अचाट पाथरा / उंबरदारा घाट
पाथरा घाट..
अनेक वेळा हुलकावणी देत आलेला.
नियोजित वेळेत..
काही तरी अडचणी यायच्या मग त्याची भेट हुकायची.
२००८ साली ऐन पावसाळ्यात कुमशेतला गेलो नी धारेराव
जवळील कोकणकड्यावर निवांत बसलो.पाऊस नव्हता पण
धुक्याने सारा माहोल लपेटून घेतलेला.त्यावेळी कै.अविनाश जोशी काकांकडून पाथरा घाट इथून कुठून तरी वर येतो.
बस..एवढचं ऐकलेलं ते पहिल्यांदा.
कालांतराने गडकिल्ले भटकण्याचं वेड मागे सरलं नी पाऊलं आपसूक घाटवाटांकडे वळाली.
💢💢💢
घाटवाटांचा वेडापीर प्रसाद कुलकर्णीचा मागे एकदा फोन आलेला.पाथरा केलाय का ? संपर्क नंबर मिळेल का..?
मी केला नसल्याचे माहिती देऊ शकलो नाही.
आणि,
काही दिवसांनी बकेटलिस्टवर नजर फिरवताना पाथरा वर नजर खिळली नी लगेचच प्रसादला मेसेज केला.पाथरा करून आले का ? तो म्हणाला..
१९/२० नोव्हेंबरला जाण्याचं नियोजन आहे.यायचं असेल तर कळवा.
बरं.. आमच्या जिप्सी ग्रुपमध्ये मुक्कामी ट्रेकला नाक मुरडतात.
त्यामुळे आली संधी तर घ्या साधून.म्हणून होकार कळवला.तरी
ग्रुप वर ट्रेकबाबत माहिती टाकली.माझ्यासह ६ भिडू जमले.आणि १८ तारखेला ५:५० वाजता कडशेत उंब्रोली कडे निघालो.राकेश शिंदेची फाॅरच्युनर घेतली.सात सिट्स व्यवस्थित बसतात.
💢
कडशेत वा उंब्रोली अंतर ११८ किमी.म्हणजे साधारण तीन तासांचा प्रवास.वळवळणाचा असल्याने.८:५५ वाजता कडशेतच्या पुढील कुंडाचीवाडीत पोहचलो.त्याआधी तळेगांव पर्यंत टकाटक टार रस्ता.तेथून कुंडाचीवाडी पर्यंत खराब रस्ता.साधारण ४ किमी.
वाडीच्या वेशीवरचं एका नव्या घराजवळ गाडी पार्क केली नी मुक्कामासाठी मंदिर किंवा शाळा आहे का ? म्हणून चौकशी केली.तर त्या नवीन घराचे मालकचं भगवान भाऊ तिथे असल्याने त्यांनीचं सांगितले "या, आमच्या घरात.करा मुक्काम येथे.
घर तर नवीन करकरीत.आत बाहेरचं प्लॕस्टर बाकी होतं.
तरी स्वच्छ टापटीप होतं.
सॕक उतरवल्या..फ्रेश झालो.
घरमालकानेचं विचारले."जेवायला काय बनवू..?
म्हटलं'आम्ही आणलंय जेवण सोबत.
तरी, त्यांनी आग्रहाने दाळ-भात बनवतो म्हणाला.
आम्ही .." चालेल म्हणालो.
तो पर्यंत बाहेर टवाळकी ग्रामस्थ जमली .
कोण,कुठले ?
संशयास्पद चौकशी सुरू.
पण पाथरा घाट करायचा आहे.वैगरे विषय काढला.
मग...दोघे म्हणाले " तुम्ही नाही जाऊ शकणार.तुम्हा शहरी लोकांना सवय नाय याची.लई अवघड आहे.बुट घालून तर चढणं शक्य नाही वैगरे.(आता फाॕरच्युनर चकचकीत गाडी, वेशभूषा शहरी,चेहरे हिरोगिरीचे त्यामुळे त्यांचा अंदाज काही चुकिचा नव्हता.😀)
उंबरदारा तर कोसळला आहे.तो पण लई अवघड आहे.
इचार करा.
अनेक आख्यायिका सांगून आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न केला.पण आम्ही ठाम.ते आमच्याकडे खालून वरून बघायचे सारखे.हे काय पाथरा चढणार शहरी बाबू..
अश्या आविर्भावात..!
लई इज्जत काढली राव आमची.🫤
तो पर्यंत जेवण तयार झालं.
आम्ही घरात गेलो.ग्रामस्थ फरार.😀
💢
ओसरीत जेवलो.
तिथेचं झोपण्याची व्यवस्था झाली.
११ वाजले.प्रसाद व इतर भिडू यायचे बाकी होते.
जीवो (Jio)रेंज होती.त्यांना यायला १२:३० तरी वाजणार म्हणून आम्ही निद्रेला कुशीत घेत झोपलो.
आणि पहिला दिवस मार्गी लागला.
💢💢💢
१९ शनिवार..
भल्या पहाटेला प्रसादने उठवलं.
सकाळचे सर्व विधी आवरेपर्यंत ६:३०/४५ झाले.
वाटाड्या येण्याची वाट बघत होतो.
तो पर्यंत मुक्कामी आलेल्या बस ड्रायव्हर कंडक्टर शी
गप्पा मारल्या.
वाटाड्या यायला ७ वाजले.निघायला ७:२०
सॕक करकचून आवळल्या गेल्या नी पाऊलं चालू लागली.
वाडी तशी स्वच्छ टापटीप व सुंदर.
काही वाडीकर शेकोटी भोवती बसलेले.काही सकाळच्या
धावपळीत दिसले.गावांतनं हायवे-रस्ता वेशीपर्यंत नेलेला.
गांव डोळ्यात सामावून घेतं वेस ओलांडली.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱तर,
समोर '७० एम एम सिनेमास्कोप' पडद्यावर जणू सह्याद्री
अवतरला असा जबरा व्हू डोळ्यांच पारणं फेडणारा.
(७० एम एम म्हटलं की अजूनही 'शोले'सिनेमा डोळ्यासमोर तरळतो.१९७५ साली ७० एम एम म्हणजे भारतीय सिनेमा सृष्टीत क्रांती होती.त्यांत मुंबईतल्या मिनर्व्हा थिएटरमध्ये बघण्यात एक क्रेझ होती, प्रतिष्ठा होती.)
सह्याद्रीने जणू झंझावाती देखाव्याचा भन्नाट जादूपट समोर
मांडलेला.अजस्र भिंतिंचा कोट करून सह्याद्री जणू आवाहन देत होता.
बलाढ्य आजोबा ते नाप्ता एक दृष्टीक्षेपात सामावत होते.
गांव मागे सारत नदीकाठाने निघालो.
समोर बुलंद गगनभेदी पाथरा घाट पुर्व पश्चिम
तालेवार सुटलेला.पाठिमागे डावीकडे आजोबा पहाड
तुर्रेबाज.उजवीकडे कुमशेतचा कोंबडा,उत्तुंग नाप्ता लक्षवेधक.
तीन चार वेळा नदी क्राॕस करत चढाईला भिडलो.इथे waterbrek घेतला.पपईचा फडशा पडला.प्रसादला खायचं आणायला प्रत्येकाला जबाबदारी दिली होती.त्यामुळे चंगळचं होती.🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
सकाळची कोवळी उन्हं.
प्रसन्नतेचा गार वारा.नी चढाई सुरु झाली.
तासाभराच्या चालीनंतर नदीमागे सरली.
चढाई सहजसोपी.वाळलेलं सोनेरी गवत सुर्यकिरणांनी
अजूनच मोहक वाटणारं.वळणदार चढाई.हवेशीर वातावरण.
एक ठिकाणी पुन्हा वाॕटर ब्रेक.सोबत अननसचा स्वाद घेत पुढे निघालो.
लक्ष समोर होतं.चढाई त्याचं दिशेने वळण घेत निघालेली.
दुतर्फा जणू सोनेरी गवताचे गालीचे अंथरलेले.
पावसाळ्यातल्या त्यांच्या हिरव्या रंगछटा किती हव्याहव्याशा वाटतात..! सह्याद्री तीनही ॠतुत अनुभववा.तेंव्हा आतले अनेक कंगोरे आपोआप समजतात.इथले कडेकपार हवेहवेसे वाटू लागतात.
आता तुरळक झाडीही मागे सरली.उघडाबोडका पाथरा ओपन चॅलेंज देऊ लागला.दोन टप्प्यानंतर वळणदार वाट घसरडी आणि सुटलेली.घसरलो तर अडकायला किंवा आधार म्हणून पकडायला काही नाही.वर दूरवर दोन झेंडे फडफडत होते.एक माथ्यावर दूसरा थोडा खाली.आमचं टार्गेट तेचं झेंडे होते.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱इकडे जसे आम्ही वरती जात होतो..
मागील व्हू अधिक गहिरा होत होता.
डोळे गरगरू लागायचे.
त्यामुळे मागे न बघता एक चढाईचा टप्पा सुसाट चढलो.
आणि एका टप्प्यावर स्थिरावलो.मागील भिडू वर चढताहेत.त्यांना बघून धस्स व्हायचं.आयला,आपण इथून आलो ?
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱समोर दिसणा-या एका टेकडी वजा डोंगर धारेला वळसा मारत पाथरादेवीजवळील मोकळ्या जागेत बस्तान बसवलं.जरा हायसं वाटलं.कारवी व इतर झाडी सोबतीला.देवीला नारळ फोडलं.भत्ता ब्रेक झाला.खाली नदी क्राॕस केल्यापासून इथंपर्यंत वाटेत कुठेही पाणी नाही.इथून वरपर्यंतही नाही.उनं व कोकणी दमटपणा फारसा नसल्याने पाणीही आटोपशीर लागलं.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱गणपती बाप्पा मोरया म्हणतं शेवटच्या टप्याकडे चढाई सुरु झाली.माथा जणू हाकेच्या अंतरावर.पण चढाई धारेवर सरळ सावध.मोजून पावलं टाका.हा हिमालयीन ट्रेकचा अनुभव इथे कामी आला.संथगतीने पण सातत्याने चालतं रहायचं.त्यामुळे दमही कमी लागतो.घश्याला कोरडही कमी आणि शक्तीही टिकून रहाते.फाॅर्मुला कामी आला नी शेवटच्या टप्याआधी एका कातळटप्याजवळ सर्व स्थिरावलो.
वर रोप लावण्यासाठी मनोज, गणेश, प्रसाद व तिघे गेलेले.
आम्ही आडोश्याला थांबलो.खाली बघितलं की धडधड वाढायची.😀 अर्थात अश्या अनेक धडधडणा-या जागा अनुभवल्या असल्याने नजरेला सवय झाली होती.तरी हे प्रकरण जरा वेगळचं होतं.इथे राॕकपॕच चढताना दगडांच्या बेचक्याचा आधार घेऊन सहज चढता येऊ शकत होतं.पण जरा थोडी चूक झाली तर 'घराच्या दिवाणखान्यात तुमचा फोटो झळकलाचं म्हणून समजा.डावीकडे थेट गरगरगवणारा ड्राॕप.
त्यामुळे आधारासाठी व सुरक्षितता म्हणून रोप अत्यावश्यक Safety first 👍सकाळची १०:५० वाजले होते.
वर रोप फिक्स करून झाला नी सर्व पटापट वरच्या टप्प्यावर पोहचले.तिथून १८० डिग्रीचा व्हू कमाल होता.पाठीमागे १८० डिग्रीचा सह्यकडा बेलगाम पसरलेला.दूरवर कुंड्याचीवाडी स्पष्ट दिसत होती.सर्व भिडू वर येई पर्यंत ११:३५ झालेले.
माथा तर हाकेच्या अंतरावर.पण तिथे पोहचण्यासाठी एक ट्रव्हर्स मारावा लागणार होता.पोटावरून जाणारी वाट अधिक रिस्की वाटतं होती.एका ठिकाणी तरी.त्यापेक्षा मघाचा पॕच परवडला.पण सुदैवाने सर्व धैर्याचे होते.पार झाले.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱आणि ...एकदाचा माथा गाठला.भगवाध्वज फडफडत होता.
शिवकाळ आठवून देणारा तोचं एकमेव.
इथे आवश्यक फोटोग्राफी झाली.सगळा व्हू डोळ्यात सामावून घेत होते.डावीकडे वडीलधारे आजोबा दिमाखात उभे.तर उजवीकडे कोकणकडा...धारेराव मंदिर आणि कुमशेतकडे जाणारी वाट.पाथराची नवलाई संपली होती.आजचा मुक्काम धारेराव मंदिरात करण्याचं ठरलं.आल्हाददायक वातावरण असलं तरी रात्री थंडी वाजू शकते.म्हणून धारेरावकडे निघालो.
वाळलेलं सोनेरी गवत नी मळलेली पायवाट.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱डावीकडे आजोबा ते घनचक्कर पर्यंत तालेवार सुटलेली सह्यरांग स्पष्ट दिसत होती.पाऊलं झपाझप कोकणकड्यावर स्थिरावली.तिथे वनखात्याने मुक्काम साठी पॕगोडा बांधलेला.वाॕचटाॕवर पण.सर्व न्याहाळत हाकेच्या अंतरावर धारेराव मंदिरात पोहचलो.मुळानदीच्या काठावर धारेराव मंदिर आहे.ब्रिटीशांना सळो की पळो सोडणारा धारेराव.सह्यकड्यांवरून किती वेळा तरी ब्रिटिशांनी ढकलून दिलं तरी तो पुन्हा पुन्हा वर आला.जो पर्यंत जिवन रेखा जिवंत तोपर्यंत त्याला गोरेही हरवू शकले नाही.असा धारेराव.आणि त्यांचं हे सुंदर मंदिर.
गेल्या ४ वर्षांपूर्वी या मंदिराचा आमदार निधीतून जिर्णोद्धार झालेला.त्यामुळे ५० एक व्यक्ती इथे आरामात राहू शकतात.
पाण्याची व्यवस्था जवळचं असल्याने हि जागा मुक्काम योग्य होती.चौफेर झाडी.आणि मधला भाग ओपन.त्यामुळे कोणीही प्रेमात पडावं अशी जागा.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱पाण्याजवळील पॕगोड्यात सॕक ठेवल्या.सर्वांनी मनसोक्त अंघोळी केल्या.पॕगोड्यात मस्त मसालेभात बनवला.इतर खाद्यपदार्थ होतेचं.मग चहा.सगळ काही साग्रसंगीत 😀 यासाठी प्रसाद नियोजन परफेक्ट होतं.यावेळेत अचानक सयाजी अस्वले भेटले.पाहुणे घेऊन आले होते.ते कुमशेतचे सरपंच.मोकळा पण उपयोगी माणूस.तिसरा प्रहर सुरू झाला.
कोकणकड्यावरून मावळतीचे रंग अनुभवायचे होते.म्हणून आवराआवर करून मंदिरात सॕक ठेवल्या नी कड्याकडे निघालो.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱परतून येईपर्यंत अंधार पडला.गारवा होताचं.
शेकोटी पेटवली.प्रसाद कंपनीने खिचडी तयारी सुरू केली.
मुक्कामी ट्रेकची मजा यातचं आहे.सह्याद्री कळतो आणि माणसंही.सर्व कामात प्राजक्ता हिरहिरीने भाग घेत होती.
खिचडी स्वादिष्ट झाली.पोटभर जेवण झालं नी मी थोडावेळ टाईमपास करत मंदिरात झोपण्यासाठी गेलो.
इतर भिडू शेकोटी, आकाशदर्शनात गुंग.
दूसरा दिवस सार्थकी लागलेला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पहिला भाग समाप्त 🙏
संजय अमृतकर 🚩
Gypsy trekkerS
Nashik
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
भाग २ रा...
http://sanjayamrutakar.blogspot.com/2022/11/blog-post_29.html
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
हृदयस्पर्शी लेखन 🙏
ReplyDeleteधन्यवाद स्मिता 🙏😀
Deleteजबरदस्त ब्लॉग , वर्णन , माहिती खूप छान
ReplyDeleteखुप आभारी 🙏😀
Deleteअप्रतीम ब्लॉग...आठवणीतील ट्रेक
ReplyDeleteधन्यवाद किरण 🙏😀
ReplyDeleteनाना, सह्यांकन १७ ला तुम्ही नव्हता??
ReplyDeleteछान वर्णन व फोटोझ👍
मी नव्हतो…हेमंत 🙏
ReplyDelete