" सह्यांकननामा "२०२२ भाग २

ब्लॉग २ रा..
(सह्यांकन दिवस ३ रा..)
---------------------
नमस्कार मंडळी..
सह्यांकन मोहिमेचा पहिला ब्लॉग आपण 
वाचलाचं असेल.वालीव-हे येथून सुरू झालेलं 
सह्यांकन सादडे -करपदरा-हपाट्याचाकडा-सितामाईचा डोंगर मग १ ला मुक्काम तिथे पायथ्याशी.
२रा दिवस कोथळेचा भैरवगड मग कारकाई माथा.
मुक्काम कारकाई.
आज तेथून पुढील सह्यांकननामा..

डिसेंबर २३..शुक्रवार 
(मुक्काम : कारकाई टाॕप )
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

सह्यांकनचा तिसरा दिवस.
रात्री छान झोप लागली.काल दुपारनंतर तसा आरामचं होता.
सुर्यास्त बघण्यासाठी जी चाल झाली तेवढीचं.
त्यामुळे खुप थकवा नव्हता.तरी..
सह्यकुशीतलं झोपेचं सुख अनुभवता आलं.
प्रियसीनंतर सर्वोत प्रिय ती झोपचं.😀

पहाटे ५:३० चा वेक अप.
आज चक्क बेड टि मिळाला..लई भारी वाटलं राव.
सह्यांकनमध्ये असे लाड कधी अनुभवले नव्हते.
कॅंपलिडर गाडगीळांनी सढळ हस्ते उधळण केलेली.
बाहेर गारठा असल्याने तो चहा सुखावणारा.
मग गारठ्यात टेंट बाहेर पडलो.
मग ब्रश वैगरे सोपस्कार..

बाहेर गार वारा झोंबणारा.कारकाई माथ्यावर मुक्काम असल्याने हवेतला थंडावा अधिक दमदार होता.
तरी,ब्रश करून ताजेतवाने झालेले
सर्व भिडू चहासाठी एकत्र जमले.
हा ब्रश नंतरचा चहा 😀
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

" तिकडे उगवतीचे रंग मोहून टाकणारे..
कुठल्याही डोंगरमाथ्यावर मुक्काम ठोकला की
अरूणोदयाचा विहंगम सोहळा मंत्रमुग्ध करणारा असतो.
इथेही तिचं अवस्था.
चक्रम किल्लेदार अनिकेत मिरवणकरच्या माऊथ आॕरगन ने
शोले सिनेमातील प्रसिद्ध धून वाजवून मौसमचं बदलून टाकला होता.
चित्रपटातील तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला.
" किर्र रात्री अमिताभ ओट्यावर बसून माऊथ आॕरगन वाजवतोय आणि समोर दूरवर जया हवेलीवरचे प्रकाशमान दिवे  बंद करत आहे.केवढा संवेदनशील प्रसंग तो.दिग्दर्शकाला त्रिवार सलाम ठोकावा असा.picturraization अफाट.
इथे..अनिकेतने काय अफलातून धून वाजवली.
कमाल..वाह..!!!
🚩🚩🚩
तिकडे..
" पहाटेची कळी उमलण्याआधी पुर्वेकडे सर्जानांचा उत्कट महाेत्सव रंगात आलेला.मिट्ट काळाेखभरल्या रात्रीची अखेरची पावलं रेंगाळत राहिलेली असतांना..दूरवर क्षितिजांच्या डाेळ्यांच्या काजळकडा निवळत चाललेल्या होत्या.
पुजेआधी पानांफुलांनी ,हळद-कुंकू अक्षतांनी,चंदनाच्या गंधगाेळ्यांनी तबक सजवावं..
तसं पुर्वेचे तट प्रसन्नतेने भरुन गेलेले.
वा-याच्या झुळूकांनी लहरत्या दिशांची बाेटं पकडलेली असतांनाच..
रवीराजांचे घोडदळ येतात..राजे येत असल्याची वर्दी देतात.
नव्या कोऱ्या दिवसाचं दान पडलं होतं.
कारकाईवरची सकाळ भरून पावली होती.
चिरंजीव झाली होती.
⛩️⛩️⛩️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
मग आवराआवर करून खाली नाश्त्याला गेलो.
उपमा व चहा झाला.पाणी कोटा फुल करून घेतला.
आवरून ७:३० खिरेश्वर कडे कूच केली.
मोकळा आसमंत.. प्रसन्न हवा.
श्वास भरून घेत कारकाई पश्चिम टोकावर येऊन धडकलो.
खराटदरा.. उतराई ..आमची वाट बघत होती.
घसरडी वाट असल्याने तिथं रोप लावलेला.
Safety first हे चक्रमांच ब्रीदवाक्य.
त्यामुळे एकानेचं उतरायचं.तो पुढच्या टप्प्यावर पोहचला की मग दूसरा.
असा..सर्व कार्यक्रम पुर्ण व्हायला अर्धातास गेला.
आणि..
कारकाई किल्लेदारांचा निरोप घेतला.
एक से एक किल्लेदार..
संघनायकच जोमाचा... त्यामुळे सर्व काही आलबेल.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

पण इकडे सर्व सुरक्षित व जोमाने उतरू लागले.
साडेतीन तास लागले उतरायला..कठीण उतराई..
ऐन उन्हात पायथा गाठला.
आता मुलुख बदलला होता.
माळशेजच्या अंगणात उतरलो होतो.
तरी,उन्हाचा तडाखा मी म्हणतं होता.

खिरेश्वरपर्यंत पायी येईपर्यंत घाम निघाला.
तिथे एका घरगुती ऐश्वर्या हाॕटेलवर थांबा ठरला होता.
गरमाईमुळे लिंबू सरबतची आॕर्डर सुटली.
काही वेळात गाड्या आल्या.तेथून जिपने डोरमाता कॅंपकडे निघालो.उन्हातला प्रवास मग तिथून पुन्हा पायीचाल..
१ किमी.अंतर मोठं वाटलं.😀
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

उत्तम साईट.. अप्रतिम कलाकुसर ने सजलेल्या रांगोळीने
स्वागत केले.वाह..!!! फार सुंदर लक्षवेधी रांगोळी आजही मनांत घर करून आहे.
डोरमाता मंदिरात मुक्काम व्यवस्था.
आजुबाजूला वनराई.किलबिल कॕंप साईट जणू.
झाडो-याच्या छताखालील.जरा विसावलो.
फ्रेश होऊन जेवणाकडे मोर्चा वळवला.
वांग्याची भाजी चवदार..सर्वांनी मनसोक्त ताव मारला.
जेवण करून २:१० वाजता हडसर कडे निघालो.
सुरूवातीला जडपालांची मंद चाल.पोटात सरमिसळ चाललेली.म्हणून असेल कदाचित.
इथेही बरीचं झाडी असल्यामुळे सावलीचा आधार वाटला.
किरकोळ चढ उतार.सुसह्य असा.
२००८ साली हडसर केलेला.पण तो खुट्या चोरवाटेने पुर्वेकडुन.
ह्यावेळी वेगळ्या वाटेने.पायथ्यापासून मग राजमार्गाने.
सुंदर कातळपाय-यांचा ऐसपैस मार्ग.सुरूवातीला वळणदार वाट.कुठे लोखंडी रेलींग लावलेलं.कातळदरवाजां मुळे गडपण टिकून आहे.तसे इतरही अनेक अवशेष,गुहा,कातळटाके,मंदिर सुस्थितीत आहे.माथा तसा आटोपशीर.तासाभरात भटकून परतीला निघालो.आपटे काकांनी इतिहास उजळणी केली.त्यामुळे किल्ला समजायला सोपा झाला.
५ वाजलेले..आता निघायला हवं..
म्हणून परतीच्या वाटेवर रूढ झालो.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
मावळतीच्या वेळी गडसौंदर्य राजस वाटणारं.
किल्ला तसा चौफेर मोकळा असल्याने उगवती/मावळतीच्या रंगात तो न्हाऊन निघतो.आताही भगव्या रंगाची उधळण हडसरच्या तटावरून मोहक वाटणारी.
पश्चिम क्षितिजावर सुर्यगोल टेकला नी आम्ही डोरमाताच्या वेशीवर पोहचलो.
७ वाजता परतलो.एकूण चाल अंदाजे १२ किमी.रिटर्न.
(हटकेश्वर..मांगुबाई मंदिर..हडसर )
थंड पाण्याने ताजेतवाने झालो.मग गप्पांचा फड रंगला.
नाळ जुळलेले रिंगण करून बसले.हास्ये फवारे उडाले.
कल्ला झाला.मग,
रात्री जेवण होऊ घातलं...
पावभाजी-गुलाबजाम बेत जोरदार पण चवदार.
मंदिराच्या पडवीत मुक्काम.. व्यवस्था उत्तम.
खास करून रांगोळी प्रकरणावर चर्चा.
रसिककलेची बोटे फिरली होती त्यावर.
विनय जाधव यांचा रांगोळी ठसा अद्भुत.
इकडे.. उद्या सकाळी मोठी चाल असल्याने सर्व झोपायच्या तयारीला लागले.झोप झाली म्हणजे दिवसभर शक्ती टिकून रहाते.
Good night 
(कॕप लिडर : सदानंद आपटे, हेमंत पोखरणकर,आदिती गाडगिळ,विनय जाधव,अमोल शिंगटे, सुर्यकांत म्हसे.)

##############
२४.. शनिवार (चौथा दिवस)

सहाला उठलो.. आवराआवर,चहा/नाश्ता (उपमा) करून
७:३० वाजता .. कॕंप साईटचा निरोप घेतला.
सर्व चक्रम भिडू..आतिथ्य शील.
प्रत्येक साईटवर जवळपास सारखाचं अनुभव येत गेला.
किल्ले निमगिरी कडे पायी प्रस्थान झाले.जड सॕक थेट पाचकेवाडी कॕप साईटवर पोहचविण्याची व्यवस्था झाली नी हायसं वाटलं.उगाचं ओझं बाळगण्यापेक्षा हे बरं.
धन्यवाद चक्रम.🙏
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

निमगिरी पायथा पोहचायला एक तास लागला.
आधी जंगल मग शेतांच्या बांधावरून रपेट मारत
पायथ्याशी पोहोचलो.व्यवस्था गरबडीमुळे तिथं जरा वेळ गेला.
मग गड चढाई झाली..दमछाक चढाई..मधल्या टप्प्यात नंतर 
कातळ-पाय-या चढाई झक्कास..
शेजारी डावीकडे हनुमंतगड.
माथ्यावर पाण्याच्या टाके मुबलक.चौफेर व्हू कमाल.
अनेक चौथरे मरणावस्थेत.
माथा भटकून परतीला निघालो.
उनं नकोस झालेलं.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️⛩️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

पायथ्यापासून डावीकडे ट्रव्हर्स मारत दौंड्या कडे वळालो.
उन्हं तापलेलं‌.. त्यामुळे चाल एकसुरी.भोजगिरी माथा लांबसडक.. दक्षिणोत्तर.
दमदार चाल.. दमछाक.
माथ्यावरील मंदिरात पोहचायला दुपार झालेली..
तिथे थोडी टेक्निकल व्यवस्था केलेली.अनिकेत रहाळकर व सोबत विजयसह काही चक्रम भिडू होते मदतीला.
माथ्यावरुचं मंदिर टुमदार.मात्र..
चौफेर विहंगम जबरदस्त..उत्तरेला दूरवर मुळा/प्रवरेचे उत्तुंग माथे स्पष्ट दृष्टीक्षेपात आलेले.धमाल व्हूंज.
फोटोग्राफी करून आल्या वाटेने परतीला निघालो.
मंदिराजवळ थोडा थांबा घेतला.गप्पाचं गाठोडं सुटलं.
मग.. आल्या वाटेने परतीला निघालो.
पाचेवाडीकडे जाणा-या खिंडीजवळ जेवण व्यवस्था केलेली..दुपारचे ३ वाजून गेले.
चक्रम टिम तिथे वाट बघत होती.महेश केंदुरकर सर,वैगरे.
तिथेचं जेवण आवरेपर्यंत ४ वाजले.घळ उतरून पाचकेवाडी मग पुन्हा दौंड्या चढणं अशक्य.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
नियोजनाप्रमाणे पाचेवाडीत पोहचून भोजगिरीचा माथा गाठायचा
होता.पण ते अशक्य.चक्रम नियोजन समितीने तातडीने निर्णय घेऊन तो उद्या करायचा ठरला.
पाचकेवाडी कॕपवर पोहचायला संध्याकाळ झाली..
छान साईट..भोजगिरी व दौंड्या पाठिशी शिलेदारासारखे उभे.पाठराखेच्या भूमिकेत जणू.
टेंट वाटप झाले..सर्व स्थिर स्थावर होईपर्यंत अंधार पडला.
आज इथे सह्यांकन मोहिमेतला शेवटचा मुक्काम.त्यामुळे हळवपण वास करू लागलं.
मोहिमेला आज तसा निरोपाचा सोहळा असतो.
खास बडाखाना असतो.सोबत स्मरणीका प्रकाशन.
आणि सहभागी मंडळींना सर्टिफिकेट वाटप.
मग.. सहभागी सदस्यांकडून तक्रारी ऐकून घेणं..
सुचनाही.नम्रपणे त्यावर चर्चा होते.गप्पा रंगतात.
⛩️⛩️⛩️
ठरल्याप्रमाणे सर्व सहभागी व चक्रमचे मुख्य शिलेदार जमले.
विशेष ज्यांनी चक्रम संस्थेची स्थापना केली असे बर्वे काका
साक्षात उपस्थित होते.त्यांनी चक्रम नांव का व कसे ठेवले याच्या आठवणी सांगितल्या.आजच्या चक्रम पिढीने ही माणसेही जपून ठेवली हे विशेष.
चक्रमचे महेश जी केंदुरकर सरांचा ५० वा वाढदिवसही दणक्यात साजरा झाला.
यंदाचे साप अर्थात सह्यांकन प्रमुख श्री.एम.बी.भालेराव सरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा झाला.मग सर्टिफिकेट वाटप झाले.
सुचना व निरोपाची भाषणं झाली.हळवेपणाची झालर चढत गेली.
सर्व काही खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साह भरला माहोल.
तक्रारीला खुपसा वाव नव्हता.
⛩️⛩️⛩️
आग्रहाचं भोजन आटोपलं.बडाखाणा म्हणतात त्याला.
पोटभर जेवल्यासारखं वाटलं त्या दिवशी.
इतर वेळी थकल्यामुळे फारसं खाणं होतं नव्हतं.
मैत्री व सुखदा यांनी आग्रहाने वाढलं.😀
⛩️⛩️⛩️
बाहेर गारठा होताचं.
त्यामुळे काही भिडू लवकरच टेंट मध्ये पळाले काही
गप्पा मारत बसले.उत्तोत्तर चक्रमांची मैफल रंगली.
सरतेशेवटी...!
आज मोहिमेतला शेवटचा मुक्काम
असल्याने हुरहूर वाटायला लागली होती.
सह्याद्री सहवास संपणार याची.
जरा वेळाने आम्हीही टेंटमध्ये शिरलो.
# सोबत किरण अवसरकर व अश्विन अलई
बाकी इतरत्र.

कॕंप लिडर : सुखदा भिडे, मैत्री भट,सौरभ भिडे, महेश अरविंदेकर.
+++++++++++++++++++
भाग २ रा.. समाप्त 🙏

धन्यवाद

संजय अमृतकर
Gypsy trekkerS 🚩

Comments

  1. सुंदर लिहिलं आहे.

    ReplyDelete
  2. नाना, ब्लॉग सुंदर आणि फोटो अप्रतिम.. थोडं तपशीलात चुका आहेत असे वाटते. दोंड्या करून पाचकेवडी मध्ये आली बॅच आणि भोजगिरी दुसऱ्या दिवशी केला असं मला आठवतंय

    ReplyDelete
  3. अप्रतिम वर्णन 👏फोटो तर फारच आवडले 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट

भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..