डेरा/सिद्धगड माची/लिंगी खिंड/उंबरा/दमदम्या/वरसदारा
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोरवाडी -डे-याची वाट-सिद्धगड माची-नारमाता मंदिर -लिंगीची खिंड -लिंगीची वाट-जाकमाता मंदिर -किर्ड्याचं जंगल -उंबाराची वाट चढाई-भट्टीचं रान -दमदम्या-वरसदारा वाट उतराई-भाई कोतवाल स्मारक शेवट
(स्थानिक भागात " वरसदारा" किंवा वारसदार असाही शब्द संबोधला जातो.)
--------------------------------------------------------------------
अंजनेरी, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भिमाशंकर,महाबळेश्वर
हि ठिकाणे बहुत करून धार्मिक स्थळांचे प्रबळ दावेदार आहेत.
पण आम्हा ट्रेकर्स जमातीच्या दृष्टीने ती ट्रेकिंगची मर्मस्थळे आहेत.याचं सगळ्यात लक्षवेधी कारण म्हणजे इथल्या माथ्यावर जाण्यासाठी चोहूबाजूने वाटा आहेत.त्या वाटा असण्याची महत्वाची कारणे म्हणजे सुसह्य दळणवळण.
आणि गुरेढोरे चारण्यासाठी ढोरवाटांच जाळ.
हल्ली आमचं सगळं लक्ष अश्या वाटांवर लागलं आहे.
कुठे वाचलं,कुणी सांगितलं की आम्ही सुटलो तिकडे.
त्यामुळे सह्याद्री, भौगोलिक परिस्थिती,आणि चौफेर मुलुख अधिक नजरेखालून जातो आहे.यातनं भटकंतीचं सुख ते न्यारचं.हल्ली सोशल मीडियामुळे आमच्या व नवख्यांच्या जमातीत घाटवाटांच वेड कमालीचं बहरलं आहे.गडकिल्यां इतकीच गर्दी सध्या घाटांवाटांमध्ये रूळली आहे.
बरं..घाटावाटां व्यतिरिक्त आता वाटांवर मोर्चा वळाला आहे.
माथ्यावर वाट जाते ना ..! मग चला.खरं तर या वाटांचा वापर स्थानिक लोकांनी... लोकांसाठी तयार केलेला असतो.गुरं चारण्यासाठी, लाकूडफाटा गोळा करण्यासाठी,जंगलसंपत्तीचा अर्थार्जनासाठी (मध, वनस्पती,व रानमेवा गोळा करण्यासाठी)केला जात असतो.पण आमच्या साठी त्या ट्रेकमय रूट होऊ पहात आहेत.
हा ब्लॉग अश्याचं वाटांवरील भटकंतीचा.
----------------------------------------------------------------------
दमदम्या/वरसदारा वाट..
या शब्दांभोवती माझं भटकं मनं सारखं घुटमळत होतं.
रणरणत्या उन्हाचा बोलबोला सुरू होण्याअगोदर
इकडे जायला हवं..
असं मनोमन वाटू लागलं.आणि त्याचं भागातील
कळंब गावांतील मित्र प्रताप गोडंबेला फोन लावला.
हा प्रताप आम्हाला देहरी गावांत गेल्या वर्षी अनावधानाने भेटलो.आणि सह्यमित्र झाला.अर्थात फेसबुक फ्रेंडही.
त्यामुळे एकमेकांच्या भटकंती विषयी माहिती मिळत राहिली.
तर,प्रतापशी संबंधित रूट बाबत सविस्तर बोलणी झाली नी
नियोजनाची जुळवाजुळव सुरू झाली.प्रतापने दूसरा पर्याय सुचवला कि देहरीतनं सिद्धगड माचीवरील मंदिरात रात्रीचं मुक्कामी जाऊ.
मग सकाळी उंबरा वाटेने दमदम्याकडे जाऊ.
पण..मी ठाम...बोरवाडीतनंच जाऊ यासाठी.
प्रताप सोबत येणार म्हटल्यावर माझी इतर चिंता मिटली होती.कारण तिकडचे अनेक रूट तो भटकलेला.त्यांत वरसदारा वाट केलेला.हे महत्वाचे.
शिवजयंतीचा दिवस ठरवून आम्ही आदल्या दिवशी म्हणजे १८ तारखेला रात्री ८ वाजता देहरी कडे निघालो.सरळगांव नंतर १ किमीवर उजवीकडे फाटा फुटतो.मग टार रोड.देहरी अगोदर कळंब लागतं.
पोहचायला रात्रीचे ११:३५ वाजले.
मुक्कामाचं नियोजन होतं बोरवाडीत.
पण प्रतापच्या आग्रहाने आम्ही त्याच्याचं टुमदार घरी
मुक्काम करायचं ठरवलं.घर ऐसपैस.
आणि आतिथ्यशील कुटुंब.
पहाटे ५ चा अलार्म.
बोरवाडीत पोहचायला ६:४५ झाले.
आणि
ट्रेक बरोबर ६:५८ वाजता सुरू झाला.
समोर उत्तुंग असा सिद्धगड माचीच्या उठावामुळे
दिसेनासा.डे-याची वाट मात्र स्पष्ट दिसत होती.
सकाळी प्रसन्न वातावरणात ट्रेक सुरु झाला.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
२०११ साली कै.अविनाश जोशीकाकांच्या नेतृत्वाखाली आम्ही डे-या वाटेने सिद्धगड केलेला.तेंव्हा अगोदरच्या रात्री भाईकोतवाल स्मारकाजवळ मुक्काम केलेला.
आणि सकाळी काकांच्या ओळखीच्या घरी बोरवाडीत येऊन चहा पोहे खाल्लेले आठवतात.
इकडे डे-याची चढाई आणि दक्षिण व्हू कमाल.
उगवतीच्या भगव्या रंगाने दक्षिण आसमंत सोनेरी
किरणांनी जणू उजळलेला.
पुर्वेला भिमाशंकर -पदरगड- तर दक्षिणेला कोथळीगड -कौल्याची धार आणि थोडं उजवीकडे माथेरानचा परिसर
मोठा मनोहरी दिसतं होता.
' तिथल्या भटकंतीच्या अनेक आठवणी या क्षणी रूंजी घालत होत्या.पाऊन तासांत माचीवर आलो.नी सकाळच्या हलक्याशा सुर्यप्रकाशात सिद्धगडचं विलोभनीय रूपडं अधिक खुललेलं.दमदार चार करत ..
सिद्धगड वाडीला रामराम करून थेट नारमाता मंदिरापर्यंत पोहचलो.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
घड्याळात ८:५० वाजलेले.आता येथून दोन वाटा वेगळ्या होतात.एक डावीकडे गायदरा घाटाकडे जाणारी.अर्थात नारीवली गावांतनं सिद्धगड कडे येणारीही.
आणि दूसरी उजवीकडे लिंगीच्या खिंडीकडे जाणारी.
आम्ही मंदिर आवारात सकाळची न्याहारी उरकली.
नी उंब्रावाटेकडे निघालो.
खिंडीपर्यंत चढाई आहे.आणि खिंडीतून पलीकडे दक्षिणेला उतराई.पुर्वेला गगनभेदी दमदम्या आकर्षक.तर पश्चिमेस सिद्धगड पुर्ण उन्हात न्हाऊन निघत होता.तुटलेल्या..उध्वस्त केलेला जुना राजमार्ग न्याहळत दक्षिणेला उतरायला सुरुवात केली.बराचं वेळ उतरत होतो.मग डावीकडे पुर्वेला मळलेल्या वाटेवर आरूढ झालो.हि जंगलवाट पुढे वरसदारा ला क्राॕस करून किर्ड्याच्या जंगलातनं उंबरा वाटेला मिळणार होती.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
उनं अंगावर येऊ लागलं तसं जंगलपट्टा सुरू झाला.
किरकोळ स्वरूपात चढ उतार आणि सोबत हिरवा झाडोरा.
सोबत नेहमीचे भिडू असल्याने हसीमजाक सुरू होती.अपवाद दोघं नवीन भिडू.पण ट्रेकचा अनुभव असलेले.सागर ततार आणि डॉ.मानसी.पण तेही समरस झालेले.त्यामुळे गाडी सुसाट सुटलेली.
वाटेत एका ठिकाणी उजवीकडे जाखमातेचं पुरातन मंदिर दिसले.( वेळ ९:४० )तिथे एक फोटो काढं रे...झालं नी पुन्हा सुटलो.मंदिर आहे याचा अर्थ पुर्वी इथे राबता होता.दळणवळण जोरात असलं पाहिजे.पुर्ण कातळातून तयार झालेलं मंदिर.वर पत्राचं शेड.
पुढे जंगल मात्र दाट आणि मनोहरी.कुरकुरीत वाट वळणाची.एका "आकाश मोकळे "जागेवर थांबा.आता सिद्धगड उत्तर पश्चिमेस आणि दमदम्या अगदी उत्तरेला.waterbreak झाला.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
पुन्हा जंगलात घुसलो.वाट मात्र मळलेली.थोरली झाडे ताट मानेने उभी.किर्ड्याचं हेचं ते जंगल.चढ उतारांनी सजलेलं.प्रकाशकिरणांना तळ गाठायला कष्ट पडत असावेत इतकं दाट जंगल.भारावून गेलो सर्व.सुखावणारा झाडोरा मनं आनंदून गेला.
काही वेळेनंतर एक वाट डावीकडे वर जाणारी.तीचं चोखाळत चढू लागलो.जंगल मागे पडलं.आता मोकळी हवा.उनं अंगावर.समोर भिमाशंकरचे कडे उंचावलेले..
आम्ही डावीकडे कातळटप्यावर माकडचाळे करत चढू लागलो.उंबारा वाटेवर आरूढ झालेलो होतो.नाळेत दगडांचा खचं.दूसरी पायवाट गवतावरून निसरडी.पुढचे भिडू त्या वाटेने पुढे.आम्ही नाळेतनं.प्रताप आमची वरच्या टप्प्यावर वाट बघत उभा.तिथून तो काही सुचना करत होता.हलका ट्रव्हर्स मारून पुन्हा माथ्याकडे चढू लागलो.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
समोर उंचावर गुहासदृश्य टप्यावर आमचं लक्ष होतं.पुढे गेलेले सोबती मस्त सावलीत बसलेले.
तिथे जाईपर्यंत मात्र दमछाक झाली.पाण्याचे घोट रिचले.मग पेरू,ओले अंजीर,संत्री यांचा एक हप्ता संपवला.जरा गार हवेच्या झुळकेने सुखावत होतो.उन्हाचे रंग मात्र ताप देणारे.जरा विसावून पुन्हा चढाई सुरु झाली.आता मात्र छातीचे भाते फुलू लागले.पुन्हा एक हलका ट्रव्हर्स सोडून आम्ही चौघे नाळेतनं चढू लागलो.पण मोकळ्या दगडांमुळे चढाई अवघड.पुढचे भिडू ट्रव्हर्स मारून पुढे गेले सुद्धा.जबराट चढाई करत आम्ही भट्टीच्या रानात येऊन पोहचलो.वेळ : २ ची.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
गेल्या दिड दोन तास आस्ते कदम मुळे जरा वेळचं झाला.
त्यांत क्लीक क्लिक वेड.भट्टीचं रान टप्या टप्प्याने हिरवं.मधली पोकळी माळरान सारखी.या रानावर ४/५ वेळा तरी येऊन गेलेलो.पाणी संपत आलं रे..! सुदैवाने पाण्याचा छोटा डोह दिसला.तिथेचं पोटभर पाणी प्यालो.साठा फुल केला नी दमदम्या कडे निघालो.पाऊन तास तरी लागणार होता माथा गाठायला.प्रतापने सावध केलं.निघालो पुन्हा.आधी सरळ सुसाट चाल मग कारवीतनं चढाई.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
बरोबर ४ सुमारास दमदम्या माथ्यावर पोहोचलो आणि कल्ला सुरू झाला.पश्चिमेस सिद्धगडाचं विहंगम दृश्य हरपून टाकणारे.आपण किती उंचीवर आहोत याचा अंदाज आला.
आणि,
कितीतरी वेळा हुलकावणी देणारा दमदम्या आणि आमच्या पायाखाली होता.कधीचं स्वप्नातलं प्रत्यक्षात उतरलं होतं.भर्राट वा-यामुळे सुखाचं चांदणं आनंददायी.कुठल्याही उत्तुंग माथ्यावर पोहचल्यावर जो काही आनंद मिळतो..त्याहून इथला अधिक उत्तेजीत करणारा.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
उत्तरेला साखरमाची,तवलीची वाट,येतोबा मंदिर स्पष्ट दृष्टीक्षेपात.गायदरा मात्र लपल्या सारखा.तिथल्या पावसाळ्यातल्या आठवणी एखाद्या प्रियसी सारख्या चिरंजीव झालेल्या.प्रियसी म्हटलं मनं हळवं होतं.ते आज इथं झालं होतं.
दोन मिनिटे डोळे बंद करून पडलो.आनंदपर्वणी कुपीत भरून घेतली.
नंतर..
क्लिककिकाट व शिवजन्मोत्सवने वातावरणाने सर्व भिडू भारावून गेले.भर्राट हवेने फडफडणारा भगवा शिवकाळाचा महिमा डोळ्यासमोर उभा करत होता.आजही शिवमहिमा सळसळवणारा..! दुपार टळली होती.तिस-या प्रहरेचे भोई ओरडत होते..निघा आता.उशिर होईल .
वरसदारा वाट उतरायची आहे अजुन.
वेळेचं भान राखत प्लॕश आॕफ झाले नी जड पाऊलं परतीला निघाली.
💢 काही वर्षांपूर्वी घाटसम्राज्ञी प्रिती पटेल ने दमदम्या माथ्यावरून सिद्धगडाचा अफलातून फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.तेव्हा असा व्हू क्लिक करण्याची ती इच्छा आज सफल संपूर्ण झाली.त्या आधी सिद्धगड ट्रेक केला असल्याने तो व्हू मनांत घर करून होता.या क्षणी तो भन्नाट व्हू मोबाईल मध्ये विसावला होता.
• दमदम्या माथा सोडला नी अतिशय अडचणीच्या कारवीने व्यापलेल्या जंगलातुन दक्षिणेकडे निघालो.काही अंतर चालून गेल्यावर प्रतापच्या लक्षात आले की आपण वाट चुकलो आहोत.पुन्हा माघारी फिरून मुळ वाटेला लागलो.
तसा प्रताप काही व्यावसायिक वाटाड्या नाही.तो नोकरी करून भटकत असतो.आणि गडसंवर्धन मोहिमेत सहभागी होत असतो.त्यांचा मित्रांचा तसा ग्रुपही आहे.त्यामुळे तो चुकल्याने कोणी लक्षही दिलं नाही.
तर..
आता थेट दक्षिणेला उतराई सुरू झाली.
तीही दाट वाळलेल्या कारवीतनं.वाट अशी नव्हतीचं.
शरीराचे सगळे योग प्रकार सुरू झाले होते.😀
कुठे वाकून तर कुठे सापवळणाचे प्रकार करत जिवाच्या
आकांताने एक एक पाऊल पुढे जात होतो.
त्यांत खाली घसरडी माती.कारवीची साथ नसती तर प्रकरण अवघड होतं.पण अनेक ठिकाणी कारवीनेही आपला इंगा दाखवला.आडवी कारवी पार करणं महाकठीण.
कपडे फाटले रे...!
अशी परिस्थिती.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
त्यांत उजवीकडे थेट ड्राॅप.पण कारवीमुळे ती दिसेनासा.
आम्ही एक एक पाऊल डावीकडे उतरत एका घसरड्या घळीत आलो.आणि वरसदारा वाट सुरु झाली.
ही वाट कसली..!!
वेडेपणा होता तो.😀
बसुन घसरगुंडी करत पुढे मार्गक्रमण सुरू.
सुटलेले दगड आमची वाटचं बघत होते जणू.
थोडा जरी बेसावधपणा झाला तर पुढच्याचा कमाळमोक्ष ठरलेला.
पुढचे चार पाच भिडू सुरक्षित जागेवर पोहचले की मग आम्ही
आस्ते कदम उतरायचो.
आता कारवीचे जंजाळ संपले होते.
पण उभं राहून उतरणं तेवढंच अवघड.
तिरपा पाय टाकत उतरणं..
पोलचा आधार घेणं..
आणि ..
स्वतः ला सावरत उतरणं..
वर बघायचं नाही..खाली बघतचं पाऊलं टाकायची.
त्यात घश्याला कोरड पडायची..
" एक घोट मुझे भी पिलादे शराबी..
देख फिर होता क्या.
आशा भोसले यांनी गायलेली हे टॅब्लेट गीत या क्षणी
आठवांचे म्हणजे कमाल 😀
मग हळूहळू पाणीसाठा कमी होऊ लागला.
दूरवर..
मावळतीचा सोनेरी प्रकाश भिमाशंकर पहाडांना
सोनेरी वर्ख चढवत होता.
याचा अर्थ काही वेळात अंधार पडणार.
उजेड असतांना आम्ही इतके सावध उतरत होतो..
तर अंधार पडल्यानंतर काय..?
या विचाराने प्रकरण गंभीर होऊ पहात होतं.
हेडटाॕर्च माथी विराजमान झाल्या..
घड्याळात ७ वाजले होते.
मी,सागर,मानसी,रोहिणी आणि प्राजक्ता मागच्या टीममध्ये.
बाकी पुढे ..
बरं...पुढचे दिसेना आम्हाला..
वरसच्या झाडांनी वाट पुर्ण झाकोळली गेली होती.
त्यांत वळणाची उतराई.
फक्त दूरवर खालचा पायथा दिसायचा.
८ वाजता एका कठिण उतराईजवळ आमची भेट झाली.
इथे रोपची आधारासाठी गरज होती.
पण..रोप नसल्याने
एकमेकांच्या आधाराने तो पॕच उतरलो..
कदाचित अंधारामुळे त्या ड्राॕपचा अंदाज आला नाही.
पण उतरल्यावर मात्र आला.😀
प्रतापला विचारले होते...रोपची गरज आहे का ?
तर तो नाही म्हणाला होता.
असो,
पुढे असे ३ ड्राॕप पार झाले.
प्रताप बाजूने वाट शोधायचा प्रयत्न करायचा पण
अंधारात ती गवसायची नाही.
किंवा वाट नसायची.
त्यामुळे..कॕलक्युलेटेड रिस्क घेऊन आम्ही उतरत होतो.
अगोदर प्रताप उतरायचा..खालून तो मार्गदर्शन करत इतरांना उतरवायचा.यासाठी सचिनने मोलाची भूमिका पार पाडली.
तो मध्ये उभा राहून सर्वांना मार्गदर्शन करायचा.कुठे प्राजक्ता ही मदतीला यायची.
त्यामुळे उतरणं सहज व्हायचं.
वरद,पलाक्ष तर सराईत ट्रेकर्स सारखे झपाझप उतरायचे.
मग,
डॉ.स्मिता, डॉ.अविनाश..नंतर
रोहिणी, प्राजक्ता,सागर,मानसी..
शेवटी मी.
हा क्रम शेवटपर्यंत तसाचं 😀
खाली उतरल्यावर वर बघायचं.
तेही हेडटाॕर्चच्या प्रकाशात.
आणि..
देवाचे आभार मानायचे.
बरं..
हे असे प्रकरण थांबायचं नांव घ्यायचं नाही.
९ वाजे पर्यंत तर हे असचं चालू.
पाच सहा स्लिंग होत्या.सोबत दोन कॕराबिनरही.
पण..त्या जाॕइन करा..मग उतरा.
यांत पुन्हा जास्त वेळ गेला असता अजून.
म्हणून..
जसं शक्य होईल तसे पुढचे उतरायचे मग मागचे.
एका ठिकाणी तर..
झाडावरून खाली उतरलो.
दूसरा मार्गचं नव्हता.
ते झाडं नसतं..तर..
मुक्कामचं होता आमचा.😀
पण..खरं सांगू ..
तसचं व्हायला हवं होतं.
दोन वर्षांपूर्वी नांगरदारला झालं तसं.
तो कसा मरेपर्यंत आठवणीत राहणारा ठरला.😀
तसा याचा पण नंबर लागला असता.
लई मजा आली असती 😜
बरं...इथे पण ७०/८० अंशांची उतराई..
आणि ड्राॅप प्रकरण.
सगळ्यांसाठी मात्र कस बघणारं होतं.
सुदैवाने कोणी धीर सोडला नाही.
किंवा पांढरं निशाण दाखवलं नाही.
नाही तर..? 😀
डॉ.मानसी तश्या नवीन..
म्हणजे ट्रेक करत होत्या..पण असे नाही.
तरी..त्यांनी आपला स्टॅमिना,संयम, हुशारी,धीर
टिकवून ठेवलेला.
सागर ततारही तसा नवीन..
पण साधारण ट्रेकचा अनुभव होता त्याच्याकडे.
स्लिमफिट व काटकपणा त्यामुळे तो सराईतपणे
उतरत होता.
सोबत डॉ.मानसीला उतरायला मदतही करत
होता.आम्ही तिघं सर्वात शेवटी.
मला तर शेवटी थांबणं गरजेचे वाटतं होतं.
वेळ लागला तरी चालेल पण सर्व सुरक्षित खाली
गेले पाहिजे.या हेतूने.
शेवटचा ओव्हर हॕंगला गुंगारा देत
आम्ही डावीकडे उतरू लागलो.
आणि
दूरवर गाडीचा लाईट चमकला.
काय सुख वाटलं असेल तेंव्हा आम्हाला..!
विचारू नका 😀
आता डावीकडून पुन्हा उजवीकडे उतरत गेलो.
नी थेट भाई कोतवाल स्मारकाजवळ येऊन पोहोचलो.
तेंव्हा..
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली..
" तो आपल्या पाठीशी आहे..!
हि भावना..
नाही तर..हे प्रकरण अवघड होतं.
हे अनुभवाने सांगु शकतो.
दोन लहान मुले,चार मुली/बायका
सोबत असताना आम्ही अगदी सुखरूप बाहेर आलो.
हे..
तो पाठिशी असल्याशिवाय शक्य नव्हतं.
तो.. म्हणजे
आमचा बाप ... सह्याद्री 🚩
तो अश्या अनेक ट्रेकला कठीण प्रसंगी धावून आलाय.
आम्हाला त्यातनं बाहेर काढलयं.
याची जाणीव आता प्रकर्षाने होऊ लागली आहे.
(२००९ साली सिद्धगड साठी डे-या घाटाने चढाई केली होती.
तेंव्हा अपरात्री आम्ही इथे भाई कोतवाल स्मारकाजवळ येऊन मुक्काम केलेला होता.
के.जोशीकाका,संजय कुलकर्णी,आदिल मिस्री, गणेश शिरसाठ,शेखर क्षत्रिय,पवन देवरे अशी टिम होती.
आज स्मारक व परिसर अधिक सोईयुक्त वाटला.
होऊ दे खर्च..
तसा इथेही केलेला दिसतो.)
इथून टार रोड सुरू झाला.
गाडीचा मागमूस नव्हता.
पुढचे भिडू सुसाट निघालेले.
आम्ही ५ जरा मागेचं.
टार रस्ता काही संपेना..
गाडी व सोबतीही काही दिसेना..
अंधारात फक्त हेडलाईटचा प्रकाश.
मग..गप्पा मारत चालतं राहिलो
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
सुदैवाने काही वेळातचं गाडी आली..
पुढे चौकीवर ती अडवली होती..
प्रतापमुळे आतपर्यंत आणता आली.
आणि..
एकदाचे गाडीत बसलो..
हुश्श 😀
⛩️
" मागे वळून बघावसं देखील वाटलं नाही..!
हे या ट्रेकचं सार आहे 🙏
⛩️
धन्यवाद
संजय अमृतकर
Gypsy trekkerS 🚩
Nashik
-------------------------
ता.क. वरसदारा करायचा असेल तर
ट्रेक करणारे अनुभवी साथीदार हवेत
सोबत टेक्निकल साहित्य.🙏
वाटाड्या तर माहितीतलाचं हवा.
जो ह्या वाटेने गेला आला असला पाहिजे.
उतरतांना मधल्या टप्यानंतर तीन ठिकाणी पाणी आहे.👍
अधिक सेफ्टीसाठी हेल्मेट असेल तर उत्तम.
-------------------------------
ट्रेक दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रविवार
" शिवजयंती उत्सव "
भिडू : ११
डॉ.स्मिता / डॉ.अविनाश गाडेकर
डॉ.मानसी नांदुरकर,रोहिणी जैन
सागर ततार, प्राजक्ता शिरोडे
वरद/सचिन खराटे,पलाक्ष मंत्री
प्रताप गोडंबे,संजय अमृतकर
--------------------------------++--------------
या वाटेतल्या हा एकमेव फोटो..
यावरून विचार करा..
काय परिस्थिती असेल तिथे ..!
🙏🙏🙏
समाप्त
जबरदस्त अनुभव व तेवढेच ताकदीचे लेखन संजयजी नमन आपल्याला
ReplyDeleteअप्रतिम अन् शहारा आणणारा दणकेबाज ट्रेक अन् तेव्हडच समर्पक वर्णन
ReplyDeleteजबरदस्त ट्रेक...
ReplyDeleteअजून एक आठवणींचा झंझावात शिदोरीत जमा...
नानाश्री तोसी ग्रेट हो....
अत्यंत सुंदर वर्णन, सोबतीला नसलो तरी आपल्या शब्द सामर्थ्याने ट्रेक केल्याचा थरार अनुभवायला मिळाला
ReplyDeleteनाना तुमच्या सारखे अनुभवी ट्रेकर सोबतीला असल्याने अवघड वाटही सोपी वाटायला लागते. तुमचा सगळ्यात महत्वाचा घेण्यासारखा गुण म्हणजे अस्ते कदम व सुरक्षित चाल
लिहीत रहावं क्लीकीकाट करत रहा हीच मनापासुन शुभेच्छा
कांदाट खोऱ्यानंतर आपण एकत्र आलोच नाही, काहीतरी योग जुळवून आणा
सुंदर व थरारक वर्णन, नाना. मजा आली वाचायला 👌
ReplyDeletehttp://ahireyogesh.blogspot.com/2018/03/umbara-damdmya-gaydara-jakhmata.html?m=1
ReplyDeleteआम्ही पहिल्यांदा 2018 मध्ये उंबरा दमदम्या व जाखमाता केला होता. नंतर अनेक फेऱ्या झाल्या या भागात.... आता जवळचा दारा करून या.....
ReplyDelete