सह्यांकन २०२२
ब्लॉग १ "सह्यांकननामा "
" सह्यांकननामा "
------------------------
हल्ली खूप काही सारे मुक्कामी ट्रेक होतं नाहीत.
दळणवळणाच्या सुखसोयी झाल्यामुळे नाशिकहून,
माळशेज परिसरापर्यंतचे बरेचं ट्रेक्स एका दिवसात होतात.
पण,
खरा सह्याद्री अनुभवायचा असेल तर मात्र सलग व मुक्काम भटकंतीशिवाय पर्याय नाही.सुर्योदय, सुर्यास्त आणि रात्र या तिघांची नैसर्गिक रूपं मुक्कामी ट्रेक नियोजन केल्याशिवाय अनुभवायला मिळत नाहीत.हेचं खरं.
म्हणून सह्यांकनचा बिगुल वाजला नी ह्या वेळी जाऊया.
म्हणून मनाची तयारी केली.
सलग ५ दिवस "सह्याद्री सहवास" लाभणं म्हणजे सुवर्णयोग.
त्यांत चक्रमचे काटेकोर नियोजन हा आवडता भाग.
" गेल्या ४० वर्षांपासून एक वर्षाआड सह्यांकन मोहिम सजवली जातेय.तीही प्रत्येक वेळी वेगळ्या रूटवर.वर्षाआधीपासून नवीन रूट शोधून..रेकी करने..सगळ्या गोष्टी पडताळून पहाणे.मग खल करत फायनल शिक्कामोर्तब करने.
हि साधी सोपी गोष्ट नाही.पण ते चक्रम लोकांना जमलंय."
पडद्यामागील घटनांवर प्रबंध लिहायला हवा.😀
बरं..
यावेळेचे रूट,स्थळे ब-यापैकी बघितलेले.भोजगिरी,दौंड्या,व कारकाई सोडलं तर सर्वचं बघून झालेलं.
तरी,
जाण्याचं ठरवलं.१ ल्या बॅचचे आॕनलाईन बुकिंग झाले.नाशिकहून मी,अश्विन अलई,अतुल अग्रवाल व घोटीहून किरण अवसरकर.वेळेवर परमभाय ची वर्णी लागली.पुण्याहून ट्रेकमेट प्रशांत कोठावदे,हर्षल कुलकर्णी,आठवले काका होतेचं.बाकी नवीन.त्यामुळे बॕच समतोल राखला गेला होता.
आमची पहिली बॕच २० तारखेला रात्री ८वाजता
मुलुंड येथून वालिव-हे मुक्कामी निघणार होती.
मात्र आम्ही नाशिककर आमच्या गाडीने थेट वालिव-हे मुक्कामी
जाणार होतो.
☑️☑️☑️
२० डिसेंबर/२२.. मंगळवार
तिस-या प्रहरी..५:१६ वाजता मुंबई नाका येथे पोहचलो.
शुभेच्छा देण्यासाठी संदिप खुटाडे आले.मग परमभाय
मग अश्विन,अतुल अग्रवाल..आणि अतुलच्या स्विफ्ट गाडीने प्रस्थान झाले.५ दिवसांचा सलग ट्रेक मुळे रकसॕकसह सामान बरचं.त्यामुळे गाडीत ५ भिडू बसणं अवघड.म्हणून घोटीचा किरण अवसरकर ट्रेनने मुलुंडला गेला.तो चक्रम टिमबरोबर वालीव-हे येथे थेट येणार होता.
मग,आम्ही चौघे गाडीने थेट वालिव-हे कडे निघालो.
घोटीनंतर चहा घेतला..मग थेट वालीव-यात रात्री ९:१० वाजता पोहचलो.
कमळूच्या घराजवळ गाडी पार्क केली.कमळू धावत स्वागतासाठी पुढे आलेला.कमळू म्हणजे इथल्या सह्याद्रीच्या कडे कपारींची पुर्ण माहिती असलेला स्थानिक भिडू.आख्ख कुटुंब वाटाड्या व इतर नियोजनाच्या क्षेत्रात.
"मुर्ती लहान पण किर्ती महान "या म्हणीला साजेसा कमळू.
कुठल्याही कड्यावर लिलया चढाई करणारा पट्टीचा सहकारी.
स्वभाव मोकळा.दिलखोलके हास्य आणि मदतीला तत्पर.
या आधी अनेक ट्रेक सोबत केले असल्याने मैत्रीचं नातं तयार झालेलं.तिथे पोहचताचं तोचं प्रथम पुढे आला.
⛩️⛩️⛩️
या १ ल्या कॕप साईटवर चक्रम संस्थेतील
बुजुर्ग श्रेणीतले आधारवड भाऊ वैशंपायन व विनय नाफडे (लांबाजी) यांनी आपुलकीने स्वागत केले..
२०१५ सह्यांकन बॕच ३ रीचे भाऊ वैशंपायन बॕच लिडर होते.
त्या बॕचमध्ये मी होतो.
त्यामुळे भेटीचा आनंदोत्सव झाला.
सॕक व इतर सामान आतल्या स्वच्छ व ऐसपैस खोलीत ठेवलं.
मग फ्रेश झालो.. मोबाईल चार्जिंग लावले.
गप्पा रंगात येईपर्यंत जेवण तयार झालं...
भुर्जी,मटकी भाजी, पोळी,वरन भात.फोनवर सांगितलेला मेनू.
अगदी पोटभर जेवलो.भाऊंशी किरकोळ गप्पा मारून झोपेच्या खोलीकडे मोर्चा वळवला.
प्रत्येकाची सॅक जड असल्याने त्यावर आपसात चर्चा..
मग सर्वांनी फेरबांधनी केली.कारण ५ दिवस ती सॕक पाठीवर विराजमान असणार होती.तसं आवश्यक वस्तू आणल्या होत्या तरी किरकोळ सामान बाजूला सारून सॕक पॕक झाली.
आणि.. गप्पा मारत ११ नंतर सर्वचं झोपी गेलो.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
___________________&_____________
२१ डिसेंबर.. बुधवार
आज ख-या अर्थाने" सह्यांकन "
मोहिमेचा शुभारंभ होणार होता.
वालिव-हे हून सादडेघाट -करपदरा-हपाट्याचा कडा -
सितामाईचा डोंगर मग पायथ्याशी कॕंपवर मुक्काम.
असं दणदणीत नियोजन होतं.
(बॕच लीडर अनिकेत रहाळकर/विजय गुर्जर)
इकडे..पहाटे ६ वाजता जागर..गडबड गोंधळने जाग आली.
(मुलुंड गाडी रात्री १ वाजता आलेली.तो पर्यंत आम्ही साखरझोपेत निद्रिस्त झालेलो.)
तसा बॕचलिडर विजय गुर्जर हलवून गेला होता.
उठा..उठा
मग.. नवीन अनेक सोबती असल्याने मजा येणार हे
लक्षात आले.
सर्वत्र सकाळची आवराआवर सुरू झाली..
बॕचमध्ये काही पुणेकर व बरेचं मुंबई कर होते.
पुणेकर तर घरचेचं लोकं.
मग चहा पोहे..झाले.
निघायला ७:३० वाजले
त्या आधी सर्वांची ओळख परेड झाली.
नाफडे सरांनी मोलाच्या सुचना केल्यात.
बॕच लिडर अनिकेत रहाळकर..
उप लिडर विजय गुर्जर..दोघे सर्वांकडे कुतुहूलाने बघत होते.
ह्यांना ५ दिवस सांभाळायचं.
या विचारात..!
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
शिवघोष करत वालीव-हे सोडले.
उजवीकडे गगनभेदी रोहिदास व हरिश्चंद्रच्या
खिंडीतून सुर्यकिरणांचे प्रकाशमान झरोखे थेट
नाप्त्याच्या माथ्यावर विराजमान झाले होते.
सुरूवातीला पायदळ घोड्यासारखे चालत राहिलो.
भाऊ व लांबा जी पुढे पर्यंत सोडवायला आले.
जसे पाहुण्यांना वेशीपर्यंत सोडतो तसे.
सादडे आणि करपदरा जेथे मिळतात.
तेथून डावीकडे हापाट्याच्या कड्यावर जाणे असल्याने
प्रथम सादडेने मग करपदराने चढाई करत हपाटा-कड्यावर गेलो.
त्या आधी.. पायथ्यापासून
डावीकडे उत्तुंग नाप्ता..
उजवीकडे हपाट्याचा कडा दृष्टीक्षेपात.
अर्थाचं आजचा गोल समोर दिसत असल्याने चैतन्य वास करत होतं.अडीच/ तीन तासांची दमदार चढाई करून माथ्यावर पोहोचलो.
चक्रम शिलेदार राजन महाजन पुढे पर्यंत घ्यायला आलेला.
वेशीवर घ्यायला येणं आणि वेशीपर्यंत सोडायला जाणं.
हे चक्रमचं खास वैशिष्ट्य.
इकडे..चढाईने छातीचा भाता फुललेला.
जसा सूर गवसलेला.
हपाट्याच्या तटावरून..
पश्चिमेस नाप्ता व इतर सगेसोयरे यांचा अफाट व्हू डोळ्यांच पारणं फेडत होता.एकदा तरी हपाट्याच्या कड्यावर मुक्काम ठोकायचाचं.असं मनोमन ठरवलं.
मग मनसोक्त फोटोग्राफी झाली.
सर्व अचाट निसर्ग दृष्य डोळ्यात साठवत पाऊलं निघाली.
आता माथ्यावरून डावीकडे आजोबा ते घनचक्कर हि सर्व तालेवार पहाडी रांग तिथल्या अनेक आठवणींना उजाळा देत होती.काळू व मुळा नदीचं खोरे यातील उत्तुंग पहाडावर ची ती चाल अनेक आठवणींना गोंजारणारी.
तेथून अर्ध्या तासात थेट कॅपसाईटवर पोहचलो.
साईट तर छान.. बरोबर सितामाईचा डोंगर पुर्व पायथ्याशी.
कॕप लिडरशी ओळख झाली सर्वांची.मग टेंट वाटणी झाली.
सॅक तिथे विसावल्या.फ्रेश होऊन जेवण आटोपली.जरा आराम करून बरोबर १:४५ वाजता सितामाईच्या चढाईसाठी सज्ज झालो.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
दमदार चढाई.अनेक विहंगम दृश्ये चौफेर उभी.
सन २०२२ च्या फेब्रुवारीत कलाडगड व सोबत सितामाईचा डोंगर ट्रेक केला असल्याने फारसं कुतुहल नव्हतं.तरी,उत्साह ओसंडून वहाणारा.अनुभवाचं दान वेगळं.
गेल्या वेळेपेक्षा हि वाट वेगळी फेरा मारून जाणारी.
शेवटच्या टप्प्यातली कारवीतनं चढाई अवघड व अडचणींची.
तिसरा प्रहर उलटून मावळतीचे रंग भरू लागले.
माथ्यावर पोहोचलो नी कोकणकड्याच्या अफाट दृश्याने सर्वचं अचंबित झाले.हरिश्चंद्र गोतावळा म्हणजे आम्हा ट्रेकर्स जमातीची पंढरी.
किती वर्षांपासून इकडे भटकतोय.
तरी सारं बघणं झालं.असं म्हणायची हिंमत होत नाही 😀
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
माथ्यावरून क्लिककिकाट झाला..
सुर्याजी रावांनी भगवा रंग पांघरला नी मावळतीचा
पट उलगडू लागला.
कातरवेळेचे पाश पडण्याआधी उतराई संपायला हवी.
म्हणून जड अंतःकरणाने आल्या वाटेने परतीला निघालो.
⛩️⛩️⛩️
कॕप साईटवर पोहचायला संध्याकाळ झाली.
रवीराज क्षितिजात गुडूप झाले.आणि,
कैवल्याचा प्रकाश राज्य करू लागला.
हुरहूर लावणारी ही वेळ.
तरी, दिवसभरातल्या भटकंतीचा स्लाईड शो अंतर्मनात
सुरू होता.समाधानाची लकेर अंगभर पसरलेली.
तिकडे चहा बिस्किटे,कचोरी वैगरे लवाजमा
आमची वाट बघत होता.
सोबत कॕप लिडर... मंगेश पंडित, आशिष म्हात्रे, रमेश पवार,
कौस्तुभ कुलकर्णी,चेतन गोरे पाटील.होतेचं ..
लग्नघरातल्या धावपळीसारखे सर्व पळपळ करत होते.
चक्रम संस्कारांनी न्हाहून निघालेले जणू.
⛩️⛩️⛩️
फ्रेश होऊन सर्व कॅपसाईवरील मोकळ्या जागेत गप्पा मारत उभे.मग सुप.. शेकोटी.. गप्पा
९ वाजेनंतर जेवण आलं..
(भास्कर इथला राजा माणूस.
त्याच्याकडेचं नाश्ता/जेवण नियोजनाची जबाबदारी.)
मग ते आटोपून टेंटमध्ये गुडूप..
गारठा .. असल्याने टेंट ऊबदार वाटू लागला.
दिवसभरातील फोटोग्राफी बघत डोळे जड झाले..
स्लिपिंग बॕगेची चैन आपोआप ओढली गेली.
⛩️⛩️⛩️⛩️
२२/ गुरूवार ..
आज मोहिमेचा २ रा दिवस.
प्रथम गाडीने कोथळे गावापर्यंत.मग भैरवगड चढाई/उतराई,
नंतर कारकाई डोंगर चढाई.तिथेचं माथ्यावर मुक्काम.
असं आजचं नियोजन.
⛩️⛩️⛩️
काल खुप काही थकावट झाली नव्हती.त्यामुळे
शरीरातील सळसळ अजूनही आव्हान स्विकारण्याच्या तयारीत.
झोप बरी लागली.सर्दीने पडाव टाकला होता.त्यामुळे असेल कदाचित.
५:३० वाजता जागर झाला.
नंतर आवराआवर सुरू झाली.
सकाळचे सोपस्कार,चहा,ऊपमा खाऊन
भल्या सकाळी जिपने कोथळेकडे निघालो.
टार रोड.. प्रसन्न वातावरण.
सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांनी आसमंत
उजळून निघालेला.प्रवास वळणा-वळणांचा पण सुखद.
रस्त्यावरीव गांव व गांवकरी लगबगीनं व्यस्त.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
भैरवगड तसा २००९ साली,नंतर
पुन्हा २०१७ साली केलेला.तरी मजा आली.
काही चांगले potraitS काढता आले.
दूसराचं दिवस असल्याने potraitS मुळे नवीन
भिडू जवळ आले.😀 संवादाला पालवी फुटली.
अडीच/तीन तासात किल्ला बघून परतलो.
टार रोडने चालत .. पुढे पर्यंत गेलो.कोथळे गांव मागे
सारून.उजवीकडे मळलेल्या वाटेने कारकाई चढाई सुरु झाली.
मस्त जंगल ..आणि वळणाची चढाई.
खडी चढाई असल्याने " आस्ते कदम..
अर्थात १,२,३,४ अश्या रितीने पाऊलं टाकायची.
आणि चालत राहायचं.
यामुळे शक्ती खर्च होत नाही.आणि दमही लागत नाही.
हा फंडा मी नेहमी वापरतो.
उगाचं घाई करत वेगाने चढाई करण्यात काही
अर्थ नसतो.😀
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
तीन/साडेतीन तासांत कॕपसाईटवर पोहचलो.
कारकाईच्या अफाट पण
माफक चढ उताराच्या पठारावरून कारकाईचा एकूण
आवाका लक्षात येणं अवघड होते.चक्रमचे कर्तव्यकठोर
शिलेदार तटावर सरबत घेऊन उभेचं होते.कॕंपसाईटवर राजेश गाडगीळ व सहकारी स्वागतासाठी पुढे आले.
साईट तर अफलातून जागेवर.मुक्कामासाठी कुणालाही हेवा वाटावा अश्या जागेवर.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
टेंटमध्ये सॕक ठेवा आणि लगेचं जेवणासाठी जा.कॅंपलिडरचा आदेश.उनं ब-यापैकी होतं.जरा उतरून झाडांच्या छत्रछायेखाली जेवणासाठी व्यवस्था केलेली.तिथं पाणी स्रोत असल्याने असेल कदाचित.पिठलं भाकरीचा ग्रामीण मेनू होता.
इथेच्छ ताव मारत नंतर सावलीत सर्वांनी ताणून दिली.पुन्हा भटकंतीला जाण्यापेक्षा सायंकाळी थेट सुर्यास्तालाचं तटावर जाऊ असं अनेकांनी ठरवलं.काही सोबती भटकायला गेले.
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
संध्याकाळी सनसेटसाठी कारकाईच्या पश्चिम तटावर पोहचलो.
चक्रमचे शिलेदार भेळभत्ता तयार करत होते.
तटावरून मावळतीचे गहिरे रंग भावूक.
संध्याकाळची वेळ म्हणजे सुवर्णपात्री अमृतचं जणू.
डाेंगरकुशीच्या रेषेला बिलगुन बसल्यासारख्या पसाभर खिरेश्वर गावांत संध्याकाळ अशी अलगद उतरुन येत होती.
खेळुन दमलेल्या बाळानं झाेपेचे पंख डाेळ्यावर ओढुन घ्यावेत,तश्या कृष्ण सावल्यांच्या पापण्यांत खिरेश्वर गांव बुडून जातं होतं.
हलक्याशा भगव्या रंगात हरिश्चंद्रगड,व रोहिदास मंडळी
अधिक खुलून दिसत होती.पिंपळाजोग धरण अधिक गडद
झालेलं.फोटोग्राफी..मनमुराद
मावळतीचा सिनॕरियो ..स्मरण मंदिरात स्थिरावला.
अंधाराचं साम्राज्य स्थिर होण्याआत परतीला कॕमसाईटवर आलो.टेंटमध्ये लाईट चमकू लागले..आणि ग्लॅमरस माहोल तयार होऊ लागला.सह्यांकन मोहिमेतली हि सर्वात लक्षवेधी कॕंपसाईट.अप्रतिम जागेवर वसवलेली.
सुप..आलं.. काही वेळात जेवण.
गारठा वाढू लागला..उभं राहून जेवणावळ आटोपली.
मग सर्व गप्पांत रंगले.
थंडीचे पाश अधिक घट्ट होऊ लागले तसं एकेकाने काढता पाय घेतला.आणि उत्तरोत्तर टेंटमधील प्रकाश अंधारात परावर्तित होतं गेला.
एक सुखद दिवस पुन्हा काळाच्या पडद्याआड..झालेला
⛩️ निमित्त...कारकाई मोहिमेची स्वप्नपूर्ती झालेली.
(कॕंप लिडर .. राजेश गाडगीळ,
इतर सहकारी: प्रकाश पवार,अतिन साठ्ये, अनिकेत मिरवणकर,सागर पवार.
(सह्यांकन लीडर : महेश भालेराव सर)
----------------------------
भाग पहिला समाप्त 🙏
संजय अमृतकर नाशिक
Gypsy trekkerS 🚩
Nashik
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
मस्तच नाना , आठवणी ताज्या झाल्या
ReplyDelete1no फोटो नाना! लेखन नेहमीप्रमाणेच प्रवाही.
ReplyDeleteनाना
ReplyDeleteआपली लेखनशैली नेहमी प्रमाणेच अप्रतिम आहे. एकदा वाचायला सुरुवात केली की संपुर्ण लेख वाचुनच पुर्ण होतो.
मी होतो ना तुमच्या बरोबर ह्या सह्यांकनला. सगळ अगदी मस्त होते. शारीरिक क्षमता वाढवायला हवी माझी म्हणजे आजुबाजूला सगळे पाहता येईल
अप्रतिम ब्लॉग झालाय नाना.....👌🏻👌🏻😍
ReplyDeleteलेखनशैली एकदम फक्कड झालीये आणि त्याला साथ अप्रतिम फोटोग्राफीची..... तुमची प्रत्येक फ्रेम सुंदरच असते.... फिदा आहोत तुमच्या लेखनशैलीवर आणि नितांतसुंदर फोटोग्राफीवर....🙏🏻🙏🏻
पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय ☺️
खूप छान लिहिलं आहे. ओघवती शैली, उगाच मोठे मोठे आलंकारिक शब्द नाहीत. डोळ्यासमोर चित्र उभे केले.
ReplyDelete