडबाेळ सुट्ट झालं...!
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱असेचं पावसाळी दिवस.
पहिल्यांदाचं हरीश्चंद्राच्या वाटेला लागलाे.
साेबतीला माझ्यासह काही हाैशी मित्र..
माेसम तसा एैन भरात आलेला..
पाऊलं हरीश्चंद्राच्या वाटेला भिडली नी रिमझिम पाऊस सुरु झाला.वाट अनाेळखी तसा परिसरही अनाेखा.
तरी सुरुवात सहज नी आश्वासक हाेती.
कुठे माेकळ्या जागेत छत्री उघडायची,
बॅगेतनं कॅमेरा काढायचा नी दाेन-चार निसर्गचित्रे क्लिक-क्लिक करायची..पुन्हा चालू लागायचं..
पण जसे पुढे चढू लागलाे तसे पावसाचे रंग गहिरे हाेऊ लागले.काळ्या कुट्ट ढगांनी पुरत वेढून टाकलेलं.
अनं धुवांधार पाऊसाचा लाेभ वाढू लागला.
इतका कि बचावाचे सारे प्रयत्न विफल हाेऊ लागले.त्यात वादळी वा-याचा बाेनस साेबतीला.
एकावर एक फ्री असाचं काहीसा..
हाइट म्हणजे एवढ्या जिवघेण्या पावसातही एखाद्या झाडाआड छत्री उघडून कॅमे-यातनं फाेटाे काढण्याचा साेस काही सुटेना.
पुन्हा ती पाऊसभरली चिंब वाट चालू लागायचं .
चार तासांच्या अथक चढाईनंतर धुक्यात हरवलेलं मंदिर दिसलं नी माहितीतला साेबती आेरडला कि गड आला.
आम्हीही अक्षरशा चित्कारलाेचं..
गड आला गड आला.
ताे पर्यंत नखशिकांत भिजलेलाे.
सॅक काय अगदी कॅमेरा बॅगही मनसाेक्त भिजलेली.
एका कॅरी बॅगेत कॅमेराभाऊ गुडूप झाेपलेले.
तेही काही अंगाने भिजलेले.
पाऊस बरसुन थकलेला.
पण धुक्याने परिसर झाकलेला तरी ते क्षण टिपण्यात कॅमे-याची चाललेली धडपड अनाेखी अशीचं.
आजही ती छायचित्रे बघतांना त्या बिनधास्त पणाचे आश्चर्य वाटतं.अनं सह्याद्रीतल्या पहिल्या चिंब प्रेमाचेही.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱तेव्हापासुनचं हळूवार ...
रिमझिम,धाे-धाे,धुवांधार असे नानाविध अंगांचे पावसाळी रंग मनांत घर करुन राहीले.कालानुरुप प्रत्येक वर्षाऋतुत पाऊसाशी आपलेपणाचं नातं वृद्धींगत हाेत गेलं.मग पाऊसगाणी,पाऊसगप्पा,पाऊसधमाल,पाऊसाळी फाेटाेग्राफी,अश्या अनेकविध पैलुंनी पाऊसाशी मैत्रीची रेशमी गुंफण तयार झाली.पावसाळ्यात विविध अंगांनी बहरत जाणारा भाेवताल अनुभवणे म्हणजे जणु जिवनगाणे अनुभवणे..! सह्याद्रीतल्या एखाद्या गडतटावरुन दूरवर आेलसर ढगांच्या कुशीत डाेकं टेकलेली सह्याद्रीची काळीशार शिखरं बघणं म्हणजे माया-ममतेचं मायाजाल वाटतं.बाजुच्याचं कड्यावरुन सहस्र तुषारांच्या आतिषबाजीने स्वत:ला बेधुंदपणाने झाेकुन देणारे धबधबे म्हणजे साहसाला उत्कट प्रेरणा देणारे वाटतात.मग भरल्या आकाशाकडे बघावं.नभांची चालणारी मिरवणुक बघावी.झाेकदार वा-याला माेठ्या प्रेमाने सामाेरे जावं.माेकळे हात करुन त्याला कवेत घेण्याचा आविर्भाव आणावा.अनं डाेळ्यांची कवाड बंद करावीत.एक चिंतनीय थरार अनुभव अंतर्मनातल्या कुपीत साठवावा.याहून ते सुख काय ..?
सह्याद्री सातमाळा रांगा अनं त्यांना राेमांचित हाेऊन कवेत घेणारा ताे सप्तरंगी इंद्रधनुष्य,म्हणजे डाेळ्यांचं पारणं फेडणारा आणि ताे क्षण कॅमेरा-यांत टिपण्याचा याेग म्हणजे "दुग्धशर्कारा याेग"...!त्याक्षणी स्वत:ते अस्तित्व विसरायला हाेते.अनं बेधुंद व्हायलाही..!तहान-भूक विसरुन चिरतरुण करणारं असं निखालस पावसाळी हिरवं साैंदर्य अनुभवून जाे उन्माद चढताे ताे केवळ अवर्णनीयचं. पाऊसाची दिर्घकाळ संततधार असाे ट्रेकिंगला वा भटकायला निघालाे तर कॅमेरा शिवाय निघालाे असं कधी झालं नाही.ताे आेला हाेईल,खराब हाेईल,असे प्रश्न त्याबाबत मनाला शिवतही नाहीत.आता त्याची साेबत,काळजी जणू अंगवळणी पडलीय.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱*असाचं एक किस्सा..
वरुणराजा आणि वर्षाराणीचं प्रेम मिलाप एैन भरात आलेला.त्याचं वेळी पावसाळी ट्रेकिंगसाठी ढवळे घाटातनं भैरीची खिंड मग जाेर गांवी मुक्काम करुन दूस-या दिवशी श्रीक्षेत्र महाबळेश्वरला पाेहचायचं.
असा जरा अवघड ट्रेक ठरला.
पाेलादपुरहून भल्या सकाळी ढवळे गावांत पाेहचलाे.
नी ढगात गुडूप झालेल्या चंद्रगडाला उजवीकडून वळसा मारुन ढवळे घाटाच्या गर्द हिरव्या चढाईत लुप्त झालाे.
ताे पर्यंत ढगांनी काळपट छत्र उभारलेलं..
जसे उंचावर पाेहचलाे ताे जावळीची सुंदर निसर्ग चित्रे कॅमे-यांत बंदिस्त हाेऊ लागली.खरं तर या एैन पावसाळी माेसमात हा ट्रेक करणे म्हणजे आगाऊपणाची लक्षण हाेती.
पण आमच्या पाऊसवेड्या तसे ट्रेकवेड्यांना काेण समजावणार ? तर भैरवच्या घुमटी पर्यंत सारे आलबेल हाेते.उजवीकडे जाणारी वाट आॅर्थरसिटकडे तर पुर्वेला पुसटशी दिसणारी वाट जाेर गावांकडे जाणारी.
आम्ही जाेरकडे सुटलाे नी काही वेळातचं गेले ५ तास तग धरुन बसलेला वरुणराजाचा अंत संपला..
जाेरदार पाऊस सरींनी क्षणात वेढून टाकलेलं.
कॅननचा (डिजटल slr )
कॅमेरा सावरायलाही वेळ मिळाला नाही.
आम्ही चिंब भिजलाे नी कॅमेरा आेला झालेला.
तरी छत्रीने ब-यापैकी सहारा दिला नी आम्ही जाेरगावांकडे वेगाने निघालाे ..ताे साेबतचं येत राहिला..
तासभर उलटला तरी..!
आम्हीही आता स्थिर झालेलाे.
पण पाऊसाचं ते रुद्ररुप काही कॅमे-यांत टिपतां येईना.
सुदैवाने पुढे घनगर्द जंगल लागलं.
त्यामुळे पाऊसाचा तडाखा कमी झाला.
एका झाडाच्या आडाेश्याला प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगेतल्या काेरड्या बनियनने कॅमेरा काेरडा केला नी जिथेजिथ छत्री उघडतां येईल तिथे कॅमे-याचं क्लिक क्लिकाट सुरु झाला.
लेन्स सह कॅमे-यांवर पाण्याचे थेंब पडले का त्या काेरड्या बनियनने पुसायचे नी छत्री उघडून
"अप्रतिम चिंब निसर्ग "कॅमे-यांत बंदिस्त करायचा.
दाेन ठिकाणी तर खळखळणा-या माेठ्या आेढ्यांना पार करत अभिमानाची ५६ इंचाची छाती फुगलेली अनुभवली.
पाऊसाचा जाेर जराही कमी झालेला नव्हता.
कॅमे-यांवर पडणा-या तुषारांना आवरतां आता बनियनही ओला झालेला.माझी हतबदलता वाढू लागली.
इतक्या धुवांधार पाऊसाचा विसर पडला,
नी स्वप्नवत पाऊसधारांनी न्हावुन निघालेलं जावळीचं कॅमे-यांत कैद हाेत आलेली..ताेपर्यंत अंधारुन आलं .
जाेरगांव दृष्टीक्षेपात येत नव्हतं.ताेचं उजवीकडे दूरवर एक काैलारु घर दिसलं तुरळक झाडांच्या कुशीत ..
पाऊलं तिकडे धावली.सुदैवाने आसरा मिळाला.
जाेर गांव तर हाकेच्या अंतरावर आहे.इति घरमालक.
या घनघाेर पावसात ते जावळीचं मानवतावादी आतिथ्य ती आपलेपणाची मनंजुळवणी बघुन आमचा थकवा व झालेले कष्ट विसरायला झाले.सर्व आवरुन जेव्हा कॅमेरा आॅन केला तेव्हा डाेळ्यातनं अश्रूधारा वाहू लागल्या.
अलाैकिक छायाचित्रे नजरेत मावत नव्हती.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱एक फाेटाे पुढे सरकला का डाेळ्यातनं एक अश्रू टपकत असे..वा...!
हे पाऊसवेड...
हे फाेटाेग्राफी वेड...
हे सह्याद्री भटकंतीचं वेड..
अनं हे साहसी बिनधास्त पणाचं वेड ....!
सारं सारं आनंदीमय वाटणारं..
अभिमानाचा लाैकिक क्षितीजापलीकडे गेलेला..
मनांतल्या वहीत एक आठवणींचं
" हिरवं पानं" अलगद लिहीलं गेलं...
खरचं..
निसर्ग किती सुंदर आहे अनं हे कॅमेरा वेडही..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संजय अमृतकर,
नाशिक..
99600 10009
सप्टेंबर ८/२०२२
वाह! आम्ही पण तुमच्या आठवणींमध्ये चिंब भिजलो 👌🙏
ReplyDeleteवाह खूप चिंब चिंब केलं नाना श्री
ReplyDeleteभावनांना शब्दांतून छान वाट करून दिलीत
ReplyDeleteखुप छान वर्णन केलंय नानाश्री
ReplyDeleteएक फोटो वेड्या भटक्याचे सुंदर रेखाटन
ReplyDelete