कावळ्या घाट// बोचेघोळ

" कावळ्या घाट/बोचेघोळ "

ब्लॉग क्र.१०८

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

भटकंती मार्ग👇
*घोळ - गारजाईवडी - कावळ्या घाट - सांदोशी - वारंगी - बोचेघोळ - खानुचा डीगा - टेकपोळे -  हिरड्याचा दांड - सतिआईचं मंदिर -  घोळ*
------------------------------
नाशिककरांना रायगड मुलुखात ट्रेकला जायचं
म्हणजे अडचणींचा डोंगरचं उभा रहातो.
त्यांत ट्रॕफिक, प्रवास वेळ, मुक्काम ह्या महत्वाच्या अडचणी.
तरी,
ट्रेक करण्याची रग काही स्वस्थ बसू देत नाही.
मग अडचणींवर मात करत ती जिरवायची.
नवीन वर्षात " बकेट लिस्ट " मोठी आहे.
मग तीची वेगवेगळ्या श्रेणीत विगतवारी करायची.
आणि महिन्यातल्या ४ रविवारचं ट्रेक नियोजन पक्क करायचं.
लई भारी वाटतं 🤭

साधारण फेब्रुवारी पर्यंत दमदार/कसदार ट्रेक्स उरकून घ्यायचे.
मग जंगल ट्रेक,नाळा/घळींचे ट्रेक, मुक्कामी ट्रेक सुरु करायचे.
असं साधारण मेनू कार्ड सजवलं की आपण ट्रेक्स करायला मोकळे.यात बदलही करण्याची तजवीज करून ठेवायची.
मग कधी...बेधडक ट्रेक करायचे.No planning
सफर तो वहीं शानदार होता हैं..जो बेमंझिल हो..!

पुण्यातील सदाशिव पेठेतलं कार्ट विजय गुर्जरशी फोनवर बोलताना 'बोचेघोळ' बाबत संवाद झाला.
नी.. संध्याकाळी परत फोन आला.
जाऊ या पुढच्या विक एण्डला..तयार रहा.

रायगड मुलुखात घाटवाटांचा आणि नाळ/नळींचा
नुसता उच्छांद आहे.गडकिल्ले वेगळे.
कोकणातून चढा किंवा घाटमाथ्यावरून उतरा
सारं काही हवंहवंसं.त्यांत रायगड/लिंगाच्या ची
जादुई प्रभावळ कमाल आहे.
गेल्या काही वर्षांत गायनाळ/निसणी/लिंगाणा/सिंगापूर नाळ/मढेघाट/आंबेनळी/गोप्या घाट असं साधारण भटकून झालेलं.
अजून लई बाकी आहे म्हणून बोचेघोळ फायनल केला.

आणि.. ठरल्याप्रमाणे २० जानेवारीला दुपारी २:२० वाजता
गाडी पुण्याकडे रवाना झाली.
आम्ही चौघे..५ वा ड्रायव्हर
रस्ते मोठे,टार झाल्यामुळे की काय,
पुर्वी पेक्षा हल्ली वेळ जास्त लागतो.😀
पुण्यात कोथरूडला पोहचायला ८ वाजले.
शानदार पुणेकर  ट्रेकमेट अमित मराठे कडे चवदार जेवण झालं.
आणि ९ वाजता पुणे सोडलं.
पुण्याच्या पाण्यात मिसळून गेलेला नी वज्रेश्वरकरचा पुणेकर झालेला महान भिडू " प्रशांत कोठावदे
सह गाडी..सोबत विजय सह५ भिडू.
पानशेत नंतर टूकार रस्ता थेट घोळ पर्यंत.
फक्त ट्रेकला जातोय म्हणून सहन केलेला.
अन्यथा.. नितिन गडकरींचा नको तेवढा उद्धार झाला असता.
रस्ते म्हटलं की आम्हाला तेचं आठवतात.😀

पुणे जिल्हा/वेल्हे तालुक्यातलं..
घोळ गावांत पोहचायला रात्रीचे११:५० झाले.
गांव तर गाढ झोपलेलं.
तिथले गांवच्या राखणदार/इमानदार कुत्रांनी जो सलामी दिली ती काय विचारू नका.बरं,आमचा अवतार बघून ती भुंकणारचं.
इतक्या रात्री कुणी पाव्हणं येतं व्हयं..
म्हणून त्यांचा संताप रास्त होता.त्यातं वाटाड्या मामाला इतक्या रात्री उठवणं बरं नव्हं म्हणून नव्या कोऱ्या विठ्ठल मंदिरात मुक्काम ठोकायचा ठरला.तिथे पोहचताचं कुत्र्यांच्या तोफा मात्र थंडावल्या होत्या.
गुळगुळीत टाईल्स वर स्लिपिंग बॕग आडवी केली.नी
मग आम्हीही आडवे झालो.
गप्पांच्या नादी लागण्यापेक्षा ..
झोपेला कुशीत घेणं जास्त योग्य वाटलं..
आणि..
Light off

💢💢💢

💢💢💢

पहाटे ५:४५ वेक अप..
आम्हा भटक्यांना मंदिरात झोपण्याची फार हौस.
कुठेही वाडी/पाडे/गावांत मुक्कामी गेलो की पहिले विचारतो'मंदीर कुठे आहे..?
सर्वात सुरक्षित आणि निवांत जागा.
अनेक गडकिल्ले वा डोंगर माथ्यावरची मंदिरेही झक्कास
मुक्काम योग्य आहेत.
काही नवी...बरीचं जुनी.
⛩️
रात्री गाढ झोप लागल्याने प्रवास थकवा शमला होता.
त्यामुळे उत्साहात आवराआवर करून हाकेच्या
अंतरावर घर असलेल्या वाटाडे रामभाऊ मामांच्या घरी गेलो..
मामांनी आपुलकीने स्वागत केलं.
वयस्कर मामा (७७ वय )..पण मामी गौरवर्णीय व माझ्या
आजीसारखी दिसणारी.माझ्या वडिलांची आई म्हणजे
माझी सुंदराआजी अशीचं गोड व मायचं पांघरूण घालणारी होती.या क्षणी साक्षात सुंदराआजी चहा करतांना वाटली.
आजी समोरचं आम्ही सर्व बसलो.चहा घेऊन बाकी स्वच्छता आवरेपर्यंत पोहे तयार झाले.ते खाऊन निघेपर्यंत ७:२० झाले नी एकदाचे निघालो.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

घोल गांवाचं लोकेशन तर अप्रतिम.
चारही बाजूंनी सह्याद्रीने वेढा टाकला जणू.
सोबत बारमाही हिरवाईचं कोंदण.
आम्ही चौफेर दृष्टीक्षेप टाकत घोल सोडलं.
आणि टार रोडने गारजाई वाडीकडे निघालो.
वातावरण अतिशय आल्हाददायक.
२०१५ साली सह्यांकन मोहिमेवर असताना पहिल्या दिवशी
आम्ही डिगे गावांच्या पुढील पठारावरून पायी गारजाईवाडीपर्यंत चालत आलो,मग कोकणदिवा ट्रेक करून मुक्कामी वस्तीवर थांबलेलो.तो सारा सिनॕरियो डोळ्यासमोर उभा राहिला.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️" "तासाभरात वाडीच्या वेशीवरून उजवीकडे कावळ्या घाटाकडे निघालो.दुतर्फा हिरवा रानवा.दरम्यान वाटेत मामाने दोन मंदिरे दाखविली.एक भवानी मातेचं जंगलात विसावलेल तर दूसरं छतविरहीत महादेवाचं.तेही अगदी अडचणीच्या ठिकाणी.त्याचा जिर्णोद्धार करायचा ठरलाय..मामाने माहिती पुरवली.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

सा-या भारतीयांना मंदिर प्राणप्रिय.संस्कृती जपण्याचं आणि एकोपा राखण्याचं महत्वाचं काम हि मंदिरे करतात हे मात्र निर्विवाद सत्य.महादेव हा तर सह्याद्रीचा देव.
अनेक डोंगरमाथ्यांवर वा गडकिल्यांवर महादेवाचं मंदिर दर्शनासाठी मिळणारचं.तोचं सह्याद्रीचा स्वामी आहे.

गारजाई वाडी पासून कावळ्या घाटापर्यंत दाट जंगल आहे.आजुबाजूचा सारा आसमंत हिरव्या रंगाच्या शेकडो छटांनी नटलेला.कुठे विरळपणा आहे पण अजूनही हिरवाई दृष्ट लागण्यासारखी.कळशीतून आणून ओतल्यासारखा केशरी उन्हाचा शिडकावा.
रानमेवा झाडं विपूल.वनस्पतींचीही अनेक.पानगळीमुळे वाट कुरकुरणारी.कावळ्या खिंडीच्या अलीकडेच मामाने सगळ्यांना थांबवलं नी सांगितले की इथं मावळ संपला नी इथून कोकण सुरू झाला.
सिमा रेषा कोकण-मावळला विभागणारी..
पण रोटी बेटी चा संबंध सढळपणे चालणारा.
तरी..दोघांत वेगळेपण आहे.ते आजही टिकून आहे.
शिवकाळ..बारा मावळ.. आणि स्वराज्य हा विषय
सहज मनाला स्पर्शून गेला.हळवं मनं भावूक झालं.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

      गारजाईवाडीची वेस.. उजवीकडे कावळ्या घाटाकडे 

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

      कावळ्या घाट खिंड.. डावीकडे कोकणदिवा कडे..

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

काही वेळात कावळ्या खिंडीत पोहोचलो.डावीकडची वाट कोकणदिवा कडे जाणारी.आम्ही उजवीकडे कावळ्या घाटाकडे चालू लागलो.

कोकणदिवा दोन वेळा केलेला.
१ : जोशी काकांबरोबर .. नाशिक पुणे पानशेत कैलास गड (पायथ्याशी मुक्काम) दुसऱ्या दिवशी सांदोशी मग कोकणदिवा (मुक्काम सांदोशी)
२ : २०१५ सह्यांकन मोहिमेवर असताना.गारजाईवाडीतनं.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

कावळ्या घाट तसा वळणाचा.दाट जंगलाने व दुतर्फा कारवीने दाटलेला.सोबत कातळांनी सजलेला.आजही सर्रास वापरात असलेला.कोकण आणि मावळला जोडणारा दुवा.
हल्ली कोकणात रस्त्यांच जाळ विणलं जात आहे.त्यामुळे घाटांचा वापर तसा कमी होऊ लागलाय.तरी,थोरली माणसं ये जात रहातात.
आजही ती फिट अॕण्ड फाईन आहेत.
ना डोळ्यांवर चष्मा ना पोटाची गोलाई.😀

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

सांदोशीत पोहचायला ११;२० झाले.
उनं तापलेलं..कोकणातला दमटपणा बिलगल्यासारखा.
उजवीकडे टार रस्ता गावांपर्यंत आलेला होता.
वेशीवरचं मंदिर.तिथे नामसप्ताह निमित्त
प्रसाद उत्सव सुरू होता.ग्रामस्थांनी आग्रहाने प्रसाद वाढला.
मातेचं दर्शन व जरा आराम दोन्ही साध्य झालं.
नी वारंगीकडे निघालो.समोर उजवीकडे दुर्गदुर्गेश्वर रायगड दिसू लागला नी शिवकाळ महिमा अंतर्मनात तरळू लागला.

तमाम मराठी माणसांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारा तो शिवकाळ आणि राजेशिवछत्रपती शिवाजी.शिवाजी महाराज राजे छत्रपती झाले ते याचं रायगडावर.राज्याभिषेक सोहळा रंगला तो याचं रायगडावर.पण राज्यांचा टिपेचा संघर्ष सुरू झाला तो मात्र याचं रायगडावर आल्यानंतर.शेवटही तिथेचं.
असो,

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

           वारंगी गांव.. टुमदार... सुंदर

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

वारंगी पर्यंत कच्चा गाडी रस्ता चाल करत पोहचलो.
जरा कंटाळवाणी चाल.धुळ उडवणारी.
वारंगीच्या वेशीवरील घराजवळ सावलीत थांबलो.
माऊलीने चहापाणी दिला.जरा विश्रांती घेऊन..
मग..
भर उन्हात बोचेघोळ कडे निघालो.२ वाजले होते.
पुढे मामांना वाट काही गवसेना.
काही ग्रामस्थांनी दूरूनचं दाखवली.
तरी,मग दोन पोरं सोबत घेऊन निघालो.
वेळेचं गणित काटेकोर असल्याने उगाचंच वेळकाढूपणा नको.
म्हणून..

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

नदी ओलांडून बोचेघोळला भिडलो.
रायगड आता पाठिमागे राहिला.
चढाई वाट तर जंगलातून सापवळणाची ..
आस्ते कदम पण लयीत चाल.
सावलीमुळे कोकण दमटपणा सुसह्य तरी
फुसफास सुरू होतं.कोकणाचा तो जणू पेटेंट.
इथली वयस्कर माणसे हाफपॕंट सर्रास घालतात.
वर बनियन नाय तर टि शर्ट.
घरही साधारण उंचीची..सोबत पडवी..
सारवलेलं अंगण.. आणि
दमटपणा.
तो आपल्याला असह्य करणारा.
पण इथली माणसं फणसासारखी ..हे खरेचं..!

मुलं आम्हाला वरच्या टप्प्यावर सोडून परतीला.
बिदागी ३००₹
इथंपर्यंतची चढाई पुर्ण दमछाक क्षमतेची.
पण सावली असल्याने सुसह्य वाटणारी.
आता पुढे एकचं पायवाट..
वरच्या टप्प्यावर जंगल विरळ होऊ लागलं.
पण ..अचाट व्हू दिसू लागला.
वारंगी,रायगड दिसेनासे झाले.
दोन तीन मोठे ट्रव्हर्स मारून एका वस्तीजवळ थांबलो.
कळलं की हि तर " बिंडाची वस्ती '
भरपूर दमछाक झालेली.
त्यामुळे इथेचं मुक्काम करू या का ?
अमित मराठेचा प्रस्ताव.
पण.. सह्यांकन लिडर गुर्जर सरांनी त्याकडे
दुर्लक्ष करत तिथला माणूस सोबत घेतला नी निघालो.
मामांना इथेही वाट सापडेना.वय झालं की असं होतं ?
आमच्याही पोटात गोळा आला.😀

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

दिवस मावळतीला...
सुर्याजी राव ड्युटी संपवून डोंगराआड गुडूप.आता अंधार पडायच्या आत डिगेवस्ती गाठायला हवी.म्हणून,तेज चल..मंत्र अंगिकारला.

पाऊले झपाझप चालू लागली.

वाट सरळ पण जरा वळणारी..
आणि एका खिंडीच्या टप्यावर येऊन धडकलो.
मघाशी तात्पुरता सोबत घेतलेल्या तरूणाने स्पष्ट दिसणारी
वाट दाखवली..एक तासात दिगे गाठणार तुम्ही.
सुटा आता 😀
आणि..तो तरूण माघारी फिरला.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

खिंडीत सुसाट उतरलो नी पुन्हा वेगाने चढाई करत निघालो.
गोरज वेळेचं आगमन.म्हणजे हळवा कार्यक्रम.
" या चिमण्यांनो...परत फिरा रे..
घराकडे अपुल्या..
लतास्वर ह्रदयी गुंजू लागला.
शब्द,स्वर आणि संगीत..
केवढी ताकद आहे यांच्यात.
अजूनही हलवून टाकतात.
मनं कातर करतात.
शब्द न शब्द लागू पडावा असा..
स्वर असा की पाझर फुटावा..
नी,
संगिता असं की गुंतवून जावं.

इकडे हेडटाॕर्च विराजमान झाल्या.
चवळी चटक संदिप वडस्कर मागे पडला.
भाऊंचा फाॕर्म हरवला कालपासून..
विराट कोहली सारखा..
पण..जरा दमाने त्याने माथा गाठला.
मी, प्रशांत, प्राजक्ता,विजय तिथे वाट बघतचं होतो त्याची.
बाकी भिडू पुढे दिसेनासे झालेले.
काही वेळातचं दूरवर दोन दिवे चमकले नी हायसं वाटलं.
दिगेवस्ती जवळ आली होती.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

दिवाबत्ती वेळी वस्तीत शिरलो.
शाळेच्या नव्या इमारतीत डेरा टाकला.
माजी सरपंच संतोष भाऊ स्वागताला आले.
त्याने घरी चहाला नेलं.नी घरचं भारी म्हणून तिथला डेरा
इथे हलवला.घर साधं लहान.पण आपुलकीभरलं.
कडक चहाने तरतरी आली.
जेवण होईपर्यंत गप्पा टप्पा..
संतोषची आई शांत नी आतिथ्यशील.
गरमागरम जेवण आलं.
वाटाणा/बटाटा भाजी,भाकरी,भात.
मस्त ताव मारत जेवलो.
मग,
हाॕल स्वच्छ करत पथा-या पसरल्या.
आणि..
थकलं शरीर आडवं झालं.
गारठा ब-यापैकी.
उबदार घरामुळे झोप लवकर लागली.
💢💢💢
२ रा दिवस..२२ जानेवारी रविवार
आज..खानुडिगे वस्ती..टेकपोळ..हिरड्याचा दांड..घोळ
असा परतीचा दणदणीत कार्यक्रम.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

सकाळी ६ लाचं कोंबड आरवलं..
गरबड गोंधळ सुरू झाला.
चहा,उपमा नी तटावर फोटोग्राफी.
तटावरून लिंगाणा व परिसर महोमयी.
सुर्योदयाचे रंग निखालस नटलेले.
सर्व ऐतिहासिक पॕनोरमा डोळ्यात साठवत परतलो.
२०१३ साली लिंगाणा सर केल्याच्या आठवणी उजळून निघाल्या.हिरा पंडित सर आमचे लिडर होते.
गुहेतला मुक्काम..मसाले भात/पापड.
आणि भल्या सकाळची चढाई.
जसच्या तसं आठवलं.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

इकडे..
सॅक पाठीवर लटकल्या नी दिगे वस्तीला रामराम केला.
आता टेकपोळे -आब्यांचा दांड वरून घोळकडे उतरणार.
विजयने कडक नियोजन केलं होतं.
मस्त सकाळ.. अगदी प्रसन्न..
कालचा थकवा शमला होता.
आज पुन्हा उत्साह.. नव्या नवतीचा.
कच्चा गाडीरस्ता तासाभराचा..
मग डावीकडे कारवीतून चढाई सुरु झाली.
इथं पर्यंत एक गांवकरी सोडायला आलेला.
मामाच्या ओळखिचा..

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

दाट झाडीतून चढाई.. सावली मुळे सुखकारक वाटणारी.
कुठे मोकळं आकाश..! मजेशीर हवा.
पुढे डोंगरमाथ्यावरून दोन वाटा फुटलेल्या.
एक सरळ तर दुसरी उजवीकडे.
मामा उजवीकडे वळाले.मग सर्व त्यांच्या मागे.
पण,ती आमची वाट चुकली होती.
उतरणारी ती वाट आम्हाला हिरड्याचा दांड
पायथ्याशी घेऊन गेली.आम्हाला जायचं होतं
आंब्याच्या दांडकडे.
प्रशांतच्या ते तेंव्हाच लक्षात आलेलं की ही वाट
बरोबर नाही वाटतं.त्याचं म्हणणं खाली एका वस्तीवर गेल्यावर
पटलं.तिथल्या शेतीवर काम करणाऱ्या व्यक्तिंनी योग्य मार्ग सांगितला.एक तास जादा चालवं लागणार याचा अंदाज आला.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

मग पुढे एका धनगर वस्तीवर थांबलो..
तर आजी ताक भरलेलं पातेले घेऊन आली.
उनं असल्याने थंड ताकावर सर्व तृप्त झाले.
आणि पुढे निघालो.
काही वेळात दूसरी वस्ती लागली.
वस्ती अलीकडेचं सावलीत सर्व विसावले.
तितक्यात एका स्री शेणगौ-या वेचत निघालेली.
विजयने सहज म्हटले'ओ ताई , आम्ही जेवायला येतोय.
या की..' गरम बनवते.या सर्व.
आम्ही हसण्यावारी नेलं.
पण,
थोड्याचं वेळात ती ताई ताकाचा भरला डबा घेऊन आली.
काय लोकं आहेत इथली.
प्रेमळ..आपुलकीची..आतिथ्यशिल.
पैसे नकोत..तरी बळजबरीने दिले.
आराम ही झाला..नी ताकही मिळालं.

पुन्हा..चला..चला सुरू झालं.
गप्पा अर्धवट सोडून निघालो.
आता उजवीकडे निघालो.
हिरड्याच्या दांडकडे..
डावीकडे आंब्याच्या दांडकडे जाणारी वाट लांबची.
एक तर allready उशीर झालेला.
म्हणून सर्वानुमते ऐन वेळी रूट बदलला.
आणि..हिरड्याचा दांड कडे निघालो..

सुदैवाने चढाई माफक आणि कारवीची सोबत
त्यामुळे ऐन उन्हात सावली व सहज चाल.
टप्प्या टप्यावर हिरड्याची झाडं.वापरात असलेली
मळलेली वाट.उजवीकडे दूरवर पानशेत धरणाचं मोहक बॕकवाॕटर सह्याद्रीच्या अंगणातलं देखणं.
आणि पुढे हिरड्याचा दांड बेसुमार चालीचा.
एका पठारावर सतीमातेचं मंदिर लागलं.
तिथे दम काढला अर्थात विश्रांती थांबा.
काल..
सांदोशीत वेशीवर एक ग्रामस्थ भेटला होता.
तो सांगत होता की तिकडे दूरवर सती जाणा-या
बायकांचं स्मृती स्थळ आहेत.
राजाराम मोहन रॉय यांनी सतीची चाल बंद
करण्यासाठी जो उठाव केला त्यांना शतशः
धन्यवाद द्यावेसे वाटतात.
किती भयंकर प्रथा होती..
कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

जरा आराम करून पुन्हा सुटलो.कारवीतून दणदणीत चाल.झपाटल्यासारखे सर्व सुटले होते.परतीची ओढ..

बाकी काय..! 😀

काही वेळात एका मोकळ्या पठारावर आलो नी
घोळ गांव आणि मुलुख स्पष्ट दिसू लागला.
जरा हायसं वाटू लागलं.
काल कुठून निघालो आणि कुठून परततोय.
या विचाराने लई भारी आणि आश्चर्यकारकही वाटलं.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

किती ठिकाणी,
किती अंगाने आपण सह्याद्री भटकतोय.
याचं कौतुकही वाटलं.😀
किती हा वेडेपणा..!!!😀😀

सुसाट उतरत अर्ध्या पाऊण तासात टार रोडवर
पोहचलो..तेथून विस मिनिटांत घोळ वस्तीत.
बरोबर २:०५ वाजले होते.
अंदाजाप्रमाणे वेळेत आलो..
याचं समाधान काही औरचं.
दोन मिनिटे मागे वळून बघितलं.
सारं आठवून साठवून घेतलं.
मामाच्या अंगणात सर्वांनी धमाल अंघोळी केल्या.
यासारखा आनंद तो कोणता.
पुन्हा ताजेतवाने झालो.. आणि
मामा-मामींचा आशिर्वाद घेऊन परतीला निघालो.
सह्याद्री सुखाबरोबरचं अश्या कुटुंबांचा
कोहिनूर ठेवा आजन्म जपून ठेवावा असा..

चला..
पुन्हा भेटू 👍

धन्यवाद

संजय अमृतकर
GypsyS 🚩

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

ट्रेक दिनांक : जानेवारी २१/२२/२०२३

भिडू.. विठ्ठल सोनवणे सर, प्राजक्ता शिरोडे,संजय अमृतकर,दिलिप गिते अमित मराठे, विजय गुर्जर, प्रशांत कोठावदे,सागर शिवदे.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

Comments

  1. नाना (Sanjay Amrutkar)
    आपली लेखनशैली ऐवढी अप्रतिम आहे की त्याला तोड नाही. ब्लॉग वाचायला घेतला की थांबावस वाटत नाही, नेहमी प्रमाणे आम्ही तुमच्या सोबत ट्रेक करतोय असेच वाटते.

    आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये शिकण्यासारखे बरेच काही असते. आपल्या एका शिस्तीचा आणि नियमाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सर्वानीच तो पाळावा. मुक्कामाच्या गावी वाटाड्याच्या घरी पोहचायला तुम्हाला ऊ़शिर झाला मग तुम्ही त्याला ऊठवुन त्रास नाही दिला तर तुम्हचा प्लान B तयार होता, तुम्ही विठ्ठल मंदिरात मुक्काम केला.

    दुसरं आपला सह्यांकन नेता विजय गुर्जरच कौतुक करावसं वाटते. पठ्ठा तुम्ही हाक दिली की सर्व तयारीनिशी मोहीमेला तय्यार. एवढ्या लहान वयात विजयचे सह्याद्री पर्वतरांगेतील ज्ञान आणि अनुभव कौतुकास्पद आहे.

    पुन्हा एकदा ब्लॉग लिहल्याबद्दल धन्यवादआणि पुढील मोहीमेसाठी शुभेच्छा

    संदेश सावंत

    ReplyDelete
  2. नानाश्री , ट्रेक चे खूप सुंदर वर्णन . शिवाय जसेच्या तसे ,पण लिखाणाची शैली खुमासदार 👌
    परत एकदा पुनरावृत्ती झाली . 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..