तारामती घळ/टोलार खिंड
एकदिवसीय..
चढाई : २९ जानेवारी २३..
तारामती घळ उतराई : टोलार खिंड
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
किर्र रात्र..
अंधार कापत आमची गाडी वाघ्याच्या वाडीकडे सुटलेली..
सह्याद्री भटकण्याची असाध्य स्वप्ने उराशी बाळगून आम्ही
ती साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत होतो.
काळोख्या रात्रीही ती वाटचाल लख्ख चमकत होती..
"तारामती घळीचं” वार घोंघावत होतं.
दूरवर..
दोन चार मिणमिणते दिवे दिसू लागले..
तसे ..आम्ही सजग होऊ लागलो.
वाडीत पोहचायला ९:४५ झाले होते.
अभिजित हा वाडीतला भिडू आमची वाटचं बघत होता.
या आधी दोन मुक्काम अभीच्या घरी झालेले.
त्यामुळे रूळायला फारसा वेळ लागला नाही.
फ्रेश होऊन जेवणाला बसलो.
आणि..नंतर सॕक चेक करून ठेवल्या नी,
झोपायची व्यवस्था केली.काही वेळात light off.
अंधारल्या खोलीत डोळे उघडे ठेवून स्वप्न बघू लागलो.
तारामतीचं गारूड मानगुटीवर बसलं होतं.
जड डोळ्यांनी निद्रेपाशी शरणांगती पत्करली
नी दिवस काळाच्या गर्भगृहात विसावला.
🟩
पहाटे ४ चा गजर..
सकाळचे सर्व सोपस्कार पूर्ण होई पर्यंत ५ वाजले.
लंचपॕक घेऊन बरोबर ५:२० वाजता घर सोडलं.
हेडटाॕर्च आॕन झाल्या.पहाटप्रहरी वेळी पाऊलं तारामतीच्या थेट पायथ्याकडे चालू लागली.
अजूनही अंधाराचं साम्राज्य होतं.
निर्जन ऐसपैस वाट.
उजवीकडे उंच दूरवरून गाड्यांचे हाॕर्न ऐकू येत होते..
माळशेजघाटाचा राबता तसा २४ तास वाहता.
आणि आम्ही अगदी तळाशी काळू नदीच्या खोऱ्यात
आश्वासक दृढनिश्चयाने चाललेलो.
दुतर्फा सह्याद्रीची गिरीमाला.
दक्षिणोत्तर दिशांना महाकाय कातळकडे उभे.
प्राचीन काळापासून तर आजतागायत इथला राबता
तसूभरही कमी झालेला नसावा.
फरक इतकाच की गरजा, उद्दीष्टे वेगवेगळी होती एवढचं.
काळू नदीच्या खोऱ्यात कितीतरी ट्रेकर्स मंडळींनी भटकंतीची स्वप्ने रंगवली असतील.कारण इथलं प्रकरण संपण्याइतकं सोपं नाही.
हे कुठलाही जातिवंत भटक्या जाणतो.
काळू खो-याच्या दोनही बाजूंना अजस्त्र कातळकडे असे जणू
हिमालयासारखे उभे.
आणि इथं आत किती गुपित दडली आहेत याला तर काही सिमाचं नाही.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️🟩
इकडे अंधारात मनोजचा जरा अंदाज चुकला.
नी वाट भरकटली.
काळ्या कपारी नी निबिड जंगलात
आम्ही चक्रव्यूहात अडकल्या सारखे अडखळलो होतो.
तो हिंस्र हिरवा पर्णवास श्वासात विरघळत होता.
छातीचा भाता फुलत चालला होता.वाट तर कुरकुरीत..
शांतता भंग करणारी.
पुढे अनेक वाटातली मुळ वाट मनोज विसरला.
मग पुढे जाऊन मागे फिरलो.नी आम्ही पुन्हा योग्य वाटेने मार्गस्थ झालो.(अर्धातास वाया गेला.)
तोपर्यंत फटफटलं होतं.
नवा कोरा दिवस दिमतीला हजर झाला होता.
पावसाळ्यात हरिश्चंद्रगडावरून कोसळणाऱ्या सहस्र धारा
काळूच्या नदीत समरस होतात..ती वाट आम्ही पार करू लागलो.वाट तर दगडांनी खचाखच भरलेली.वाळू कुठे तरी औषधाला फक्त.७:३० वाजता घळीच्या पायथ्याशी येऊन थांबलो.समोर धबधबा कोसळणारा उंच कातळ आमच्या स्वागतासाठी सज्ज होता.पण आम्ही त्याला चकवा देत
डावीकडे घसरड्या वाटेने चढू लागलो.सुटलेली माती आणि खडी चढाई जरा सावधपणे पार करताना ..
एका ठिकाणी रोप लावण्याची गरज भासली.
मनोजने सावध चढाई करत एका झाडाला रोप बांधला.
मग आम्ही रोपचा आधार घेत वरच्या टप्प्यावर पोहचलो.
तारामतीने आपले पाश टाकायला सुरूवात केली होती जणू.
अजून पुढे काय वाढून ठेवलय…
याची प्रचीती येऊ लागली होती.
मग झाडीतनं ट्रव्हर्स मारत एका मोठ्या कातळावर येऊन धडकलो.
आकाश मोकळं झालं होतं.
जिथून पावसाळ्यात धबधबा कोसळत असेल.त्या जागेवर स्थिरावलो.
(जो खालून दिसत होता.) मोकळ्या जागेवर डॉ.स्मिताने आणलेला गरम चहाचा आस्वाद घेतला.
तिथे स्वच्छ पाणी असल्याने फ्रेश झालो नी पाणी कोटा पूर्ण केला.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️जरा विसावून पुन्हा कातळचढाई सुरू.
कुठे दगडांवर चालत ..
कुठे त्यांचा आधार घेत पुढे डावीकडे पोटावरून अडचणीच्या
वाटेवरुन चालत ट्रव्हर्स च्या टप्याजवळ येऊन पोहोचलो.
जो ह्या ट्रेकचा Highlight spot होता.
जिथे गरज आहे..तिथे Technical support घ्यायचाचं
असं मनोमन ठरलेलं.वेळ जातो पण safety first.
त्यामुळेचं इतकी वर्षे सुरक्षित ट्रेकिंग करतोय.
घड्याळात ९:३० वाजलेले.
मनोज व अभिजित अकोलकर यांनी तिथे सेट अप लावायला सुरुवात केली.आम्ही चौफेर व्हू न्याहाळत व गप्पा मारत बसलो.मनोज चार ठिकाणी रोप अडकवत पलीकडे गेला.
सेट अप लावायला तरी तासभर गेला.ट्रव्हर्स १००/१५० फुटांचा पण खाली ड्राॕप २०० फुटाहून अधिक.
सर्व ओके आहे..चला रे..
अभिजितचा सांगावा आला.पलीकडे टोकावर मनोज लिड करणारा.
आणि..
ट्रव्हर्स क्राॕस करण्यासाठी पहिला भिडला तो सचिन खराटे.तो तर अगदी सावधपणे व आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाकत पलीकडे पोहचलाही.मग डॉ.अविनाश सर पोहचले...मग मी निघालो.बुट काढले तर अर्ध पाऊल बसेल एवढ्या धारेवरून डावा हात कातळावर रोवत पुढे जायचं.कधी दोघे हात कातळभिंतीवर रोवत पुढे सरकायचं.
हे काम सोपं तितकं थरारक.रोपला सेल्फ अॕंकर असल्याने आत्मविश्वास प्रबळ होता.तरी,सजगपणे तो टप्पा पार केला.
मग हर्षद भट आला मग अभिजित नी शेवटी परमभाय.
सेट अप आवरून वरच्या टप्प्यावर पोहचलो.यात जवळपास दोन ते अडीच तास गेले.एकूण ९ भिडू असल्याने वेळेत कार्यक्रम आवरला.घड्याळात ११ चे टोल पडले होते.
माझ्या नियोजनानुसार १ तास उशीर झालेला.
इथे वेळ किती लागला यापेक्षा सर्व सुखरूप पोहचले याला जास्त महत्त्व.वेगापेक्षा सावधानता महत्वाची.हा गुरुमंत्र अनुभवातून मिळालेला.मनोज, अभिजित व परमभाय यांनी सेट अप आवरेपर्यंत आम्ही पुढे एक कातळ टप्पा उतरून भल्या मोठ्या कातळाआड सावलीत बसलो.
सर्व एकत्र जमल्या नंतर येथेचं जेवून घेऊ असं ठरलं.
सकाळचा लंचपॕक संपवला नी पुन्हा चढाई सुरु झाली.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
समोर घळीत अनेक महाकाय शिळा वाट अडवून बसलेल्या.
वरून कोसळल्या असतील तेव्हा किती भयंकर आवाज झाला असेल..! त्यांना पार करणे महाकठीण होतं.विविध योग प्रकार करत एक एक टप्पा पार करू लागलो.इथे सर्व भिडू अनुभव, आत्मविश्वास, शारीरिक बळ, आणि धैर्य यांचा मिलाप करूनच वरच्या टप्प्यावर पोहचले.डोंबा-याची कसरत आठवली इथे.😀
कारण... आम्ही कसरत चढाई त्याहून वेगळी नव्हती.
दुपार टळली होती.
(घड्याळात १२:४८ वाजले.)
उनं फारसं त्रासदायक नव्हतं.
तरी... शक्य तेंव्हा पाणी पिणं चालू होतं.
इथून उजवीकडे आडराई जंगल पार करत खिरेश्वरकडे जाणारी वाट होती.तर डावीकडे तवलीची पायरीवाट खाली उतरत आलेली.मागच्या वर्षी खिरेश्वर ते खिरेश्वर व्हाया तवलीची वाट -आडराई असा जंबो ट्रेक केलेला.
पण खिरेश्वरच्या वाटाड्याने ह्या तारामती वाट बद्दल काही सांगितले नाही.असो..
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️पुन्हा अंगावरची चढाई सुरु झाली.
मोठं मोठ्या कातळांना पार करत,कधी आधार घेत
वरच्या टप्प्यावर आलो.
तिथे स्वच्छ पाण्याचा साठा दिसला.
इथून पुढे कुठेही पाणी नाही.
त्यामुळे पाणी स्टाॕक फुल करून घेतला.
आता समोर तारामती घळ स्पष्ट दिसू लागली.
आयला,
म्हणजे आतापर्यंत चढलो ते...?
कारण समोर दिसणारं प्रकरण काही औरचं होतं.
Vartical व्हू छाती दडपणारा.
आणि पायथ्याशी अजून जंगल पार करायचं होतं.
अंधार पडायच्या आत माथा गाठायचा हा संकल्प होता.
अजून ३ तास लागतील...! चला पटापट
मनोजने हळूचं बाॕम्ब टाकला.
घड्याळात बघितलं २:१० झालेले.
म्हणजे ५ ते ६ च्या दरम्यान वर पोहचू.
वरच्या टप्प्यावर खिरेश्वर कडून रोहिदास कडे जाणारी
जंगलवाट लागली.जी मी या आधी २ वेळा पार केलेली.
त्यामुळे जून्या आठवणी उचंबळून आल्या.
इकडे गतस्मृतींचे दरवाजे उघडून त्या दालनात वर्तमानाच्या उन्हात चढाई करायला पाय मोकळे झाले होते.
पुर्वेला पलीकडे जुन्नर दरवाजा वाट खिरेश्वरकडे उतरणारी.
ती ही वाट आम्ही मागच्या वर्षी केलेली.
खिरेश्वर ते खिरेश्वर व्हाया जुन्नर दरवाजा/टोलार खिंड.
तीही धमाल वाट आहे.
इकडे चढाई करताना दुतर्फा रानझाडींचा गारवा अंगाला मोहरून टाकत होता.
केवढ सुख ते.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️आता ख-या अर्थाने तारामतीचा मुळ टप्पा सुरू झाला.
इकडे मघापेक्षाही challenging चढाई होती.
आव्हानात्मक..!!!
थेट अंगावर येणारी.आणि कस बघणारी.
चढाईसाठी खरं तर वाट अशी नव्हतीचं.
वर कसं जाता येईल..?
याचं उत्तर शोधायचं नी जिवाच्या आकांताने चढायचं.
दमछाकने कमाल मर्यादा गाठली होती.
Self क्लाइंबिंग with out रोप 😀
हा प्रकार इथे टप्याटप्यावर करावा लागत होता.
स्वतः चं शरीर दोन हातांवर किंवा दोन हातांनी
उचलता यायलं हवं.
एवढा हा इथला मुलमंत्र.
ते पण सॕक बाळगून.
अनुभवाचे अनेक पदर कामी येतं होते.
तरी..
अश्या चढाईचे बाळकडू आम्हाला समृद्ध करत होतं.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️घड्याळात ४ वाजले.
अजून २/३ टप्पे जिवघेणे.
एका ठिकाणी तर झाडावर चढून वरचा कातळ टप्पा
गाठावा लागला.हसावं की रडावं 😀 राव.
अशी इथली परिस्थिती.चढाईचा कुठला प्रकार राहिला..?
जरा तपासा रे..!😀
शरीरात आणि मानसिकतेत बळ असल्याशिवाय कोणी
हा ट्रेक करूचं शकत नाही.
दोन्ही समांतर ..श्रेष्ठ कुणी नाही.
इतकं प्रकरण अवघड.
शब्दात आणि फोटोतही ते सांगता..वा
दाखवता येणार नाही.
बरं... कोणाला परतायचं असेल तर..
मागे फिरण्याचे दोरही कापले गेलेले असतात..
त्यामुळे चढाई करत रहाणं..हा एकमेव पर्याय.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
६ च्या ठोक्याला चिमणी क्लाइंबिंग जवळ येऊन धडकलो.
इथंपर्यंतचा टप्पा कमालीचा थरारक.
दोन हातांच्या आधाराशिवाय तुम्ही चढूचं
शकत नाही.तेही पाऊलं मोजून टाकायची.
जरा गुयरीची वाट आठवली.
तसा कातळ टप्पा.पण दोन टप्प्यात.
इथे वेळ जातो.पण पर्याय नाही 😀
वरचा माथा हाकेच्या अंतरावर वाटू लागला.
भल्या मोठ्या कातळातून वर चढायचं..
तेही दोन हातांचा नी पाठीचा खुबीने वापर करत.
एवढचं बाकी होतं की काय..?
असा प्रश्न पडावा.
पण
सुदैवाने सर्व दमदार भिडू लिलया वर आले नी..
जल्लोष झाला..
कारण कातळसंघर्ष जवळपास संपुष्टात आला होता.
आता थोडं वर जाऊन डावीकडे कारवीच्या रानातून
माथा गाठायचा होता.
दिवस मावळतीला गेलेला..
काय टाईमिंग साधलं होतं आम्ही...
खडतर चढाई संपली..तसा दिवस माघारी फिरलेला..
माझ्या एकूण ट्रेकिंग काळातली ही सर्वात आव्हानात्मक चढाई.
सर्व प्रकारचे गुणसंपन्न 😀
मागे वळून बघितलं..
अंधुकश्या प्रकाशात तारामती घळ रात्रीच्या
बाहुपाशात विसवू पहात होती.
पुढचं पाऊल टाकेपर्यंत.. डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या..
" सह्याद्री..
तुचं सुखकर्ता..तुचं दु:खहर्ता..
तुम बिन कौन मेरा..!!!
अश्या भावनांनी गदगदून आलं..
ओलेपणाने अंतर्मन अभिषेकी भिजलं होतं.
हेडटाॕर्च कपाळावर स्थिरावल्या..
कारवीचं रान सारत... मोकळ्या आकाशी आलो.
अफाट आकाश हिरवी धरती
पुनवेची रात चांदणं भरती
पाचूची लकेर कुरणांची ओठी
प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंददात्री मी आनंदयात्री
भरून पावल्याच्या भावना याहूनी काय असू शकतात.
🙏🙏🙏
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️काही काळ धुके भरल्या वाटेने चालत राहिलो.
आणि टोलार खिंडीच्या वाटेत मिसळलो.
पहाटेपासून चालतोय..चढतोय...थकतोय..
पुन्हा चालतोय..
पण आता ही परतीची वाट..
परतीची ओढ एखाद्या प्रियसी सारखी.
हवीहवीशी.
त्यामुळे.. इतकं थकूनही चालण्याचा वेग कमालीचा होता.
ओळखिची वाट असल्यागत सर्व वेगात सुटले होते.
खाली दूरवर..खिरेश्वरचे मिणमिणते दिवे लुकलुकणारे
आणि आमचा वेग अजूनचं वाढला.
९:३५ वाजता खिरेश्वर गाठलं.
मागे वळून बघण्याचं धाडस कोणी केलं नाही.
यांतच...
आजच्या भटकंतीचं गुढ दडलेलं आहे 😀
समाप्त 🙏
संजय अमृतकर
Gypsy 🚩
-------------------------
भिडू : ९
डॉ.स्मिता/ डॉ.अविनाश गाडेकर
सचिन खराटे.. परमभाई
विजय गुर्जर.. हर्षद भट
संजय अमृतकर
वाटाड्या: मनोज खक्कर (वालीव-हे)
---------------------------------
💢सह्याद्रीतील चढाईसाठी 2 नंबरची सर्वोच्च अशी तारामती घळ जी साधारण 3411 फूट सलगपणे उंच आहे.
( पहिल्या नंबरवर कात्राबाई घळ.3854 फुट.पण ती पुर्ण Technical आहे.ती सुरज मालुसरे याने आपल्या टिमसह केली आहे)
इथे चढाई वेळी मध्ये कुठेही गांव,पाडे,वस्ती नाही.
एक १०० ते १२५ फूट ट्रव्हर्स आहे.जिथे टेक्निकल
सपोर्ट घ्यावा लागतो.
आणि माथ्यापर्यंत फक्त महाकाय दगडांचा खचं पार करावा लागतो.तो सलगपणे.सोबत अनेक ठिकाणी लहान मोठे राॕकपॕचेस आहेत.कुठे रोपचीही आवश्यकता आहे.सेल्फ क्लाइंबिंग with out रोपचे अनेक पॕचेस आहेत ते वेगळे.
💢आम्ही ह्या वेळी..रेग्युलर जेवणापेक्षा फळ आहार
यावर भर दिला.अननस,पेरू,अंजीर,संत्री,सफरचंद,केळी
राजगिरा लाडू.तेही ठराविक अंतरावर एक फळ अश्या नियोजनाने घेत राहिलो.त्यामुळे शरीरात पाणी व उर्जा टिकून राहिली.खुप थकलो,क्रॅंप आले,गुडघे कुकुरताहेत असं कधी झालं नाही.
💢पाणी ३ टप्यात मिळालं.त्यामुळे ३ लिटर पेक्षा जास्त स्टाॕक बाळगला नाही.
💢 रेग्युलर ट्रेक करत असाल..तेही सातत्याने.
तरचं तारामती घळच्या नादी लागा.
सॅक पाठीवर असतांना अनेक राॕक पॕचेस चढायचे असतात.
त्यासाठी शरीरात बळ आणि दमदार आत्मविश्वास हवा.
एवढं लक्षात ठेवा.
💢 वाटाड्या सह अजून एक टेक्निकल जाणता भिडू हवा सोबत.त्यामुळे टेक्निकल पॕचला वेळ वाचू शकतो.ग्रुपचा आकार १० च्या आत असावा.कंट्रोल ठेवणं सोपं जातं.
सकाळी ५/६ वाजता ट्रेक सुरु केला तर उजेड असेपर्यंत सहज माथा गाठता येतो.
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
समाप्त.. धन्यवाद 🙏
अतिशय सुरेख वर्णन !पूर्ण ट्रेक डोळ्यासमोर उभा राहिला 🙏
ReplyDeleteधन्यवाद स्मिता..U R rock.
Deleteसह्याद्रीमध्ये बागडताना हा नाळ प्रकार खरंच अद्भुत आहे.अनेक विस्मयकारी अनुभव यातून आपल्याला प्राप्त होतात.शारीरिक आणि मानसिक काठिण्य जे काही तयार होत ते अगदी असे pure ingots ( शुद्ध धातुतून)! नाना proud of you! 🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद तुषार.. तुझ्या कांजण्या लवकर ब-या होतं.missing U
Deleteनाना (Sanjay Amrutker)
ReplyDeleteआपला ब्लॉग ३-४ वेळा सलग वाचूनही मन भरले नाही. डोळ्यासमोर संपुर्ण चढाई दिसत होती. जणुकाही मीपण तुमच्या बरोबर चढाई करतोय असे वाटत होते. आगदी ७० MM चा सिनेमाच बघतोय असे म्हणा ना. आपली लेखन शैली वाखाणण्याजोगी आहे यात शंकाच नाही आणि तुमच्यामुळेच मला पण लिहण्याची चालना मिळाली.
अतिशयोक्ती नाही पण तुमच्यामध्ये आणि तुमच्या सर्व टिम मध्ये मला शिवरायांचे मावळे लपलेले दिसतात. सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारे, बेडर, निडर, स्वतःच्या मनगटावर प्रचंड विश्वास. जिद्द अेवढी की किल्ला सर केल्याशिवाय थांबायचे नाही की दमायचे नाही.
नानां आपण संपूर्ण मोहीम ऐवढी सविस्तर लिहिली आहे की ती तुमच्या पुर्तीच मर्यादित न राहता मागुन येणाऱ्या प्रत्येक मावळ्यांना ती उपयोगी ठरेल. यात मला तुमचा निस्वार्थीपणा दिसतो. तुम्ही मोहीमेचा आनंद तर लुटलाच पण मागुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो आनंद कसा लुटता येईल ह्याची काळजी तुम्ही घेतली.
मोहीमेच्या आधीची पुर्व तयारी आणि मेहीमे दरम्यान घ्यायची काळजी आणि सुरक्षिततचेची खबरदारी सर्वच ऊपयुक्त ठरणार आहे. ह्या मोहीमेसाठी तुम्हा सर्वांचे खुपखुप अभिनंदन, भविष्यातील मोहिमांसाठी शुभेच्छा आणि ब्लॉग लिहल्याबद्दल आभार
संदेश सावंत