भाग २ पाथरा/ उंबरदारा घाट

नमस्कार मंडळी..
नोव्हेंबर २९ ला ह्या ट्रेकचा पहिला भाग प्रकाशित केलेला.

http://sanjayamrutakar.blogspot.com/2022/11/blog-post.html

आज २ रा भाग..
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️

" ब्लॉग लिहिणं म्हणजे आठवणींची फ्रेम
दिवाणखान्यात लावण्यासारखी...
ती फ्रेम वर्षानुवर्षे तुम्हाला आणि तुमच्या घरी
येणा-यांना कुतुहलाची आणि सतत डोळ्यासमोर
असते.ती फ्रेम तुमच्या दिवाणखान्याची शोभा 
वाढवतेचं पण तुम्ही अनुभवलंय ते इतरांना प्रेरणादायी
ठरू शकतं.साहसी संस्कारांची बीजे तर अश्याचं
मार्गांनी रोवली जातात.
मग,
कधीकाळी वटवृक्ष होतो त्याचा 🙏
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
रविवार २० नोव्हेंबर २२

" पहाटे ४ वाजता प्रसादने सर्वांना उठवलं.
गारठा खूप नव्हता..तरी जरा कंटाळा आला होता उठायचा.
पण पुढचं नियोजन बघता सकाळची आवराआवर केली पटापट.चहा वैगरे होईपर्यंत भरलेल्या सॕक लाईनीत उभ्या राहिल्या.अरूणोदय व्हायची वेळ साधली नी पाऊलं उंबरदारा कडे निघाली.वेळ ६:४५ .
अतिशय प्रसन्न व आल्हाददायक वातावरण.
उगवतीच्या रंगांचे विलोभनीय रागरंग अनुभवायला मनं अतुर झालेलं.फार दिवसांनी असा योग जुळून आला होता.
एखाद्या डोंगरमाथ्यावरून तो विलासी रंग बघण्याची मजा काही औरच.
तांबड फुटलं..रे 
साद घालतो..!
काय सुंदर सोहळा असतो तो..!
💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
" तुरळक झाडी नी वाळलेलं सोनेरी गवत यातनं सुरेख वळणदार वाट मनावर जणू कोरली जातं होती.
तो पहाटप्रहरी कैवल्याचा प्रकाश अंगाला मोहरून टाकतं होता.त्या क्षणी .. कुठे झुडपात 
' डिंपल कपाडिया...गात होती..लता स्वरात..
दिल हूं हूं करे..घबराए..
एक बूंद सबी पाणी की ...मोरी अखीयोंसे बरसाए..

" ओ मोर चंद्रमाॕ ..तेरी 'चांदणी अंग जलाए'..
तेरी उंची अटारी... मैने पंख लिए कटवाएं..

काळीज पाझरवणारा स्वर,शब्द आणि कंपोझिशन..
वाह... क्या बात है
लता समजून घ्यायची असेल तर अशी गाणी ऐकावीत.
जिवन सार्थकी भाव ओसंडून वाहू लागतात..
💢💢💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
पाऊलं मात्र वेगाने चाललेली.डावीकडे दूरवर कात्राबाई,मुडा,गवळदेव,घनचक्कर रांग दृष्टीक्षेपात होती.
आणि सुर्याजीरावांचे घोडे दौडत येऊ लागले.
प्रकाश फुटण्यापुर्वी अज्ञात चिता-याने 
उगवतीचे रंग जणू हळूवार फटकारले.
कोवळ्या तांबुस किरणांच जाळ सह्याद्रीच्या अंगणात पसरू लागलं.झाडाझुडपातनं किरणांची उधळण..
मोहमयी.
झाडीछतातून तो झांझर प्रकाश झिरपत जणू सह्य आंगण सारवित होता.तिथे चालण्याचा वेग मात्र आपोआप कमी व्हायचा.
कुमशेतचा कोंबडा मागे सरला होता.
💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
काही वेळातचं उजवीकडे दाट कारवीच्या झाडांच्या गर्दीजवळ वाटाड्या थबकला.वेळ ८:१५.
सर्व सवंगडी एकत्र येईपर्यंत तो थांबला.
' एखादा नवीन बॕटिंगला आलेला बॕट्मन जसा क्रिजवर आल्यानंतर चौफेर नजर फिरवतो.तसे आम्ही आजुबाजुला न्याहाळत बसलो.फोटोग्राफीला सुवर्णसंधी होती ती.सर्व जमले नी वाटाड्या मनोज उजवीकडे दाट कारवीत घुसला.मग आम्हीही झाडींच्या पोटात शिरलो.अंदाज आला होता की आपण उंबरदारा खिंडीत जातोय.दाट रानातनं चढाई तशी दमछाक करू लागली.पंधरा एक मिनिटात डोंगर धारेच्या काठावर येऊन उभे राहिलो.रान उघडलं होतं.
आकाश मोकळं झालेलं.
खिंडीतून रानगाराव्याचा झोत अंगाला स्पर्शून जात होता.
प्रसन्नता वास करत होती.दिवसाने दान टाकलं होतं.
💢💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️

मनोज व सहकारी रॕपलींग सेट अप लावू लागले.थोडा हॕंग ओहर असल्याने पलीकडील तळ किंवा खोली स्पष्ट दिसत नव्हती.त्यामुळे किती फूट रॕपल करायचं याचा अंदाज मनोज सोडून कुणालाचं नव्हता.
सेट अप लागला.
उतराईचा पहिला श्रीगणेशा गणेश सोनवणे करणार होता.हारनेस बांधून गडी तयार.मंडोळ्या बांधून जसा नवरदेव.
सोबत बिलेची काटेकोर व्यवस्था झाली नी भाऊ रॅपल करत खाली उतरू लागले.गणेशने खाली उतरून अंदाज घेतला व काही सुचना केल्या.मग एकामागोमाग एक शिस्तीत उतरू लागले.छोटा ओव्हरहॕंग सोडला तर खाली १५/२० फुटांवर थांबता येऊ शकत होतं.पण ढासळलेले लहान मोठे दगड व घसरडी उतराई त्यामुळे अजून २०/३० फूट खाली पर्यंत रॕपल करत जाण्याचा निर्णय झाला.

खाली उतरलेले भिडू एका जागी न थांबता पुढे जाऊ लागले.कारण तिथं थांबणं अवघड व जिकिरीचं होतं.सुटलेले दगड कधी कपाळमोक्ष करतील याचा काही भरवसा नव्हता.
गणेश व अजून एक सहकारी तिथे मदतीसाठी थांबले.बाकी इतरांपाठोपाठ मीही उंबरदारा नाळ उतरू लागलो.नाळेत सर्वत्र दगडांचा खच पडलेला.आजुबाजूला दोन उत्तुंग
कातळभिंती.त्यामुळे प्रत्येक पाऊलं सावध टाकत उतरू लागलो.दोघांत बरचं अंतर ठेवणं भाग होतं.नाही तर उतरताना सुटलेला एखाद्या दगड अपघात ग्रस्थ ठरू शकतो.याचा अंदाज आल्याने उतरणारेही अंतर राखूनच उतरत होते.
💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
हा सर्व खेळ तासभर तरी चालला असावा.
उजवीकडे एका वळणानंतर माथा व रॕपलींग ठिकाण दिसेनासे झाले.आणि सुटलेल्या दगडांची दादागिरीही कमी झालेली.ही नाळ उतरताना अनेक नाळा व घाटांची आठवण झाली.अगदी माकडनाळ,नळीची वाट,शिळ्याचा दारा,गुयरीचं दार इ.इ.शेवटी तर रोहिदास घळीची आठवण आलीचं.सारखे उतरतोय .. उतरतोय.गुडग्यांवर सतत खबरदारीचा ताण होता.एका ठिकाणी खडकधारेचा आधार घेत उतरलो.तर एका ठिकाणी रानजाळीतनं वाट काढत.
तरी सपाटी काही येईना.दोन,तीन ब्रेक घेतले.तरी कातळ उतराई काही संपेना.प्रकरणं सोप्याचं अवघड झालेलं.
💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
शेवटी...
मनोज म्हणाला'ही जवळचं हाय सपाटी.
मग आनंदात शेवटचा ब्रेक घेतला.खळखळतं पाणी होतं सोबतीला.लिंबू सरबत ,चिवडा व सर्वांकडे उरलंसुरलं बाहेर आलं.मोठा ब्रेक झाला.आणि तिथून तरी अर्धा तासाने सपाटी लागली.मनोजने आमचा करेक्ट कार्यक्रम केला होता.😀
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
आता मळलेली ऐसपैस वाट.वळणाची.
दूरवर झाडोरा दिसायचा.बरंच अंतर चालत राहिलो.
तरी गांवचं निशाण काही दिसेना.
मागचा व्हू वाईड आॕगल होतं चाललेला.
उंबरदारा व्हरटिकल अॕगलमध्ये .. गगनभेदी 
आमच्याच विश्वास बसेना.
इथून उतरलो आपणं ???
सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य भाव.
नाप्ता व्हू तर धडकी भरवणारा.
अब तेरा नंबर लगता है भो..!!!
नाप्ताला निरोप पाठवला.
💢💢💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️

अथक चालीनंतर एक पुल लागला.
खाली स्वच्छ पाणी होतं.
डुबायची इच्छा झाली.
पण ३ वाजताची बस पकडायची होती.
मुढोळवाडी हाकेच्या अंतरावर आहे.
डुबलो तर अर्धा तास जाणार.
घड्याळाचे अडीच वाजलेले.
शेवटी,
नको रे ..ते डुबने..😀
                 उंबरदारा पायथ्याशी : नाप्ता व्हू 
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
म्हणंत पंधरा मिनिटांत वाडी गाठली.शाळेजवळ सर्व
जमले.वाडी आणि पाठीमागे सह्याद्री नजराणा डोळ्यांच पारणं फेडत होता.
कुंडाच्यावाडीतनं दिसणारा ७० एम एम इतकाचं हा नजराणा पेश येत होता.
मनं भरून आलं.
थकवा दूर झालेला.
हिचं किमया सह्यनामाची.
💢💢💢
🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️🏷️
कधी वाटतं..बास झालं हे फिरणं.
पण ते तेवढ्या पुरतेच ठरतं..!
पुन्हा बकेट लिस्ट उघडायची.
नवीन प्लॅनवर शिक्कामोर्तब करायचं.

हा सिलसिला गेली १८/२० वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
याला फक्त "सह्याद्रीची भानामती"
म्हणावे काय ???

शोध सुरू आहे.

धन्यवाद 🙏

संजय अमृतकर 🚩
Gypsy trekkerS
Nashik 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भाग दूसरा..शेवटचा 
समाप्त 🙏
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
एकूण सोबती.. १५

राकेश शिंदे - नाशिक ( जिप्सी ) 
समीर नागरे- नाशिक ( जिप्सी ) 
संजय अमृतकर -नाशिक ( जिप्सी ) 
आदित्य फाळके -नाशिक ( जिप्सी ) 
प्राजक्ता शिरोडे - नाशिक ( जिप्सी ) 
भारत बोरसे - नाशिक ( जिप्सी )
प्रसाद कुलकर्णी - नाशिक
गणेश सोनवणे - नाशिक
आशिष देवकुळे - पुणे
कुणाल कदम- करीरोड
आशय शहा - पुणे
राजेंद्र आम्ले - घाटकोपर
अजय पाटिल - नाशिक
अल्पेश पेंढारी - मुलुंड

वाटाडे..
हैबत - कोठाची वाडी ( कडशेत ) 
मनोज खाकर -वालीव-हे 
💢💢💢
# ह्या दोन्ही वाटा एका दिवसांतही करता येतील.
कमी संख्या,पट्टीचे ट्रेकर आणि कुंडाच्यावाडीतनं सकाळी ६ वाजता निघायचं.
# पाथरा वा उंबरदारा ट्रेक करणाचा योग्य काळ म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी.
#दोनही वाटमार्गावर कुठेही पाणी नाही.
#टेक्निकल साधनांशिवाय उंबरदारा अशक्य.
#नवीन ट्रेकर मंडळीने सराव करून मगचं या वाटांच्या नादी लागावं.
#बुट ग्रीपचे व सवयीचे असावेत.CTR is best.
#पाथरापासून कुमशेत चाल तासाभराची आहे.
#आजोबा पुर्व पायथा अर्धातास किंवा ४५ मिनिटे.
#गुयरीदार एक तास.
#वाटाड्या सोबत घेतला तर उत्तम.किंवा माहितीगार सोबती हवा.
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
End 

Comments

  1. Great experience Nana....really experienced with you...

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख 👌आम्ही पण तुमच्यासोबत ट्रेक केल्यासारखे वाटले.

    ReplyDelete
  3. मस्तच लेख आणि फोटो.... मला वाटलं तुमचा पाथरा झाला असेल, असो.. दोन्ही वाटा कसदार... उंबरदार तर आम्ही उभयतांनी गेल्या वर्षीच केली. मनोजचा त्या भागातील भूगोल एकदम पक्का आहे.. लेख वाचून दोन्ही वाघांच्या आठवणी जाग्या झाल्यात.

    ReplyDelete
  4. पाथरा व उंबरदार घाटवाटा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या .
    तुमच्या बकेट लिस्ट वर जेवढया टिक मार्क होत आहेत । तितक्याच जोमाने अजून बकेट लिस्ट मध्ये भर पडत आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..